अहान पांडे ची होणार बॉलीवूड एन्ट्री!!
लवकरच यशराज फिल्म्समध्ये ahaan panday bollywood debut दिसणार आहे. यशराज फिल्म्सचे हेड आदित्य चोप्रा यांनी नेहमीच देशातील उत्तम कलागुणांचा शोध घेण्याची तळमळ दाखवून दिली आहे. त्यांनी सध्याच्या जनरेशनला दोन मोठे स्टार्स दिले ते म्हणजे रणवीर सिंग आणि अनुष्का शर्मा ज्यांनी त्यांच्या ऍक्टिंग ने सगळ्यांना मोहित केले होते.
ahaan panday debut
आदित्य चोप्रा आता अहान पांडेला बॉलीवूड एन्ट्री साठी तयार करत आहेत त्यांना वाटते अहान मध्ये भारतातील उत्तम अभिनेत्यांपैकी एक बनण्याची क्षमता आहे.
पाच वर्षांपूर्वी आदित्य चोप्राने अहानला YRF टॅलेंट म्हणून वैयक्तिकरित्या तयार केलेल्या तीव्र ट्रेनिंग प्रोग्राममधून जाण्यासाठी साइन केले होते. जेणेकरुन त्याच्या सर्वोत्तम क्षमतेनुसार एक मोठा चित्रपट साइन करता येईल.
अहानची मोठ्या पडद्यावर येण्याची प्रतीक्षा आता संपली आहे कारण तो YRF आणि मोहित सुरीच्या यंग लव्हस्टोरी मध्ये काम करणार असल्याचे कन्फर्म झाले आहे.
ahaan panday debut movie
who is ahaan panday
अनन्या पांडे च्या पावलावर पाऊल ठेवत, पांडे कुटुंबातील आणखी एक सदस्य रुपेरी पडद्यावर चमक दाखवण्याच्या तयारीत आहे. तो दुसरा कोणी नसून अनन्याचा चुलत भाऊ अहान पांडे आहे.
अहान हा चंकी पांडेचा भाऊ चिक्की पांडे यांचा मुलगा आहे. 26 वर्षीय अहान पांडे मोहित सुरी दिग्दर्शित रोमँटिक सिनेमातून एन्ट्री करणार आहे, मोहित सुरी हा त्याच्या हमारी अधुरी कहानी, आशिकी 2 आणि मलंग सारख्या सिनेमांसाठी ओळखला जातो.
बॉलीवूडमध्ये अहानच्या लाँच साठी यशराज फिल्म्सचे आदित्य चोप्रा यांनी पाठिंबा दिला आहे.
Mohit suri upcoming movies
बातमीनुसार असे सांगण्यात येत आहे की ,”अहानची ओळख मोहित सुरीशी करून देण्यात आली होती जेणेकरून डायरेक्टर मोहित सुरी त्याच्या सिनेमाच्या टायटल आणि बेस्ट रोमँटिक ऍक्टर साठी तो योग्य अभिनेता आहे की नाही हे जाणून घेऊ शकेल.
अहानने मोहितच्या देखरेखीखाली काम केले आणि त्यासोबतच खूप साऱ्या ऑडिशन्स आणि स्क्रीन टेस्ट देखील दिल्या. मोहित ला एक फ्रेश, यंग चेहरा पाहिजे होता जो मोठ्या पडद्यावर हिरो साकारण्याचे सामर्थ्य ठेवेल, शेवटी मोहीतला त्याच्या बद्दल विश्वास आहे आणि तो अहानच्या सामर्थ्याबद्दल खूप उत्सुक असल्याचे देखील दिसून आले आहे.”
ahaan panday bollywood debut
अहान पांडे आणि अनन्या पांडे अनेक प्रसंगी एकत्र दिसतात. नुकत्याच त्याच्या बहिणीच्या अलना पांडे यांच्या ब्राइडल शॉवर कार्यक्रमामध्ये दिसून आले होते. जिथे अहान आणि अनन्या यांनी कपल सोबत पोझ देत फोटो काढले होते.
अहान पांडेने मुंबईतील लोल्लापलूजा संगीत महोत्सवालाही भेट दिली होती . या कार्यक्रमात जोनास ब्रदर्स, स्टिंग, हॅल्सी आणि लौव यांचे परफॉर्मन्स सादर करण्यात आले होते .
‘एक व्हिलन’, ‘आशिकी 2’, आणि इतर सिनेमांसाठी प्रसिद्ध असलेल्या मोहित सुरीसोबत यशराज फिल्म्स एकत्र काम करणार आहेत.
सिनेमाचे नाव अद्याप बाकी आहे, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षय विधानी यांची हि पहिली निर्मिती असणार आहे, ज्याला आदित्य चोप्रा यांनी पाठिंबा दिला आहे. या वर्षाच्या अखेरीस सिनेमाचे शूटिंग सुरू होणार आहे.
ALSO READ : लव्ह स्टोरीया: करण जोहर सांगणार खऱ्या प्रेमाची कहाणी