Upcoming bollywood movies 2024

चला तर मग बघूया यावर्षी रिलीज होणाऱ्या Upcoming bollywood movies 2024 च्या बॉलीवूडमधील सिनेमांची लिस्ट ! तुमच्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये लवकरच प्रदर्शित होणाऱ्या बॉलीवूड चित्रपटांची ही लिस्ट आहे.

Bhakshak

भक्षक हा  एक थ्रिल्लिंग क्राईम सिनेमा आहे जो लोकांच्या वाईट गोष्टींवर प्रकाश टाकतो. भूमी पेडणेकर एका धाडसी रिपोर्टरच्या भूमिकेत असणार आहे. वाईट लोक तिला रोखू इच्छित असतानाही जे योग्य आहे त्यासाठी लढते. परिस्तिथी भयानक असतानाही कधीही हार न मानणारी ही कथा आहे.

रिलीज तारीख: 9 फेब्रुवारी 2024

दिग्दर्शक : पुलकित.

कलाकार: भूमी पेडणेकर, संजय मिश्रा, सई ताम्हणकर, आदित्य श्रीवास्तव.

प्रकार: क्राइम/ थ्रिलर/ सोशल ड्रामा .

Crakk – Jeethegaa Toh Jiyegaa!

क्रॅक – जीतेगा तो जियेगा! हा 2024 चा हिंदी स्पोर्ट्स ॲक्शन चित्रपट आहे. आदित्य दत्त दिग्दर्शित आणि ॲक्शन हिरो फिल्म्स च्या अंतर्गत विद्युत जामवाल निर्मित हा सिनेमा आहे.

रिलीज तारीख: 23 फेब्रुवारी 2024

दिग्दर्शक : आदित्य दत्त

कलाकार: विद्युत जामवाल, नोरा फतेही, अर्जुन रामपाल आणि एमी जॅक्सन

प्रकार: ऍक्शन / स्पोर्ट्स

Upcoming bollywood movies 2024

Laapataa ladies

लापता लेडीज  हा चित्रपट बिप्लब गोस्वामी यांच्या पुरस्कार विजेत्या कथेवर आधारित आहे. पटकथा आणि डायलॉग स्नेहा देसाई यांनी लिहिले आहे, तर दिव्यानिधी शर्मा यांनी अतिरिक्त संवाद लिहिले आहे. लापता लेडीज चे गेल्या वर्षी प्रतिष्ठित टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (TIFF) मध्ये स्क्रीनिंग झाले होते.

रिलीज तारीख: 1 मार्च 2024

दिग्दर्शक : किरण राव

कलाकार: नितांशी गोयल, प्रतिभा रंता, स्पर्श श्रीवास्तव आणि छाया कदम

प्रकार: कॉमेडी / ड्रामा

Shaitaan

शैतान हा हिंदी हॉरर थ्रिलर सिनेमा आहे . हा गुजराती हॉरर थ्रिलर वश चा अधिकृत हिंदी रिमेक आहे. चांगल्या आणि वाईट यांच्यातील लढाईवर हा सिनेमा आधारित आहे.

रिलीज तारीख: 08 मार्च 2024.

दिग्दर्शक : विकास बहल

कलाकार: अजय देवगण, आर माधवन, ज्योतिका आणि जानकी बोडीवाला

प्रकार: हॉरर/ थ्रिलर

Yodha

योधा हा आगामी हिंदी भाषेतील ॲक्शन थ्रिलर चित्रपट आहे.

रिलीज तारीख: 15 मार्च 2024

दिग्दर्शक : सागर आंब्रे आणि पुष्कर ओझा

कलाकार: सिद्धार्थ मल्होत्रा, दिशा पटानी, राशी खन्ना

प्रकार: ऍक्शन/ ड्रामा

Bade miyan chote miyan

बडे मियाँ छोटे मियाँ हा आगामी हिंदी ॲक्शन-थ्रिलर चित्रपट आहे.

रिलीज तारीख: 10 एप्रिल 2024

दिग्दर्शक : अली अब्बास जफर

कलाकार: अक्षय कुमार, पृथ्वीराज सुकुमारन, टायगर श्रॉफ

प्रकार: ऍक्शन/ थ्रिलर

Upcoming bollywood movies 2024

Chandu champion

एका खेळाडूच्या  खऱ्या जीवनावर आणि कधीही हार न मानण्याच्या स्पिरिट वर आधारित आहे.

रिलीज तारीख: 14 जून 2024

दिग्दर्शक : कबीर खान

कलाकार: कार्तिक आर्यन, कतरिना कैफ,  श्रद्धा कपूर

प्रकार: ऍक्शन/ बायोग्राफी/ ड्रामा

Takht

विकी कौशल औरंगजेबच्या भूमिकेत दिसणार आहे आणि रणवीर सिंग औरंगजेबच्या मोठ्या भावाची भूमिका साकारणार आहे. सिंहासनाच्या उत्तराधिकारासाठी भावांमधील वैराची ही स्टोरी आहे.

रिलीज तारीख: अद्याप निश्चित नाही

दिग्दर्शक : करण जोहर

कलाकार: आलिया भट्ट, अनिल कपूर, करीना कपूर, जान्हवी कपूर, भूमी पेडणेकर

प्रकार: ऍक्शन/ ड्रामा/ हिस्टरी

Auron mein kahan dum tha

यामध्ये 2002 ते 2023 पर्यंत उलगडणारी प्रेमकथा दिसणार आहे.

रिलीज तारीख: २६ एप्रिल २०२४

दिग्दर्शक : नीरज पांडे

कलाकार: अजय देवगण, तब्बू,  जिम्मी शेरगिल

प्रकार: ड्रामा/ रोमान्स

Stree 2

स्त्री 2 हा आगामी हिंदी कॉमेडी हॉरर चित्रपट आहे. हा Stree (2018) चा सिक्वेल आहे आणि मॅडॉक सुपरनॅचरल युनिव्हर्स मधील चौथा भाग आहे.

रिलीज तारीख: 30 ऑगस्ट 2024

दिग्दर्शक : अमर कौशिक

कलाकार: श्रद्धा कपूर, राजकुमार राव, पंकज त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी आणि अपारशक्ती खुराना

प्रकार: कॉमेडी / हॉरर

Chaava

छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हा ऐतिहासिक सिनेमा आहे.

रिलीज तारीख: 6 डिसेंबर 2024

दिग्दर्शक : लक्ष्मण उतेकर

कलाकार: रश्मिका मंदाना, विकी कौशल, आशुतोष राणा

प्रकार: ड्रामा/ हिस्टरी

Luka chuppi 2

लुका छुपी 2 हा 2019 च्या बॉलिवूड कॉमेडी ड्रामा लुका छुपीचा सिक्वेल आहे.

रिलीज तारीख: 13 डिसेंबर 2024

दिग्दर्शक : लक्ष्मण उतेकर

कलाकार: विकी कौशल आणि सारा अली खान

प्रकार: कॉमेडी / ड्रामा

Badhaai ho 2

बधाई हो 2 हा अमित शर्मा द्वारा दिग्दर्शित 2018 चा बॉलीवुड कॉमेडी ड्रामा बधाई हो चा सिक्वल आहे.

रिलीज तारीख: 15 डिसेंबर 2024

दिग्दर्शक : अमित शर्मा

कलाकार: आयुष्मान खुराना

प्रकार: कॉमेडी / ड्रामा

READ MORE: Love and war movie 2025

Leave a Comment