Heeramandi the diamond bazaar netflix

‘हीरामंडी: द डायमंड बाजार!’ चा फर्स्ट लूक रिलीज

 Heeramandi the diamond bazaar netflix वरील ही सिरीज खूप दिवसांपासून चर्चेत होती. जेव्हा पासून या सिरीज ची घोषणा झाली आहे तेव्हापासून चाहते याची वाट बघत आहेत.

शेवटी त्यांची प्रतीक्षा संपली आहे असे दिसून येतंय कारण या सिरीज चा फर्स्ट लुक आला आहे. त्यांनी डायरेक्ट केलीली हि सिरीज कमालीची असणार आहे कारण ते तुम्हाला त्या दुनियेत कशे घेऊन जातील हे तुम्हाला कळणार देखील नाही.  

heeramandi the diamond bazaar cast

संजय लीला भन्साळी यांच्या  बहुप्रतिक्षित Heeramandi: the diamond bazaar या वेबसिरीजचा फर्स्ट लूक गुरुवारी रिलीज केला गेला आहे . या सिरीजने भन्साळींचे ओटीटी प्लॅटफॉर्म वर पदार्पण होणार आहे.

भारतातील सर्वात मोठ्या वेब शो पैकी एक म्हणून याच्याकडे  पाहण्यात येत आहे. हीरामंडी मध्ये मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, रिचा चढ्ढा यांच्यासह इतर कलाकार देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

heeramandi the diamond bazaar first look

संजय लीला भन्साळीच्या प्रॉडक्शन हाऊसने नुकताच त्यांच्या सोशल मीडिया पेजवर फर्स्ट लुक शेअर केला आहे आणि त्याला कॅप्शन दिले की, “सुप्रसिद्ध इंडियन डायरेक्टर संजय  लीला भन्साळी यांच्या हीरामंडी: द डायमंड बाजार ची पहिली झलक पहा !”

watch here first look of heeramandi the diamond bazaar first look

Image Source : Instagram

Heeramandi the diamond bazaar netflix

या सिरीज चा फर्स्ट लुक हा देवदास, बाजीराव मस्तानी आणि इतर अनेक चित्रपटांसारखे भव्य, मोहक आणि नाट्यमय दिसून येत आहे. या टीझरमध्ये भन्साळींनी कुशलतेने निर्माण केलेल्या लार्जर दॅन लाइफ दुनियेची झलक दिसते जी भन्साळीच्या सिनेमांची खास गोष्ट आहे.

संजय लीला भन्साळी यांची कथा सांगण्याची पद्धत प्रत्येक फ्रेममध्ये दिसते. निर्माते या सिरीज ला जागतिक प्रेक्षकांसाठी बनवलेली आणि भारतीय पद्धतीने सांगितलेली स्टोरी म्हणून बघितले जात आहे असे सांगितले आहे. हीरामंडी मध्ये त्याच्या कथेप्रमाणेच अनोखे रचना असलेले संगीत देखील असेल जे प्रेक्षकांना खिळवून ठेवेल.

heeramandi the diamond bazaar story |what is heeramandi based on

लाहोर येथील स्वातंत्र्यपूर्व भारतात जिथे वसाहतविरोधी स्वातंत्र्य चळवळी उदयास येत होत्या अशा सत्तासंघर्षाच्या मुद्यावर हिरामंडी ही सिरीज आधारित आहे.

एक तरुण वारस जो एका गोष्टीमध्ये अडकला जातो आणि वारसा हक्कापेक्षा प्रेम निवडतो, ज्यामुळे सामाजिक आणि बाकी गोष्टींवर कसा परिणाम होतो आणि वेश्या  यांच्या कलेला कसे पारखले जाते यावर ते आधारित आहे.

Heeramandi netflix series |how many episodes of heeramandi are there

नेटफ्लिक्स ने या सिरीज चे वर्णन करताना म्हटले आहे कि “प्रेम, शक्ती, बदला आणि स्वातंत्र्याची एक लार्जर दॅन लाइफ स्टोरी आहे जी  कला, संस्कृती, सौंदर्य आणि भन्साळी यांच्या वारशाचा एक गहन अनुभव असल्याचे वचन देते.” भन्साळींनी या प्रोजेक्ट वर सुमारे १४ वर्षे काम केलं आहे म्हणून याला “पॅशन प्रोजेक्ट” देखील म्हणता येईल.

हीरामंडी ही सुरूवातीला 7 भागांची सिरीज होती, ती नेटफ्लिक्ससाठी बनवली गेली होती आणि बहुतेक भाग भन्साळीच्या असिस्टन्टने दिग्दर्शित केले आहेत .

संजय लीला भन्साळी यांनी स्वतः पहिले आणि शेवटचे भाग दिग्दर्शित केले आहेत. बाकीचे भाग विभू पुरी आणि मिताक्षरा कुमार यांनी दिग्दर्शित केले आहेत, जे भन्साळीचे असिस्टन्ट आहेत.

ALSO READ : Swatantra veer savarkar movie release

Leave a Comment