लव्ह सेक्स और धोका २: ‘बिग बॉस ‘ फेम निमरित कौर अहलुवालिया करणार बॉलीवूड मध्ये एन्ट्री !!
love sex aur dokha 2 release date: ‘बिग बॉस सीजन १६’ मध्येच एकता कपूरने तिच्या LSD 2 सिनेमाची घोषणा केली होती. तेव्हाच तिने या सिनेमात निमरित कौर अहलुवालिया ला कास्ट करणार असल्याचे सांगितले होते.
एकता कपूरने नुकतेच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर दिबाकर बॅनर्जी यांच्या डायरेक्शनखाली बनत असलेल्या या सिनेमाचे नवीन पोस्टर शेअर केले असून सिनेमाच्या रिलीजची डेट देखील जाहीर केली आहे.
love sex aur dhoka 2 news
love sex aur dokha 2 release date: दिबाकर बॅनर्जी आणि एकता कपूर यांचा ‘लव्ह सेक्स और धोका’ सिनेमा १३ वर्षानंतर पुन्हा एकदा थिएटर मध्ये येण्यासाठी तयार झाला आहे.
२०२२ मध्ये डायरेक्टर एकता कपूर ने सलमान खानच्या बिग बॉस 16 च्या शोमध्ये तिच्या या सिनेमाचा दुसरा भाग येणार असल्याचे सांगितले होते.
तसेच तिने दिबाकर बॅनर्जीसोबत बिग बॉसमध्ये LSD 2 ची घोषणा करण्याबरोबरच, तिने टीव्हीवरील ‘छोटी सरदारनी’ निमरित कौर अहलुवालिया ला सिनेमासाठी फायनल केले होते.
२०२३ मध्येच एकता कपूरने तिच्या ‘लव्ह सेक्स और धोका २’ या सिनेमाचे पोस्टर शेअर केले होते. आणि आता अलीकडेच व्हॅलेंटाईनच्या निमित्ताने तिने दुसरे पोस्टर शेअर करून तिच्या फॅन्स लोकांना सरप्राईज दिले आहे.
love sex aur dhoka 2 movie update
एकता कपूरने शेअर केले LSD 2 चे नवीन पोस्टर
एकता कपूरही हा व्हॅलेंटाईनचा वीक सेलिब्रेट करण्यापासून मागे राहिलेली नाही आहे. प्रेमाच्या या सिजनमध्ये, तिने तिच्या आगामी सिनेमा LSD 2 चे नवीन पोस्टर आपल्या फॅन्स सोबत शेअर केले आहे.
तिने तिचा ऑफिसिअल ट्विटर अकाउंट वर नवीन पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये रंगीबेरंगी हृदयाचा फोटो दिसत आहे, ज्यामध्ये ते धडधडताना दिसत आहे.
पोस्टरमध्ये हृदयावर वेगवेगळ्या प्रकारचे इमोजी, व्हॉट्सॲप आणि यूट्यूब असलेले लोगो दिसत आहेत व त्यातून थोडेसे रक्त बाहेर येत असल्याचे दिसून येते.
एकता कपूरने पोस्टर शेअर करत लिहिले की, “ये वैलेंटाइन डे नहीं आसान, बस इतना समझ लीजिये, LSD 2 का दरिया है और डूब के जाना है”
love sex aur dokha 2 star cast
या दिवशी थिएटर मध्ये रिलीज होणार LSD 2
एकता कपूर आणि दिबाकर बॅनर्जी यांनी सिनेमाचे पोस्टर शेअर केले, पण या सिनेमाच्या स्टार कास्टबद्दल कोणताही अपडेट शेअर केलेला नाही.
निमरित कौर अहलुवालियानेही तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एकता कपूरच्या LSD 2 सिनेमाचे पोस्टर शेअर केले आहे.
love sex aur dhoka 2 movie story
काय आहे सिनेमाची स्टोरी ?
हा सिनेमा आजकालच्या इंटरनेटच्या दुनियेत मॉडर्न प्रेमाचे लपलेले वेगवेगळे पैलू उलघडणार आहे. तसेच नात्यातील गुंतागुंतही दाखवणार आहे.
तसेच या सिनेमाची स्टोरी मनोरंजक कथनांसह टेकनॉलॉजिवर चालत असलेल्या दुनियेचे प्रेम, धोका आणि त्यांच्या परिणामांवर खोलवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहे.
love sex aur dhokha 2 release date
डायरेक्टर ने या त्यांच्या अडल्ट सिनेमाचे पोस्टर शेअर करण्यासोबतच सिनेमाची रिलीज डेट देखील जाहीर केली आहे. १९ एप्रिल २०२४ ला हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
सिनेमाचा पहिला भाग ठरला होता हिट!!
सिनेमाच्या पहिल्या भागाबद्दल बोलायचे झाले तर त्यात राजकुमार राव, नुसरत भरुचा, आशिष शर्मा,अंशुमन झा, नेहा चौहान, आणि अमित साल यांसारखे ऍक्टर होते. या सिनेमाचे दिग्दर्शनही दिबाकर बॅनर्जी यांनी केले होते.
ALSO READ : ‘सरफिरा’ अक्षय कुमारच्या नव्या सिनेमाची घोषणा, दिसणार ‘सरफिरा’ स्टाईल मध्ये