“आर्टिकल 370” पाहायचंय का? जाणून घ्या रिव्ह्यू
article 370 review in marathi: २३ फेब्रुवारी ला रिलीज झालेल्या या सिनेमात यामी गौतम, प्रियामणी आणि अरुण गोविल हे मुख्य भूमिकेत आहेत. तसेच हा सिनेमा देशातील आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी रिलीज झाला आहे, ज्यामुळे आर्टिकल ३७० सिनेमाबाबत लोकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
आदित्य धर यांनी आर्टिकल ३७० हा सिनेमा प्रोड्युस केला आहे जे उरी: द सर्जिकल स्ट्राइक सिनेमाच्या डिरेक्शनसाठी फेमस आहेत. त्यांना यासाठी नॅशनल फिल्म अवॉर्ड फॉर बेस्ट डायरेक्टर मिळाला होता.
- सिनेमाचे नाव: Article 370
- स्टार कास्ट: यामी गौतम, प्रियामणी, राज जुत्शी, अरुण गोविल, दिव्या सेठ
- डायरेक्टर: आदित्य सुहास जांभळे
- प्रोड्युसर: आदित्य धर
- रिलीज डेट: २३ फेब्रुवारी २०२४
- रन टाईम : १६० मिनिटे
- रेटिंग : 3.5/5
- Trailer: Watch Here
article 370 movie story
आर्टिकल 370 ची कथा
आर्टिकल ३७० रद्द करण्याच्या अगोदर, काश्मीर खोऱ्यातील संघर्ष अर्थव्यवस्था मोडून काढण्यासाठी आणि दहशतवादाशी लढा देण्याच्या उद्देशाने एका वर्गीकृत असाइनमेंटसाठी PMO सेक्रेटरी ने झुनी हक्सर या एका इंटेलिजन्स फील्ड ऑफिसर ला नियुक्त केले आहे.
article 370 review in marathi
अडीच तासांपेक्षा जास्त कालावधीचा रनटाइम असूनही, ‘आर्टिकल ३७०’ बऱ्याच पार्टमधे आकर्षक वाटतो आणि तुम्हाला सिनेमाशी बांधून ठेवतो.
वास्तविक घटनांपासून प्रेरित असलेला हा सिनेमा जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या कलम ३७० रद्द करण्याच्या आवश्यकतेवर भाष्य करतो. सिनेमामध्ये आर्टिकल ३७० रद्द करण्याचा सरकारचा निर्णय योग्यच होता, असे सिनेमात ठासून सांगण्यात आले आहे.
तसेच सिनेमात भ्रष्ट स्थानिक नेते, अतिरेकी यांच्यामुळे काश्मिरी रहिवाशांवर उद्भवलेले दुःख यावर सिनेमातील डायरेक्टर ने पूर्णपणे जोर दिलेला आहे.
सिनेमाचा फर्स्ट हाल्फ थोडा तणावपूर्ण आणि स्टोरी बिल्डिंग साठी वेळ घेतो. पण सेकंड हाल्फ मध्ये सिनेमा आपली पकड घेतो परंतु क्लायमॅक्समध्ये सिनेमाचि तीव्रता काहीशी कमी होते, जी वास्तववादापेक्षा जास्त नाट्यमय सिनेमॅटिक डावपेचांकडे झुकताना दिसते.
सिनेमाचे कथानक झूनी हक्सर (यामी गौतम धर) या गुप्तचर क्षेत्राच्या अधिकाऱ्याचे अनुसरण करते, जिला तिचे वरिष्ठ एका चकमकीनंतर दिल्लीला ट्रान्स्फर करतात.
सरकारच्या आर्टिकल ३७० रद्द करण्याच्या हालचाली चालू असताना, PMO सेक्रेटरी राजेश्वरी स्वामिनाथन (प्रियामणी) हिच्या खांद्यावर बरेचसे काम येते. ती तिची एक टीम तयार करते आणि काश्मीरमधील NIA ऑपरेशनचे नेतृत्व करण्यासाठी झूनीची नियुक्ती करते.
