bade miyan chote miyan teaser release

“दिल से सोल्जर, दिमाग से शैतान” ‘बडे मियाँ छोटे मियाँ’चा टीझर रिलीज

bade miyan chote miyan teaser review:

bade miyan chote miyan teaser release झाला आहे. अक्षय कुमार पुन्हा एक सैनिक म्हणून परतला आहे आणि यावेळी त्याच्यासोबत पॉवर तडका जोडण्यासाठी बॉलिवूडचा लाडका अॅक्शन हिरो टायगर श्रॉफ देखील आहे.

हा चित्रपट अली अब्बास जफर यांनी दिग्दर्शित केला आहे, बडे मियाँ छोटे मियाँमध्ये अक्षय आणि टायगर हे दोन अॅक्शन हिरो आहेत, जे पहिल्यांदाच भारतातील सर्वात मोठ्या अॅक्शन चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. अॅक्शन सीक्वेन्स आणि देशभक्तीपर भावनांनी युक्त, या टीझरने प्रेक्षकांना चित्रपटाची आतुरतेने वाट पाहण्यास भाग सोडले आहे.

bade miyan chote miyan teaser release:

अक्षय कुमारला बऱ्याच दिवसांपासून हिट चित्रपटाची आस होती. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ पहिल्यांदाच एकत्र येत आहेत आणि टीझर देखील हिट झाला आहे. टायगर आणि अक्षय गेल्या अनेक दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करू इच्छित होते. आणि बडे मियाँ छोटे मियाँ त्यांना हवे तशे यश मिळवून देईल असे दिसत आहे. टीझरमध्ये दोन्ही अॅक्शन हिरो भारतीय सैनिक म्हणून दाखवले आहेत आणि ते प्रेक्षकांच्या आवडीस उतरण्यात यशस्वी झाले आहेत.

bade miyan chote miyan teaser release date:

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांचा चित्रपट ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ हा 2024 चा बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चाहते चित्रपटाच्या टीझरची वाट पाहत आहेत. आता प्रतीक्षा संपवत अक्षय आणि टायगरने बुधवारी या चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे.

‘बडे मियाँ छोटे मियाँ’ हा एक बिग बजेट चित्रपट आहे, जो अॅक्शन आणि कॉमेडी या दोन्ही गोष्टीं प्रेक्षकांपर्यंत पोहचवतो. ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ ची अॅक्शन हे त्याचे सर्वात मोठे आकर्षण आहे.

या चित्रपटातील अनेक स्टंट सीन हॉलिवूड अॅक्शन तज्ञांच्या टीमसोबत शूट करण्यात आली आहेत.अशा परिस्थितीत हा चित्रपट सातत्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.

Click here: watch Bade miyan chote miyan teaser

Source: Instagram

bade miyan chote miyan story

टीझरमध्ये दिसणार्‍या सीनमध्ये अक्षय आणि टायगर ‘बडे मियाँ छोटे मियाँ’मध्ये सैनिकाच्या भूमिकेत असल्याचे दिसत आहे. ते दोघेही एका विशेष मोहिमेवर दिसत आहेत, जेथे त्यांच्या शत्रूने भारताच्या सुरक्षेसाठी उच्च तंत्रज्ञानाचा धोका निर्माण केला आहे.

 मात्र टीझरमध्ये त्या व्हिलनचा चेहरा समोर आलेला नाही. पण त्याची डायलॉग डिलिव्हरीची स्टाइल आणि त्याचा खलनायक अवतार खूपच भीतीदायक असणार आहे हे दिसून येते.

‘बडे मियाँ छोटे मियाँ’च्या टीझरमध्ये एक लॅब प्रकाराचा सेटअप दिसत आहे आणि असे दिसते की तेथे एक सुपरह्युमन तयार केला जात आहे, ज्यामध्ये AI चा वापर देखील केला जात आहे.

हे एखाद्या ऍडव्हान्स लेवल सैनिकासारखे आहे, ज्याच्या विरोधात लढण्यासाठी भारताच्या सुरक्षा यंत्रणांनी एक ऍडव्हान्स टीम तयार केली असावी, ज्यामध्ये अक्षय आणि टायगरची पात्रे एक भाग आहेत.

खलनायक नायकाला मागे टाकेल

‘बडे मियाँ छोटे मियाँ’ हा एक उत्तम अॅक्शन चित्रपट असणार आहे, त्याची झलक चित्रपटाच्या टीझरमध्ये पाहायला मिळते. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ या चित्रपटात सैनिकांच्या भूमिकेत आहेत. टीझरमध्ये दोघेही फुल-ऑन अॅक्शन मोडमध्ये दिसत आहेत. दुसरीकडे ‘बडे मियाँ छोटे मियाँ’चा खलनायकही दमदार आहे, जो नायकाला बरोबरीची टक्कर देणार आहे.

अक्षयसाठी ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ खास आहे

अक्षय कुमारला बऱ्याच दिवसांपासून हिट चित्रपटाची आस होती. अशा परिस्थितीत तो  ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ बाबत कोणतीही कसर सोडू इच्छित नाही.

चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता कायम ठेवण्यासाठी तो सातत्याने ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ चे अपडेट्स शेअर करत आहे. कधी नवीन पोस्टर, तर कधी चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची आठवण करून देत त्यांनी चित्रपट चर्चेत ठेवला आहे.

bade miyan chote miyan cast:

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफसह स्टारकास्टबद्दल बोलायचे झाल्यास, या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा, मानुषी छिल्लर आणि अलाया एफ यांचाही समावेश आहे. या चित्रपटात सालार अभिनेते पृथ्वीराज सुकुमारन हे देखील खलनायक भूमिकेत दिसणार आहेत.  

bade miyan chote miyan 2 | चित्रपट कधी प्रदर्शित होणार?

पूजा एंटरटेनमेंटने चित्रपटाची निर्मिती केली आहे. दिग्दर्शक अली अब्बास जफर चित्रपटाच्या शूटिंग बद्दल बोलताना म्हणाले, ” बडे मियाँ छोटे मियाँ प्रेक्षकांसमोर आणण्यामागे जगाच्या विविध भागांतील अत्यंत टॅलेंटेड क्रूसह शूटिंग करण्यामागे खूप मेहनत आणि कंमिटमेन्ट पार पडली आहे.

रिलीजबद्दल बोलताना, अक्षय कुमारने 2023 मध्येच सांगितले होते की चाहत्यांना बराच काळ प्रतीक्षा करावी लागेल. बडे मियाँ छोटे मियाँ 2024 च्या ईदमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Read More: Indian police force review    

Leave a Comment