animal park cast

रणबीर कपूरच्या ॲनिमल पार्कमधून बॉबी देओल चा पत्ता कट, हा अभिनेता होणार व्हिलन!!

animal park cast: रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’ ने सगळीकडेच राडा केला होता. त्यांनतर तो जानेवारीच्या सुरुवातीपासूनच त्याच्या येणाऱ्या ‘रामायण’ सिनेमाच्या तयारीत व्यस्त असल्याचे दिसत आहे.

पण ‘ॲनिमल’ नंतर त्याचा सिक्वेल ‘ॲनिमल पार्क’ येणार असल्याचे डायरेक्टर ने कन्फर्म केले आहे हे सगळ्यांनाच माहित झाले आहे. काही दिवसांपूर्वी अशी बातमी येत होती कि सिनेमात काही वेळासाठी बॉबी देओलचे पात्र पुन्हा जिवंत केले जाणार आहे. मात्र आता या सिनेमाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.

animal park update

रणबीर कपूरसाठी २०२३ हे वर्ष खूप खास आणि चांगले ठरले आहे. १ डिसेंबर ला रिलीज झालेल्या त्याच्या ‘ॲनिमल’ ने जगभरात धुमाकूळ घातला होता. तसेच बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने ९१५ कोटींची कमाई देखील केली.

त्यांनतर हा सिनेमा ओटीटीवर रिलीज करण्यात आला. तिथे देखील सिनेमाला भरभरून प्रतिसाद मिळाला. रणबीर कपूरशिवाय जर या सिनेमात ज्याची सर्वाधिक चर्चा झाली तो म्हणजे बॉबी देओल. सिनेमात जरी त्याचा रोल छोटा असला तरी त्याने प्रत्येकाच्या मनावर छाप सोडली आहे.

त्यांनतर सगळेच आता त्याच्या सिक्वेल ‘ॲनिमल पार्क’ ची वाट बघत आहेत. ‘ॲनिमल’ मध्ये बॉबी देओल चा मृत्यू झाल्याचे दाखवण्यात आले होते. मात्र नुकताच असा खुलासा करण्यात आला आहे कि ते पात्र पुन्हा एकदा जिवंत करणार आहे. मात्र त्याच दरम्यान आता सिनेमाबाबत एक मोठी बातमी बाहेर आली आहे.

सध्या डायरेक्टरची ‘ॲनिमल पार्क’ वर प्लानिंग चालू आहे. मात्र अजून काहीही फिक्स झालेले नाही. गेल्या काही दिवसांपासून यावर कोणताच अपडेट नव्हता. पण सध्या एक अशी अपडेट बाहेर आली आहे की, ‘ॲनिमल पार्क’ साठी विक्की कौशलला विचारण्यात आले आहे.

animal park cast

रणबीरच्या ‘ॲनिमल पार्क’ मध्ये होणार व्हिलन ची एंट्री !

Image Source: Instagram

नुकत्याच एका बातमीनुसार असे सांगण्यात येत आहे कि रणबीरच्या डार्क थ्रिलर ‘ॲनिमल पार्क’ मधील नेगेटिव्ह रोलसाठी विक्की कौशलला संपर्क करण्यात आला आहे.

हा सिनेमा संदीप रेड्डी वंगा हे डायरेक्ट करत असून  भूषण कुमार प्रोड्युस करणार आहेत.

सिनेमामध्ये रणबीर कपूर डबल रोल मध्ये दिसणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यापैकी एक आतंकवादी अझीझ हक असेल, ज्याचे सिनेमातील रणबीर कपूर सारखेच बॉडी डबल करण्यात आले होते.

vicky kaushal in animal movie

रिपोर्टनुसार असे सांगण्यात येत आहे की विकी कौशलला अझीझ हकचा रोल ऑफर केला जाऊ शकतो. ज्याचा चेहरा वेगळा होता. त्याबरोबरच या रोल साठी शाहिद कपूरचे नाव देखील समोर येत आहे.

जर या सिक्वेलमध्ये विकी कौशल चे कास्टिंग झाले तर तो  पहिल्यांदाच सगळ्यांना अशा नेगेटिव्ह रोल मध्ये बघायला मिळेल. मात्र याबद्दल फक्त चर्चा चालू आहेत. ऍक्टर आणि मेकर्स कडून याबाबत अजून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

vicky kaushal upcoming movie chhaava

विकी कौशलने त्याच्या राझी, उधम सिंग आणि उरी अशा बऱ्याच सिनेमातील रोल मधून फॅन्स च्या मनात एक वेगळी जागा बनवली आहे. सध्या तो वर्षाच्या शेवटी येणाऱ्या ‘छावा’ या सिनेमाच्या तयारीत आहे.

सिनेमात तो छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र आणि शूर योद्धा छत्रपती संभाजी राजे यांचा रोल साकारताना दिसणार आहे. या रोल साठी तो आपल्या बॉडी वर देखील खूप मेहनत घेत आहे.

डायरेक्टर ने त्याला छत्रपती संभाजी राजेंसारखे दिसण्यासाठी ११६ किलोपर्यंत वजन वाढवण्यासाठी सांगितले आहे. तसेच सिनेमातील ॲक्शन सीनसाठी तो घोडेस्वारी आणि तलवारबाजी शिकत आहे.

या सिनेमात मराठा आणि मुघल यांच्यातील लढाईची स्टोरी दाखवण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच एका रिपोर्टनुसार असे सांगण्यात आले आहे कि सिनेमातील प्रत्येक सीनमध्ये विकी कौशल सुमारे १५०० ते २००० ज्युनियर आर्टिस्ट आणि १५० ते २०० घोड्यांसोबत काम करत आहे.

ALSO READ : PM मोदी Article 370 चित्रपटाबद्दल काय म्हणाले पहा

Leave a Comment