बिग बॉस 18: सलमान खान टीव्हीवरील सर्वाधिक मानधन घेणारा होस्ट, त्याची फी ऐकून तुम्हाला धक्का बसेल!
salman khan bigg boss fees : सलमान खान पुन्हा एकदा बिग बॉस 18 होस्ट करताना दिसत आहे, आणि यावेळी त्याने टीव्हीवरील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या होस्टचा किताब पटकावला आहे.
bigg boss fees of salman khan
सर्वाधिक चर्चेत असणारा आणि वादग्रस्त शो बिग बॉस सुरू झाल्याचे फक्त काहीच दिवस झाले आहेत, पण आधीच घरात स्पर्धकांमध्ये खटके उडायला सुरुवात झाली आहे.
स्पर्धकांच्या एंट्रीनंतर भांडणं आणि गोंधळ सुरू झाले, आणि शोमध्ये ट्विस्ट्सचा धमाका सुरू झाला आहे. हेच ट्विस्ट्स प्रेक्षकांना खिळवून ठेवतात.
मात्र, बिग बॉसचा सर्वात मोठा आकर्षण सलमान खानचा ‘वीकेंड का वार’ आहे, जिथे तो स्पर्धकांना धडे शिकवताना दिसतो.
पण तुम्हाला माहित आहे का, या शोसाठी सलमान खान किती पैसे घेतो? त्याची कमाई ऐकून तुमचं डोकं गरगरायला लागेल, कारण तो आता टीव्हीवरील सर्वाधिक मानधन घेणारा होस्ट बनला आहे!
salman khan bigg boss fees
सलमान खान आणि बिग बॉस हे गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांचे समानार्थी शब्द बनले आहेत. प्रेक्षकांना शो पाहताना जितका बिग बॉसचा थरार अनुभवायला मिळतो, तितकाच सलमान खानचा अंदाजही आवडतो.
त्यामुळेच काही जण तर हा शो ‘सलमान खानचा शो’ म्हणूनच ओळखतात. आता यावर्षी सलमान नेमके किती मानधन घेतो, ते ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल!
bigg boss 18 salman fees per episode
सलमान खानची तगडी फी
रिपोर्टनुसार, सलमान खान महिन्याला तब्बल 60 कोटी रुपये बिग बॉससाठी घेतो. होय, एका महिन्यात एवढी मोठी रक्कम तो शोमधून कमावतो. विशेष म्हणजे, या सीझनमध्ये त्याने मागील सीजन पेक्षा त्याची फी वाढवली आहे.
जर बिग बॉस 15 आठवडे सुरू राहिला, तर सलमान खान तब्बल 260 कोटी रुपये आपल्या खात्यात जमा करणार आहे!
bigg boss 18 salman fees per episode
सलमान 2010 पासून बिग बॉस होस्ट करत आहे, आणि दरवर्षी तो स्पर्धकांना योग्य ते धडे देताना दिसतो. यंदाच्या हंगामातही, तो प्रेक्षकांसाठी मनोरंजन आणि स्पर्धकांची कडक क्लास घेणार, यात शंका नाही!
हे देखील वाचा : व्हायरल झाली अमिताभ आणि जया बच्चन यांची लग्नपत्रिका, कारण जाणून घ्या!