all india rank movie release date

वरुण ग्रोव्हरच्या ‘ऑल इंडिया रँक ‘ या सिनेमाचा ट्रेलर रिलीज!! या दिवशी होणार सिनेमा रिलीज

“ऑल इंडिया रँक” सिनेमातून लेखक वरुण ग्रोव्हर डायरेक्टर म्हणून एन्ट्री करणार आहे. चला तर मग पाहूया all india rank movie release date

All India Rank Movie- Watch Here Trailer

all india rank movie cast

या सिनेमात शशी भूषण, बोधिसत्व शर्मा, समता सुदीक्षा, नीरज आयुष पांडे, गीता अग्रवाल, सआदत खान आणि शीबा चड्ढा यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा सिनेमा श्रीराम राघवन यांनी सादर केला आहे.

all india rank movie trailer

आज विकी कौशलने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर सिनेमाचा ट्रेलर शेअर केला आहे. विकी कौशल ने  ट्रेलर शेअर करत कॅप्शन मध्ये लिहिले आहे कि , “हम दोनो इंजिनियर्स का सिनेमा की दुनिया में सफर लगभाग साथ ही शुरू हुआ… मसान. “साला ये दुख काहे खतम नहीं होता बे!” त्यांनी लिहिलेली एक ओळ गेल्या काही वर्षांत माझ्या फिल्मोग्राफीमधील सर्वात उल्लेखनीय सीन्सपैकी एक म्हणून विकसित झाली आहे.

‘All INDIA RANK’ चा ट्रेलर सादर करताना मला खूप आनंद आणि अभिमान वाटतो… माझा प्रिय आणि अविश्वसनीय प्रतिभावान मित्र #VarunGrover चे दिग्दर्शनीय पदार्पण. शाईन ऑन मेरे भाई आणि संपूर्ण टीमला माझ्या शुभेच्छा.”

Image Source: Instagram

all india rank movie story

या सिनेमाच्या ट्रेलर मध्ये विवेक नावाच्या मुलाची स्टोरी दाखवण्यात आली आहे. ज्याच्यावर त्याच्या पालकांकडून आयआयटीमध्ये जाण्यासाठी दबाव टाकला जात आहे.

हा सिनेमा घर सोडून आयआयटीयन होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या किशोरवयीन मुलांमधील तीव्र स्पर्धा आणि आयुष्यातील एक नवीन टप्पा सुरु करण्याची आव्हाने दाखवतो.

तसेच पालकांच्या जास्त अपेक्षांमुळे आयआयटी मध्ये प्रवेश मिळवण्याच्या स्वप्नाव्यतिरिक्त ‘ऑल इंडिया रँक ‘ मिळवण्याचा दबाव कसा किशोरवयीन मुलांच्या टेन्शन मध्ये भर घालतो असे ट्रेलर मधून दिसून येते.

all india rank movie 2024

‘ऑल इंडिया रँक’ या सिनेमाने फेब्रुवारी २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलच्या  रॉटरडॅममध्ये त्याच्या जागतिक प्रीमियरमुळे सुरुवातीपासूनच उच्चांक गाठला होता.

त्यांनतर या सिनेमाने २०२३ मध्ये झालेल्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल रॉटरडॅम, इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ लॉस अँजेलिस, इंडियन फिल्म फेस्टिवल मेलबर्न आणि Jio MAMI मुंबई फिल्म फेस्टिवल या कार्यक्रमांचे लक्ष देखील आपल्याकडे वेधून घेतले.  

all india rank movie varun grover

पहिल्यांदाच वरुण ग्रोव्हर डायरेक्टर म्हणून काम करणार आहे. याअगोदर त्याने स्टँड-अप कॉमेडियन, लेखक आणि गीतकार म्हणून यशस्वी कारकीर्द गाजवली आहे. त्याच्या पहिल्या पटकथा ‘मसान’ ला ६८ व्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये खूप प्रशंसा आणि ओळख मिळाली होती.

अजून सांगायचे झाले तर ‘दम लगा के हैशा’ या  सिनेमातील त्याच्या गीतात्मक योगदानासाठी त्याला नॅशनल फिल्म अवॉर्ड मिळाला होता.

अलीकडेच रिलीज झालेल्या ‘मोनिका ओ माय डार्लिंग’, ‘उडता पंजाब’, ‘फॅन’ आणि ‘गँग्स ऑफ वासेपूर’ या सिनेमातील विविध गाण्यांसाठी त्याने गीतलेखन देखील केले आहे.

all india rank movie release date

वरुण ग्रोव्हर ने सोशल मीडियावर लिहिले कि , “आमच्या हृदयाचा एक भाग, 23 फेब्रुवारी 2024 रोजी थिएटरमध्ये तुमच्यासाठी येत आहे. दिग्दर्शक म्हणून माझा पहिला चित्रपट – कान्ट वेट फॉर द वर्ल्ड टू सी .”

ALSO READ : Grammy Awards 2024 Winners

Leave a Comment