खोऱ्यातील शांतता आणि एकता टिकवून ठेवण्याचा प्रवास, भ्रष्ट स्थानिक नेते आणि अतिरेक्यांनी निर्माण केलेल्या अडथळ्यांमधून मार्गक्रमण करण्याची स्टोरी सिनेमा दाखवतो.
article 370 movie cast
जेव्हा दोन अभिनेत्री त्यांच्या अभिनयाच्या जोरावर संपूर्ण सिनेमा धरून ठेवतात हे पाहणे आनंददायक वाटते. झुनीची व्यक्तिरेखा साकारत असलेली यामी गौतम, तिच्या ऍक्टिंग मधून तिच्या रोलबद्दल असलेले स्पष्ट समर्पण आणि प्रशंसनीय कामगिरी दिसून येते.
तसेच प्रियामणी ने एका IAS अधिकाऱ्याची व्यक्तिरेखा साकारली आहे. जिला तिने पूर्णपने न्याय दिला आहे. तसेच या सिनेमात राज झुत्शी याने एका काश्मिरी नेत्याची आणि जम्मू-काश्मीरचे तीन वेळा माजी मुख्यमंत्री असल्याची भूमिका साकारली आहे.
त्यासोबतच राज अरुण याने खवर अली आणि वैभव तत्ववादी याने कमांडंट यश चौहानची भूमिका साकारली आहे.
सिनेमामध्ये अरुण गोविल आणि किरण करमरकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या भूमिका साकारल्या आहेत.
तसेच सिनेमाच्या सुरुवातीला अजय देवगणने कथन केलेल्या प्रस्तावनेत काश्मीरमधील चूकीसाठी पहिल्या पंतप्रधानांना (जवाहरलाल नेहरू) यांना दोष देण्याचा प्रयत्न केला आहे.
article 370 movie review
तसेच आर्टिकल ३७० सिनेमामध्ये २०१५ ते २०१९ या कालावधीत बेतलेल्या राजकारणी आणि नोकरशहांनी काश्मीरचा कसा वारंवार विश्वासघात केला आहे याची संतापजनक स्टोरी सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
स्वत:ला सत्तेत ठेवण्यासाठी त्यांनी कट्टरतावादाला कशी परवानगी दिली आणि ‘आझादी’च्या नावाखाली तरुणांना दगडफेक करण्यासाठी ब्रेनवॉश करणे कसे सुरू ठेवले हे सिनेमातून दाखवण्यात आले आहे.
तसेच, सिनेमामध्ये देशभक्ती सिद्ध करण्यासाठी कोणतेही क्लिच डायलॉग्स किंवा उघडपणे देशभक्ती गाणी नाहीत.
‘आर्टिकल ३७०’ लोकांना ‘योग्य माहिती मिळवण्यासाठी उपयुक्त’ ठरेल, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. याचप्रमाणे आमचा अंदाज देखील तोच आहे.
PM modi on article 370
PM मोदी चित्रपटाबद्दल काय म्हणाले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जम्मूतील एका सभेत या सिनेमाबद्दल बोलताना म्हणाले, “मी ऐकले आहे की कदाचित या आठवड्यात आर्टिकल ३७० वर एक चित्रपट रिलीज होणार आहे.
मला वाटते की तुमचा ‘जय जय कार’ देशभर ऐकू येईल,” असे मोदींनी मौलाना येथे जम्मूच्या मध्यभागी असलेल्या आझाद स्टेडियम येथील जाहीर सभेला संबोधित करताना सांगितले. ऑगस्ट २०१९ मध्ये आर्टिकल ३७० रद्द केल्यापासून जम्मू प्रदेशाच्या त्यांच्या दुसऱ्या भेटीदरम्यान पंतप्रधानांनी केलेले हे भाष्य, या आठवड्याच्या अखेरीस सिनेमाच्या नजीकच्या रिलीजच्या अनुषंगाने होते.
सिनेमाच्या विशिष्ट गोष्टींशी परिचित नसल्याची कबुली देताना, मोदींनी लोकांना अचूक अंतर्दृष्टी प्रदान करण्यासाठी अशा सिनेमा निर्मितीच्या संभाव्यतेवर प्रकाश टाकला. “मला माहित नाही की हा सिनेमा कशाबद्दल आहे पण काल मी टीव्हीवर ऐकले की आर्टिकल ३७० वर एक सिनेमा येत आहे. चांगले आहे , लोकांना योग्य माहिती मिळण्यासाठी त्याचा उपयोग होईल,” मोदी म्हणाले.
DON’T MISS: करण जोहरचा पुढचा धमाका! वरुण-जान्हवी पुन्हा एकदा रोमँटिक सिनेमात..