actor yash at general store

साऊथ चा सुपरस्टार यशने पत्नी राधिकासाठी किराणा दुकानात जाऊन खरेदी केली टॉफी… सुपरस्टारचा साधेपणा पाहून चाहते थक्क!!

actor yash at general store: कोणत्याही सुपरस्टार ला एखाद्या दुकानासमोर उभा असलेला पाहून कोणालाही आश्चर्यकारक वाटेल. मात्र नुकतेच KGF स्टार यशनेही असेच काहीसे केले आहे.

काही दिवसांपूर्वी यश अशाच एका किराणा दुकानातून कँडी खरेदी करत असताना दिसला. जेव्हा त्याचा हा फोटो सोशल मीडिया वर व्हायरल झाला तेव्हा त्याच्या फॅन्स कडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

actor yash at general store

जनरल स्टोअरमधून यशने खरेदी केली पत्नीसाठी टॉफी!!

सिनेमातील सुपरस्टार आपल्याला नेहमीच जनरल स्टोअर च्या दुकानात दिसतील असे होत नाही. मात्र KGF सुपरस्टार यशच्या बाबतीत असेच काहीसे घडले आहे.

यशला त्याचे फॅन्स रॉकिंग स्टार म्हणतात. नुकताच तो काही दिवसांपूर्वी किराणा दुकानात दिसला होता. एका किराणा दुकानात तो उभे असलेले फोटो सोशल मीडियावर दिसले आणि काही क्षणातच ते व्हायरल झाले.

असे सांगण्यात येत आहे कि, यश मंदिरात दर्शन घेण्यासाठी जात होता तेव्हाच तो एका किराणा दुकानात थांबून त्याच्या पत्नी आणि अभिनेत्री राधिका पंडितसाठी आईस कँडी विकत घेत असल्याचे दिसून आले.

यशच्या या छोट्याशा कृतीचे देशभरातील फॅन्स ने कौतुक केले आहे. यश ला सुपरस्टारचा दर्जा असून देखील तो डाउन टू अर्थ असल्याबद्दल त्याच्या फॅन्सने त्याचे कौतुक केले आहे.

Image Source: Twitter

yash with wife radhika pandit

यश च्या पर्सनल लाईफ बद्दल सांगायचे झाले तर, यश आणि त्याची पत्नी राधिका पंडित  यांची ओळख २००७ मध्ये आलेल्या ‘नंदा गोकुळा’ या सिनेमात काम करताना झाली होती.

दोघे लवकरच चांगले मित्र झाले आणि एकमेकांसोबत खूप वेळ एकत्र घालवू लागले. आणि जसे बऱ्याच कपल मध्ये डेटींग करत असल्याची अफवा पसरते तसेच त्यांच्या तिसऱ्या सिनेमा ‘मिस्टर अँड मिसेस रामाचारी’ नंतर ती शंका अजून वाढली.

actor yash wife radhika pandit

शेवटी, या कपलने २०१६ मध्ये साखरपुडा केला आणि लगेच ९ डिसेंबर २०१६ रोजी लग्न केले. त्याचे लग्न खूप प्रायव्हेट होते, त्यांच्या लग्नामध्ये फक्त जवळचे मित्र आणि कुटुंब उपस्थित होते.

या सुंदर कपल ला आर्य आणि यथर्व नावाची दोन मुले देखील आहेत. यश आणि राधिका अनेकदा सोशल मीडिया वर ऍक्टिव्ह असतात आणि त्यांच्या आयुष्याची झलक सोशल मीडियाद्वारे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत  देत असतात.

actor yash upcoming movies

यशचे आगामी सिनेमे

यश हा शेवटचा प्रशांत नीलच्या ॲक्शन थ्रिलर ‘KGF: Chapter 2’ मध्ये दिसला होता, ज्यात अनुष्का शेट्टी, संजय दत्त, रवीना टंडन, प्रकाश राज यांनी देखील काम केले होते.

आता सुपरस्टार यश गीतू मोहनदासच्या ‘टॉक्सिक’ या सिनेमात दिसणार आहे. असेही सांगण्यात येत आहे कि या सिनेमासाठी शाहरुख खान आणि करीना कपूर यांना देखील अप्रोच करण्यात आले आहे.

मात्र अद्याप डिरेक्टरने सिनेमाच्या कास्टिंग बद्दल कोणतीही ऑफिसिअल माहिती दिलेली नाही.

ALSO READ: अल्लू अर्जुन चा पुष्पा २ रिलीज होण्यापूर्वीच समोर आले पुष्पा:३ बद्दल मोठे अपडेट!!

Leave a Comment