amitabh bachchan in ramayan

रामायण: अमिताभ बच्चन होणार राजा दशरथ, नितेश तिवारीच्या ‘रामायण’ साठी ही नावे फायनल?

amitabh bachchan in ramayan: नितेश तिवारी यांचा सिनेमा ‘रामायण’ गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. या सिनेमात रणबीर कपूर प्रेक्षकांना वेगळ्या अवतारात बघायला मिळणार आहे.

सध्या रामायणातील भगवान रामाच्या रोलसाठी रणबीर कपूरचे नाव जवळपास फायनल झाले आहे. आणि आता इतर कलाकारांची माहिती देखील समोर आली आहे.

nitesh tiwari ramayan

डायरेक्टर नितीश तिवारी यांच्या  ‘रामायण’ सिनेमाने फिल्मी दुनियेत प्रचंड धुमाकूळ घातला आहे. या सिनेमाच्या स्टारकास्ट बद्दल प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता दिसून येत आहे.

राम आणि सीतेच्या रोलसाठी रणबीर कपूर आणि सई पल्लवी यांची नावे जवळपास फायनल झाली आहेत. अशातच आता इतर स्टारकास्टचीही नावे समोर येत आहेत.

nitesh tiwari ramayan update

‘रामायण’ मध्ये दिसणार अजून एक मोठा कलाकार

गेल्या अनेक दिवसांपासून डायरेक्टर नितेश तिवारींचा ‘रामायण’ सिनेमा चर्चेचा विषय बनला आहे. ३५० कोटींच्या बजेटमध्ये बनत असलेल्या या सिनेमात ‘राम’ आणि ‘सीता’ व्यतिरिक्त आता राजा दशरथाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचे नाव समोर आले आहे.

बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध कलाकाराला ‘राम’ म्हणजेच रणबीर कपूरच्या वडिलांच्या भूमिकेत कास्ट केल्याची बातमी चालू आहे.

Image Source: Google

amitabh bachchan in ramayan

हा अभिनेता साकारणार राजा दशरथाची भूमिका

बॉलीवूड चे शेहंशाह अमिताभ बच्चन राजा दशरथच्या भूमिकेत दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या बोलण्याच्या शैलीवर व आवाजावर काम सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

यासाठी वेगळी टीम तयार करण्यात आली आहे. तसेच, वेशभूषा आणि त्यांच्या लूकवर देखील विशेष लक्ष देण्यात येत आहे.

अलीकडेच अमिताभ बच्चन यांना श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी निमंत्रण मिळाले होते. २२ जानेवारीला अयोध्येला आल्यानंतर ते पुन्हा एकदा रामनगरीत आले. आणि श्रीरामाचे दर्शन देखील घेतले.

nitesh tiwari ramayan cast

‘रामायण’ ची स्टार कास्ट

रणबीर कपूर आणि सई पल्लवी व्यतिरिक्त केजीएफ स्टार यश देखील या सिनेमाचा भाग असणार आहे. प्रेक्षकांना तो यामध्ये रावणाच्या भूमिकेत पाहायला मिळू शकतो. 

याशिवाय हनुमानाच्या रोलसाठी सनी देओलचे नाव समोर येत आहे. रकुल प्रीत सिंह सिनेमात शूर्पणखा बनू शकते.नुकतीच तिने रावणाच्या बहिणीच्या रोलसाठी लुक टेस्टही दिली आहे.

तर लारा दत्ता कैकेयीच्या रोलमध्ये दिसणार आहे. मात्र, डायरेक्टर यांनी अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

ALSO READ : ‘ॲनिमल’ नंतर रणबीर आता या पाच सिनेमांनी करणार बॉक्स ऑफिस वर धमाका!!

Leave a Comment