बाहुबली ऍक्टर प्रभास भाड्याच्या घरात शिफ्ट, किंमत ऐकून बसेल धक्का!
actor prabhas latest news: प्रभास यावेळी त्याच्या नवीन घरामुळे फॅन्सचे लक्ष वेधून घेत आहे, जे त्याने भाड्याने घेतले आहे. अशी बातमी आली आहे कि काही दिवसांपूर्वीच प्रभास लंडन ला शिफ्ट झाला आहे.
प्रशांत नील ने डायरेक्ट केलेला ‘सलार’ हा सिनेमा हिट झाल्यानंतर प्रभास आता त्याच्या पुढच्या सिनेमाच्या तयारीत आहे. सध्या त्याच्याकडे नाग अश्विनचा कल्की २८९८ एडी आणि डायरेक्टर संदीप रेड्डी वंगा यांचा ‘स्पिरिट’ हा सिनेमा आहे. आणि अशातच प्रभास ने काही दिवसांसाठी ब्रेक घेतल्याची माहिती समोर येत आहे.
प्रभास त्याच्या येणाऱ्या सिनेमांमुळे व्यस्त असला तरी नुकतेच एका गोष्टीमुळे तो पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे. प्रभास यावेळी त्याच्या नवीन घरामुळे फॅन्सचे लक्ष वेधून घेत आहे, जे त्याने भाड्याने घेतले आहे. अशी बातमी आली आहे कि काही दिवसांपूर्वीच प्रभास लंडन ला शिफ्ट झाला आहे.
सलार आणि बाहुबली सिनेमाने सगळ्या जगात ओळख निर्माण केलेल्या प्रभासने यूकेच्या राजधानीमध्ये एक आलिशान घर भाड्याने घेतले आहे.
prabhas rented house in london
किती आहे भाडे ?
गेल्या काही दिवसांपासून सिनेमाच्या शूटिंग मध्ये व्यस्त असल्या कारणाने त्याने त्याच्या तब्येतीवर लक्ष देण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले आहे. सध्या काही दिवस तो आराम करणार असल्याचे बोलले जात आहे.
मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात प्रभास च्या गुडघ्यावर सर्जरी करण्यात आली होती. यामुळेच त्याने स्वतःवर लक्ष देण्यासाठी लंडन मध्ये एक घर भाड्याने घेतले आहे, ज्याचे दर महिन्याचे भाडे ६० लाख रुपये एवढे आहे.
actor prabhas latest news
प्रभास ने घेतला ब्रेक!
सध्या प्रभासचे दोन मोठ्या सिनेमांवर काम चालू आहे. यामध्ये ‘कल्की २८९८ एडी’ आणि दुसरा ‘राजा साब’ या सिनेमांचा समावेश आहे. आणि या सिनेमांच्या शूटिंग दरम्यानच प्रभासने स्वतःसाठी थोडा वेळ काढला आहे.
बातमीनुसार,असे सांगण्यात येत आहे कि, जोपर्यंत प्रभास आता भारतामध्ये पोहचून आपले काम परत स्टार्ट करत नाही तोपर्यंत तो आपल्या लंडनच्या घरात राहणार आहे. परंतु प्रभास त्याच्या लंडन च्या घरात किती दिवस राहणार आहे याबाबत अजून कोणतीही बातमी मिळाली नाही.
prabhas upcoming movies
या तीन सिनेमांमध्ये दिसणार प्रभास!
प्रभासच्या येणाऱ्या सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर, डायरेक्टर नाग अश्विन ने डायरेक्ट केलेल्या ‘कल्की २८९८ एडी’ मधून मोठ्या पडद्यावर चमकणार आहे, हा सिनेमा ९ मे २०२४ ला थिएटर मध्ये रिलीज होणार आहे.
या सिनेमात बरेच कलाकार एकत्र दिसणार आहेत ज्यामध्ये अमिताभ बच्चन, कमल हासन, दीपिका पदुकोण आणि दिशा पटानी हे देखील महत्त्वाच्या रोल मध्ये दिसणार आहेत.
त्यांनतर प्रभास ‘द राजा साब’ या हॉरर-कॉमेडी ची शूटिंग करणार आहे. आणि ऍनिमल डायरेक्टर संदीप रेड्डी वंगा यांच्या ‘स्पिरिट’ मध्ये प्रभास पोलिसाच्या रोल मध्ये दिसणार आहे.
ALSO READ : रणबीर कपूरच्या ॲनिमल पार्कमधून बॉबी देओल चा पत्ता कट, हा अभिनेता होणार व्हिलन!