amitabh bachchan news marathi

व्हायरल झाली अमिताभ आणि जया बच्चन यांची लग्नपत्रिका; त्या खास चार ओळींमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय, कारण जाणून घ्या!

amitabh bachchan news marathi : आमिर खानने मजेत विचारलं, ‘अमिताभ सर, तुम्हाला तुमच्या लग्नाची तारीख आठवते का?’ अमिताभ हसत म्हणाले, ‘3 जून 1973.’ पण त्यानंतर जो गमतीशीर किस्सा घडला, तो ऐकून खुद्द अमिताभलाही हसू आवरलं नाही!

amitabh bachchan wedding pictures

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांचे लग्न आजपासून तब्बल 51 वर्षांपूर्वी झाले होते, आणि त्यांची लग्नपत्रिका सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

या पत्रिकेच्या व्हायरल होण्यामागे कारण आहे अभिनेता आमिर खान! ‘कौन बनेगा करोडपती 16’ च्या विशेष एपिसोडमध्ये आमिर आले होते, जो अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त 11 ऑक्टोबरला प्रसारित होणार आहे.

या एपिसोडमध्ये अमिताभ सरांनी त्यांच्या लग्नाबद्दल काही खास आठवणी शेअर केल्या. मंचाची शोभा वाढवत, आमिर खान आणि त्यांचा मुलगा जुनैद खान हे खास पाहुणे म्हणून उपस्थित होते.

kaun banega crorepati 2024

3 जून 1973 रोजी अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचा विवाह त्यांच्या जवळच्या मित्रांसमवेत एक खास आणि आनंददायी सोहळा म्हणून साजरा झाला.

कौन बनेगा करोडपती‘ च्या खास एपिसोडमध्ये, आमिर खानने मजेत अमिताभ सरांना विचारलं, ‘तुम्हाला तुमच्या लग्नाची तारीख आठवते का?’ अमिताभ हसत म्हणाले, ‘हो, 3 जून 1973.’ यावर आमिरची मस्ती सुरूच होती, तो म्हणाला, ‘तुमच्याकडे काय पुरावा आहे? कारण माझ्याकडे तुमच्या लग्नाची पत्रिका आहे.

मी तुमचा जबरदस्त चाहता आहे, त्यामुळे तुमची लग्नपत्रिकासुद्धा माझ्याकडे आहे!’ हे ऐकून खुद्द अमिताभलाही हसू आवरलं नाही.

amitabh bachchan wedding card

आमिर खानने ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये बिग बी आणि जया बच्चन यांच्या लग्नाची खास पत्रिका सर्व प्रेक्षकांना दाखवली, ज्याचा प्रोमो सोनी वाहिनीच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

Image credit: Google

amitabh bachchan news marathi

या लग्नपत्रिकेतील खास बाब म्हणजे रामायणातील अयोध्या कांडमधील चौपाई! राम आणि सीता यांच्या विवाहावर आधारित ही चौपाई आहे: ‘जब तें रामु ब्याहि घर आए । नित नव मंगल मोद बधाए’.

पत्रिकेचा एक भाग हिंदीत तर दुसरा भाग इंग्रजीत लिहिलेला आहे. ही अनोखी लग्नपत्रिका सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे!

amitabh bachchan birthday

‘कौन बनेगा करोडपती 16’ मध्ये आमिर खानचा खास एपिसोड अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाच्या दिवशी, म्हणजेच 11 ऑक्टोबरला प्रसारित होणार आहे.

सोनी टीव्हीने या एपिसोडचा प्रोमो शेअर केला आहे, ज्यात प्रेक्षकांना अमिताभ सरांचे अनेक जुने, मजेदार किस्से ऐकायला मिळतील.

या एपिसोडमध्ये बॉलीवूडमधील प्रतिष्ठित कलाकारांची धमाल जुगलबंदीही बघायला मिळणार आहे, जी प्रेक्षकांसाठी एक खास पर्वणी ठरेल!

हे देखील वाचा : बिग बॉसच्या विजेत्या सूरजने 14 लाखांची कमाई केली, पण अभिजीत सावंतने उपविजेत्या म्हणून किती रक्कम मिळवली?

Leave a Comment