नो एंट्री 2: अर्जुन कपूर घेणार सलमान खानची जागा ? वरुण धवन आणि दिलजीत दोसांझची एन्ट्री !
एका मीडियाच्या माहितीनुसार असे समोर आले आहे कि, ‘नो एंट्री 2’ च्या निर्मात्यांनी अनीस बाझमीच्या दिग्दर्शनाखाली अर्जुन कपूर, दिलजीत दोसांझ आणि वरुण धवन यांचे कास्टिंग केले आहे. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया.
‘नो एन्ट्री’ च्या सिक्वेलची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत आहे. यापूर्वी, या सिनेमामध्ये सलमान खान असल्याचे डायरेक्टर अनीस बज्मी यांनी सांगितले होते मात्र आता एक नवीन गोष्ट समोर आली आहे. 2005 मध्ये रिलीज झालेल्या पहिल्या भागामध्ये अनिल कपूर, सलमान आणि फरदीन खान प्रमुख भूमिकेत होते.
बोनी कपूरच्या सपोर्ट ने हा सिनेमा बॉक्स ऑफिस हिट ठरला आणि त्याचा कल्ट क्लासिक सिनेमामध्ये समावेश झाला. आता प्रेक्षकांच्या प्रचंड मागणीमुळे निर्मात्यांनी याचा सिक्वेल परत घेऊन येण्याचा निर्णय घेतला आहे.
सलमान खानचे बाकीच्या सिनेमाचे शूटिंग पूर्ण झाल्यावर या सिनेमाची शूटिंग सुरु होणार होती. पण तो त्याच्या आगामी प्रोजेक्ट मध्ये व्यस्त असल्या कारणाने डायरेक्टर देखील दुसऱ्या सिनेमांकडे वळले. म्हणून या सिनेमाचा सिक्वल लांबणीवर गेला. असे बाझमी यांनी सांगितले.
No entry 2 movie cast |No entry 2 movie
लेटेस्ट बातमीनुसार , सलमान खान नो एंट्री 2 मध्ये दिसणार नाही आहे , परंतु नो एंट्री 2 साठी जी तीन नावे फायनल झाली आहेत ती अर्जुन कपूर, वरुण धवन आणि दिलजीत दोसांझ यांची आहेत. होय, तुम्ही ते बरोबर ऐकले आहे !
मीडिया रिपोर्टनुसार या तिघांची कास्टिंग होणार असून त्यांनी या सिनेमाची कॉमेडी स्क्रिप्ट ऐकून घेतल्यानंतर लगेचच या सिनेमाला होकार दिला आहे असे सांगितले जात आहे.
निर्मात्यांच्या जवळच्या एका व्यक्तीने खुलासा केला कि , अनीस बाझमी लेखक आणि दिग्दर्शक म्हणून नो एंट्री 2 मध्ये असताना, निर्मात्यांनी वरुण धवन, अर्जुन कपूर आणि दिलजीत दोसांझ यांना एकत्र केले आहे. हे तिघे जण स्क्रिप्टबद्दल खूप उत्सुक आहेत आणि त्यांनी कथेला होकार दिला आहे.
अजून ते सांगतात कि नो एंट्री 2 ही एक कॉमेडी स्क्रिप्ट आहे जी प्रत्येक व्यक्तीला आवडेल आणि २०२५ मध्ये नो एन्ट्री च्या पहिल्या भागाला 20 वर्षे पूर्ण होतील.
इंटरनेट वर ही बातमी समोर आल्यानंतर लगेचच नेटिझन्सनी त्यावर आपली मते मांडली आहेत . काही लोकांनी निर्मात्यांना त्यांच्या कास्टिंगसाठी ट्रोल केले, तर इतरांनी अभिनेत्रींची नाव सुचवले. पोस्टवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, “अर्जुन पेक्षा अनेक कलाकार आहेत ज्यांच्याकडे सुपर कॉमिक टायमिंग आहे.”
No entry 2 release date
बरं, आजून यावर कोणतेही ऑफिशिअल कॉन्फर्मेशन आलेले नाही. नो एन्ट्री च्या सिक्वेल ची शूटिंग अंदाजे यावर्षी डिसेंबर २०२४ मध्ये चालू होईल आणि २०२५ मध्ये सिनेमा रिलीज होईल. तरी निर्माते लवकरच याची अधिकृत घोषणा करतील याची आम्ही वाट पाहत आहोत.
READ MORE: New Ramayan Movie 2024