New ramayan movie 2024

ठरलं तर मग ! नितेश तिवारीच्या ‘रामायण’ मध्ये सनी देओल दिसणार भगवान हनुमानाच्या भूमिकेत…

नितेश तिवारीच्या New ramayan movie 2024 रामायणमध्ये सनी देओल सोबत रणबीर कपूर, सई पल्लवी, यश आणि लारा दत्ता दिसणार आहेत. या सिनेमात रणबीर कपूर “राम” तर सई पल्लवी “सीते” च्या भूमिकेत दिसणार आहे.

या सिनेमासोबत बरीच नावे जोडली जात असताना, अलीकडेच अशी बातमी आली आहे कि विजय सेतुपतीला रावणाचा भाऊ विभीषणाची भूमिका साकारण्यासाठी संपर्क करण्यात आला आहे.

Sunny deol in new ramayan movie

बातमीनुसार असे सांगण्यात येत आहे कि, “हे कास्टिंग दमदार असणार आहे, कारण जसे भगवान हनुमान सामर्थ्य दर्शवतात त्याचप्रमाणे हि भूमिका अत्यंत विश्वासाने बजावण्यासाठी सध्याच्या काळात सनी देओलपेक्षा कोणता चांगला ऑपशन असणार आहे. म्हणून रामायण: पार्ट १ मध्ये सनी देओल गेस्ट अँपीअरन्स मध्ये दिसणार आहे , तर दुसऱ्या आणि तिसऱ्या भागात त्याची पूर्ण उपस्थिती असेल. निर्मात्यांना खात्री आहे की दारा सिंग नंतर सनी देओल हा आजच्या मॉडर्न काळात भगवान हनुमानाच्या रोल साठी योग्य पर्याय असेल.”

Image Source: Instagram

सूत्रांच्या माहितीनुसार असे सांगण्यात येत आहे की , सनीच्या कास्टिंग नंतर सर्वजण उत्सुक आहेत. सनी देओल त्याच्या देहबोली आणि प्रतिमेमुळे हनुमानाच्या भूमिकेसाठी परफेक्ट आहे. शिवाय या चित्रपटाचा भाग असल्याने सिनेमाच्या व्यावसायिक घटकांना देखील फायदा होईल. मागील काही दिवसांमध्ये सोशल मीडियावर रामची भूमिका साकारणारे रणबीर कपूर आणि सनी देओल यांच्यामध्ये वयात अंतर असल्याची चर्चा होती. पण या गोष्टींमुळे तेवढा फारसा फरक पडत नाही, असे डायरेक्टर चे मत आहे.

new ramayan movie cast | New ramayan movie 2024

“रामायण” हा सिनेमा एक प्रॉपर पॅन-इंडिया चित्रपट म्हणून बनवला जाणार आहे, ज्यामध्ये देशभरातील विविध इंडस्ट्रीज मधील कलाकारांना कास्टिंग करण्यात येणार आहे. तसेच या सिनेमात यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. पण ‘रामायण-पार्ट 1’ मध्ये त्याची भूमिका केवळ कॅमिओ रोल ची असेल. चित्रपटाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या भागात त्याची पूर्ण भूमिका असणार आहे. या सिनेमाचे शूटिंग मार्च 2024 पासून सुरू होणार असल्याची बातमी आहे . पहिले शेड्युल मे पर्यंत चालणार असून जुलैपर्यंत चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करण्याची तयारी सुरू आहे. ‘रामायण’ मध्ये भरपूर व्हीएफएक्स असणार आहे. त्यामुळे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर दीड वर्ष या सिनेमाच्या पोस्ट-प्रॉडक्शन वर काम चालू असणार आहे.

new ramayan movie director

‘रामायण’ हा सिनेमा नितेश तिवारी आणि रवी उद्यावर एकत्र दिग्दर्शित करणार आहेत. नितेशने यापूर्वी ‘चिल्लर पार्टी’, ‘दंगल’ आणि ‘छिछोरे’ या सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे. तर रवी हा श्रीदेवी स्टारर ‘मॉम’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यासाठी ओळखला जातो. याशिवाय त्याने सिद्धांत चतुर्वेदी आणि मालविका मोहनन यांच्यासोबत ‘युध्दरा’ नावाचा चित्रपट बनवला असून तो येत्या काही दिवसांत प्रदर्शित होणार आहे. ‘रामायण’ २०२५ च्या शेवटी किंवा २०२६ च्या सुरुवातीला रिलीज होऊ शकतो.

READ MORE: Interesting facts about bollywood film industry

Leave a Comment