swatantra veer savarkar movie release

स्वातंत्र्यवीर सावरकर रिलीज : ‘मला अहिंसेचा द्वेष आहे, गांधींचा नाही…’, रणदीप हुडाच्या सिनेमाची रिलीज डेट जाहीर

swatantra veer savarkar movie release रणदीप हुड्डाने त्याच्या आगामी ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे. या सिनेमाची घोषणा झाल्यापासून लोक या सिनेमाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. अखेर रणदीपने त्याच्या सिनेमाची रिलीज डेट जाहीर केली आहे. या सिनेमात अंकिता लोखंडे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

बॉलीवूड मधील रणदीप हुड्डा हा उत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहे. ‘सरबजीत’, ‘सुलतान’ आणि ‘हायवे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवल्यानंतर रणदीपने आता डायरेक्टर म्हणून एन्ट्री केली आहे.

swatantra veer savarkar movie official teaser : Watch here

swatantra veer savarkar movie release

रणदीप हुड्डा याने त्याच्या आगामी सिनेमा ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ मध्ये अभिनय आणि दिग्दर्शन देखील केले आहे. या सिनेमात तो स्वातंत्र्यसैनिक विनायक दामोदर सावरकर यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.

रणदीपने जेव्हा पासून या सिनेमाची घोषणा केल होती तेव्हा पासून प्रेक्षक त्याच्या सिनेमाची आतुरतेने वाट बघत होते. शेवटी, हुतात्मा दिनी त्याने सिनेमा कधी रिलीज होणार असल्याचे सांगितले आहे.

Image Source: Instagram

Randeep hooda loses weight for role | रणदीप हुड्डाने कमी केले वजन

क्रांतिकारक विनायक दामोदर सावरकर यांच्या भूमिकेत येण्यासाठी रणदीप हुड्डाने १८ किलो वजन कमी केले होते अशी बातमी होती, मात्र आता निर्माते आनंद पंडित यांनी एका खास मुलाखतीमध्ये सांगितले की, रणदीपने रोलसाठी एकूण २६ किलो वजन कमी केले आहे.

पुढे आनंद पंडित यांनी असेही सांगितले की रणदीप हुड्डाने आपल्या व्यक्तिरेखेमध्ये परफेक्ट दिसण्यासाठी त्याने  केस देखील कापले होते. त्यांनी असेही सांगितले की हा सिनेमा सुरुवातीला अभिनेते आणि मराठी चित्रपट डायरेक्टर महेश मांजरेकर दिग्दर्शित करणार होते , परंतु तारखेच्या कारणामुळे तसे होऊ शकले नाही.

त्यांनीच रणदीप हुड्डा ला हा सिनेमा  स्वतः दिग्दर्शित करण्यासाठी सांगितले होते . या सिनेमात रणदीप हुड्डा शिवाय मार्क बेनिंग्टनसारखे अनेक स्टार्स महत्त्वाच्या रोल मध्ये दिसणार आहेत.

swatantra veer savarkar movie first look | स्वतंत्रवीर सावरकर ची पहिली झलक
चाहत्यांना भेट देण्यासाठी रणदीप हुड्डा याने ३० जानेवारी २०२४ रोजी ‘स्वातंत्र्य वीर सावरकर ‘ची पहिली झलक सर्वांपर्यंत आणली. त्याने सिनेमाचे पोस्टर शेअर केले आहे, ज्यामध्ये स्वतः रणदीप दिसत आहे. व्हिडिओच्या बॅकग्राऊंड मजकूर मध्ये, “देशद्रोही? दहशतवादी? नायक?” असे शब्द दिसून येत आहे . तसेच व्हिडिओमध्ये रणदीप ‘मला गांधींचा नाही तर अहिंसेचा तिरस्कार आहे’ असे म्हणताना दिसून येत आहे.

swatantra veer savarkar movie release | हुतात्मा दिनी रिलीज डेट जाहीर केली

रणदीप हुड्डा ने व्हिडिओ शेअर करत सिनेमाच्या रिलीजची डेट जाहीर केली आहे. रणदीप ने कॅप्शनमध्ये लिहिले की, “भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील दोन नायक; एक साजरा केला गेला आणि एक इतिहासातून पुसला गेला. हुतात्मा दिनी इतिहास पुन्हा लिहिला जाईल.” हा सिनेमा २२ मार्च २०२४ रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

swatantra veer savarkar movie story |स्वतंत्रवीर सावरकर ची स्टोरी काय आहे?

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा विनायक दामोदर सावरकर यांचा बायोपिक आहे. ते क्रांतिकारक, समाजसुधारक आणि राजकारणी होते. तसेच हिंदू राष्ट्रवादाची राजकीय विचारधारा ‘हिंदुत्व’ विकसित करण्यामागे मोठे श्रेय सावरकरांना जाते. देशाच्या स्वातंत्र्यात सावरकरांचाही मोठा वाटा होता मात्र त्यांच्याबद्दल लोकांना कमी माहिती आहे.

swatantra veer savarkar movie cast

कलाकारांबद्दल बोलायचे झाले तर रणदीप हुड्डा व्यतिरिक्त अंकिता लोखंडे आणि अमित सियाल यांच्यासह अनेक कलाकार या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सिनेमाच्या दिग्दर्शनासोबतच रणदीप को -प्रोड्युसर देखील आहे.

READ MORE : New Ramayan Movie 2024

Leave a Comment