अल्लू अर्जुन चा पुष्पा २ रिलीज होण्यापूर्वीच समोर आले पुष्पा ३ बद्दल मोठे अपडेट!!
pushpa 2 update marathi: साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनने त्याच्या पुष्पा या सिनेमाद्वारे फॅन्सच्या मनात एक विशेष जागा बनवली आहे.
त्याच्या पुष्पा-द राइज या सिनेमाच्या मोठ्या यशानंतर, आता त्याच सिनेमाचा दुसरा भाग अर्थात पुष्पा-द रुल काही महिन्यांनी थिएटर मध्ये रिलीज होणार आहे.
अशातच या सिनेमाच्या तिसऱ्या पार्ट बद्दल एक मोठे अपडेट समोर आले आहे.
pushpa 2 update marathi
पुष्पा सिनेमानंतर अल्लू अर्जुनच्या फॅन्सच्या संख्येत मोठी वाढ झालेली दिसून आली. पुष्पा त्याच्या करिअर मधील सर्वात हिट सिनेमा बनून अल्लू अर्जुनला एक नवीन ओळख दिली.
येत्या काही दिवसांमध्ये अल्लू अर्जुन पुष्पा- द रुल म्हणजेच पुष्पा २ या सिनेमात दिसणार आहे.
जेव्हा या सिनेमाचा टीझर रिलीज झाला होता तेव्हा त्याच्या फॅन्समध्ये खूपच उत्सुकता दिसून आली. आणि अशातच अल्लू अर्जुन ने पुष्पा फ्रँचायझीच्या तिसऱ्या पार्ट बद्दल अपडेट दिले आहे, हे कळताच त्याच्या फॅन्सची उत्सुकता नक्कीच वाढणार आहे.
pushpa 2 news in marathi
पुष्पा 3 बद्दल अल्लू अर्जुन काय म्हणाला?
अल्लू अर्जुन ने मागच्या वर्षी वाढदिवसानिमित्त पुष्पा:२ चा टीझर केला होता. जो सगळ्यांनाच आवडला होता.
या सिनेमाच्या फ्रँचायझीबद्दल फॅन्समध्ये खूप हाईप आहे आणि सगळेजण पुष्पा:२ च्या रिलीजची आतुरतेने वाट बघत आहेत. पण त्याअगोदरच डायरेक्टर सुकुमारच्या पुष्पा फ्रँचायझीबद्दल एक मोठे अपडेट समोर आले आहे.
अलीकडेच एका न्यूज रिपोर्टनुसार,अल्लू अर्जुनला त्याचा पुष्पा सिनेमाच्या तिसऱ्या पार्ट बद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा त्याला उत्तर देताना तो म्हणाला कि- का नाही, तुम्ही पुष्पा पार्ट ३ साठी नक्कीच अपेक्षा करू शकता. आम्ही या सिनेमाची फ्रँचायझी पुढे नेण्यासाठी संपूर्ण प्लानिंग केली आहे.
यासाठी आमच्याकडे बऱ्याच अशा चांगल्या कल्पना देखील आहेत, ज्यामुळे भविष्यात ते अजून मनोरंजक करता येईल. अशाप्रकारे, अल्लू अर्जुनने पुष्पा 2 रिलीज होण्याअगोदरच पुष्पा ३ बद्दल माहिती दिली आहे. ही बातमी कळताच फॅन्सच्या आनंदाला काही सीमा राहिलेली नाही.
pushpa 2 release date marathi
कधी रिलीज होणार पुष्पा २?
पुष्पा २ च्या रिलीजसाठी सगळेच जण खूप उत्सुक आहेत. अल्लू अर्जुन ने त्याच्या सिनेमाच्या पोस्टर मध्ये हा सिनेमा १५ ऑगस्ट २०२४ ला थिएटर मध्ये रिलीज होणार असल्याचे सांगितले आहे. तसेच पुन्हा एकदा रश्मिका मंधाना अल्लू अर्जुनसोबत रोमान्स करताना दिसून येणार आहे.
DON’T MISS: लव्ह सेक्स और धोका २: ‘बिग बॉस ‘ फेम निमरित कौर अहलुवालिया करणार बॉलीवूड मध्ये एन्ट्री !!