‘शंभू’: अक्षय कुमारने महादेवाच्या भूकेत साकारले ‘शंभू’ गाणे, पहा ‘शंभू’ची पहिली झलक
ऍक्टिंग नंतर अक्षय कुमार आता आपल्या गायनाने चाहत्यांना आकर्षित करताना दिसणार आहे. askahy kumar shambhu song release date लवकरच समोर येणार आहे त्यामध्ये तो ‘शंभू’ गाण्यात आपल्या आवाजाची जादू पसरवताना दिसणार आहे.
अक्षय कुमार हा बॉलीवूड मधील एक उत्तम कलाकार आहे. तो त्याच्या ऍक्टिंग ने लाखो फॅन्सच्या मनावर राज्य करतो. ऍक्टिंग नंतर आता अक्षय कुमार त्याच्या गायनाने फॅन्सना आकर्षित करण्याच्या प्रयत्नात दिसत आहे.
त्याचे शंभू हे गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटली येणार आहे. या गाण्याबद्दल नुकतीच एक मोठी बातमी समोर आली आहे.
Shambhu song teaser release
सिनेमाव्यतिरिक्त अक्षय कुमार च्या म्युझिक व्हिडीओजलाही प्रेक्षकांकडून पसंती मिळते. अक्षय कुमार आता फिलहाल, फिलहाल २ आणि क्या लोगे तुम नंतर परत एकदा म्युसिक विडिओ घेऊन येत आहे. यावेळी हे गाणं रोमँटिक नसून भक्तीने भरलेले आहे.
अक्षय ने त्याच्या सोशल मीडिया अकाउंट वर त्याच्या आगामी ‘शंभू’ चा म्युझिक व्हिडिओचा टीझर रिलीज केला आहे.
याअगोदर अक्षय ने त्याच्या ‘OMG 2’ या सिनेमामध्ये भगवान महादेवाची भूमिका साकारली होती. आता परत एकदा तो महादेवाची भूमिका साकारून आपल्या फॅन्सना वेड लावण्यासाठी सज्ज झाला आहे.
‘शंभू’ गाण्याला अक्षय कुमार ने दिला आवाज
या गाण्यामध्ये अक्षय कुमार फक्त महादेवाच्या भूमिकेत दिसणारच नाही तर त्याने ते गाणं स्वतः गायले देखील आहे . त्याने ‘शंभू’ या गाण्याला आपला आवाज दिला आहे.
अक्षय कुमार सोबतच त्याचे सहगायक विक्रम मॉन्ट्रोज आणि सुधीर यदुवंशी हे देखील आहेत.
गणेश आचार्य यांनी हा म्युझिक व्हिडिओ डायरेक्ट केला आहे. या गाण्याचे लिरिक्स अभिनव शेखर यांनी लिहिले आहे, तर विक्रम मॉन्ट्रोज हे संगीतकार आहेत.
अक्षय चे हे गाणे खूप लोकांना आवडू लागले आहे हे त्याच्या कंमेंट बॉक्समधील कंमेंट्स ने दिसून येत आहे.
askahy kumar shambhu song release date | कधी रिलीज होणार अक्षय कुमारचं ‘शंभू’ गाणं
अक्षय कुमार ने ३ फेब्रुवारी २०२४ रोजी त्याच्या आगामी ‘शंभू’ या गाण्याचा जबरदस्त टीजर सोशल मीडिया अकाउंट वर शेअर केला आहे. टीझरमध्ये अक्षय कुमार महादेवच्या भूमिकेत तांडव करताना दिसत आहे.
‘शंभू’ च्या अवतारात त्याने आपल्या फॅन्स ची मने जिंकली आहेत असे दिसून येते. सोबतच त्याने या गाण्याची रिलीज डेट देखील सांगितली आहे.
५ फेब्रुवारी २०२४ ला हे गाणे रिलीज होणार आहे. अक्षय ने त्याच्या कॅप्शनमध्ये ‘जय महाकाल’ असे लिहून पोस्ट शेअर केली आहे.
Akshay kumar upcoming movies 2024
अक्षय कुमारच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचे झाले तर तो बडे मियाँ छोटे मियाँ, वेलकम टू द जंगल, सिंघम 3, स्टार्टअप आणि स्काय फोर्स यांसारख्या सिनेमांमध्ये दिसणार आहे.
DONT MISS: The Crew Bollywood Movie 2024