बॉलीवूडच्या सर्वात महागड्या लग्नापेक्षाही जास्त अनंत अंबानीच्या प्री वेडिंग चा खर्च!
anant ambani wedding cost: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचे लग्न विशेषत: सध्या गुजरातमधील जामनगरमध्ये झालेल्या विलक्षण प्री-वेडिंग सेलिब्रेशनमुळे चर्चेत आले आहे. अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या कुटुंबातील सर्वात धाकटा मुलगा, अनंतच्या प्री-वेडिंग सोहळ्याने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
भारतातील सर्वात श्रीमंत फॅमिलीपैकी एक म्हणजे अंबानी फॅमिली ! नुकतेच मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि सून राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग उत्सवाचे तीन दिवसांसाठी आयोजित करण्यात आले होते.
या प्री वेडिंग फंक्शन मध्ये बॉलीवूडपासून ते बिल गेट्स आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह जगभरातील मोठ्या लोकांना जामनगरमध्ये आमंत्रित करण्यात आले होते. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी त्यांच्या मुलाच्या प्री वेडिंग मध्ये खूप खर्च केल्याचे दिसून आले.
anant ambani wedding cost
बॉलिवूडमधील सर्वात महागडे लग्न
खास म्हणजे बॉलीवूडमधील सर्वात महागडे लग्न विराट कोहली आणि अनुष्का शर्माचे असल्याचे सांगण्यात येत आहे. बॉलीवूडच्या या सर्वात महागड्या लग्नात अनंत आणि राधिकाच्या लग्नाच्या बजेटपैकी फक्त ५% खर्च झाला असेल.
विराट आणि अनुष्काच्या लग्नाचे बजेट अंदाजे १०० कोटी एवढे होते. मात्र अनंत आणि राधिकाच्या लग्नाचे बजेट विराट आणि अनुष्काच्या बॉलिवूडच्या सर्वात महागड्या लग्नापेक्षा १९००% जास्त आहे.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाचे बजेट हे बॉलीवूड सिनेमाच्या बजेट च्या तिप्पट आहे. या संपूर्ण प्री वेडिंग चा खर्च बॉलिवूडमधील तीन आदिपुरुष सिनेमाच्या बजेट एवढा आहे.
मुकेश अंबानी यांची लग्नासाठी इतका खर्च करण्याची ही पहिलीच वेळ नाही. मुकेश अंबानींची मुलगी ईशा अंबानीपासून त्यांचा मोठा मुलगा आकाश अंबानीपर्यंत, अंबानी कुटुंबातील लग्न आजपर्यंत किती भव्यदिव्य झाले हे दाखवणारे मोठे आकडे एकदा नक्की पहा.
isha ambani wedding card price
ईशा अंबानीच्या लग्न पत्रिकेची किंमत ३ लाख रुपये!
मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी आणि तिचे पती आनंद पिरामला यांच्या लग्न पत्रिकेची किंमत ३ लाख रुपये होती जी बॉक्स आकारामध्ये बनवण्यात आली होती.
पत्रिकेचे पहिले पान एका विस्तृत डिझाइनने सुशोभित केले होते ज्यात सोन्याचा वापर केला होता. तसेच कार्ड उघडल्यावर त्यातून गायत्री मंत्र ऐकायला येत असे.
How much is Isha Ambani wedding dress?
ईशा अंबानीच्या लग्नाचा लेहेंगा ९० कोटी रुपये!
ईशा अंबानीने तिच्या लग्नाच्या दिवशी लेहेंगा घातला होता, ज्याची किंमत 90 कोटी रुपये होती.
अनंत-राधिका ला ४.५ कोटी रुपयांचे एंगेजमेंट गिफ्ट
त्यांच्या एंगेजमेंटला, मुकेश अंबानी यांनी अनंत आणि राधिका ला एक भव्य भेट म्हणून, अंदाजे ४.५ कोटी रुपयांची बेंटले कॉन्टिनेंटल GTC स्पीड कार गिफ्ट केली आहे.
anant ambani wedding cost in rupees
पॉप आयकॉन रिहानाने सगळ्यांचे मनोरंजन केले, ज्यासाठी तिला दोन तासांच्या सेटसाठी $6 मिलिअन डॉलर म्हणजेच (अंदाजे रु. ५२ कोटी) देण्यात आले.
रिपोर्टनुसार असे सांगण्यात येत आहे कि, अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या ३ दिवसांच्या प्री-वेडिंग सेलेब्रेशनसाठी एकूण अंदाजे १२६० कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे .
mukesh ambani net worth
फोर्ब्सनुसार मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती ११७ अब्ज डॉलर्स (रु. ९७,६६,८९,८१,३०,०००) आहे. एकट्या केटरिंग कॉन्ट्रॅक्टची किंमत 200 कोटींहून अधिक होती.
anant ambani wedding date
मुकेश अंबानी यांनी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग पार्टीला आलेल्या भारतीय आणि आंतरराष्ट्रीय पाहुण्यांसाठी खाजगी विमानांची व्यवस्था केली होती .
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांची एंगेजमेंट जानेवारी २०२३ मध्ये झाली होती आणि या वर्षी जुलैमध्ये ते लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.
ALSO READ: नक्की पाहावा असा “लापता लेडीज” जाणून घ्या रिव्ह्यू!!