bhakshak movie review marathi

भक्षक : समाजाचं भयंकर वास्तव उलगडणारा सिनेमा

bhakshak movie review marathi: भूमी पेडणेकरचा भक्षक हा सिनेमा एका सत्य घटनेवर आधारित आहे. सत्य घटनेवर आधारित सिनेमे बऱ्याचदा हार्ड हिटिंग असतात आणि भक्षक ने ही तोच मुद्दा समोर आणला आहे.

या सिनेमामध्ये भूमीने संघर्ष करणाऱ्या टीव्ही पत्रकाराचा रोल साकारला आहे. जी बालिका गृहातील घोटाळा उघड करण्यासाठी सर्वस्व पणाला लावते. आदित्य श्रीवास्तव आणि संजय मिश्रा यांच्या मुख्य भूमिका आहेत.

  • सिनेमाचे नाव: भक्षक
  • रेटिंग : ३/५
  • स्टार कास्ट: भूमी पेडणेकर, संजय मिश्रा , आदित्य श्रीवास्तव
  • डायरेक्टर: पुलकित, ज्योत्स्ना नाथ
  • प्रोड्युसर: शाहरुख खान
  • रिलीज डेट: ९ फेब्रुवारी २०२४
  • प्लॅटफॉर्म : नेटफ्लिक्स
  • ट्रेलर : Watch here

Bhakshak movie review

अनेकदा हिंदी सिनेमांमध्ये रिअल लाइफ स्टोरी चा प्रभाव दिसून आला आहे . रिअल लाइफ घटनांपासून प्रेरणा घेऊन त्यातील पात्रांची आणि शहरांची नावे बदलून त्या घटना सिनेमाच्या स्टोरी मध्ये मांडल्या जातात.

शाहरुख खानच्या प्रॉडक्शनखाली बनलेला ‘भक्षक’ नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. हा सिनेमा बिहारमधील मुझफ्फरपूर येथील बालिका गृहातील अत्याचाराला आणि लैंगिक छळाला बळी पडलेल्या ३५ मुलींची सुटका करण्यात आलेल्या सत्य घटनेवर आधारित आहे.

bhakshak movie review marathi

भक्षक ची स्टोरी काय आहे?

या सिनेमाची स्टोरी बिहारच्या मुन्नावरपूरपासून सुरू होते, जिथे बालिकागृहातील मुली लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या असतात . या बालिका गृहाचा मालक बन्सी साहू (आदित्य श्रीवास्तव) आहे, जो स्वतः पत्रकार आहे.

Image Source: Instagram

बालिकागृहात होणाऱ्या या क्रौर्यासमोर पोलीस, प्रशासन सर्वानी आपले डोळे मिटून घेतले आहेत.तिथून स्टोरी पटणाकडे येते, जिथे स्थानिक रिपोर्टर वैशाली सिंग (भूमी पेडणेकर) तिचे स्वतःचे न्यूज चॅनेल ‘कोशिश न्यूज’ सुरू करण्याचा प्रयत्न करत आहे.

तिच्या घरातून तिला नवऱ्याचा पाठिंबा आहे पण तिच्या वहिनींना वाटते की तिने कुटुंबाला पुढे न्यावे.  त्याच दरम्यान, वैशालीचा एक सूत्रधार तिला राज्यातील बालगृहात केलेल्या सर्वेक्षणाचा ऑडिट रिपोर्ट देतो, ज्यामध्ये मुनव्वरपूरच्या बालिकागृहात मुलींवर झालेल्या शारीरिक अत्याचाराचा उल्लेख असतो.

तिथून वैशाली तिचे रिसर्च सुरू करते. यात तिला कॅमेरामन भास्कर सिन्हा (संजय मिश्रा) ची साथ मिळते. वैशालीला बालगृहातील मुलींना वाचवण्यात यश येईल कि नाही ? ती सत्तेत असलेल्या लोकांशी आपल्या शब्दांच्या बळावर लढू शकेल का? यावर हि संपूर्ण स्टोरी आधारित आहे.

कसा आहे सिनेमाचा स्क्रीनप्ले ??

पुलकितने दिग्दर्शित केलेल्या या सिनेमाची खास गोष्ट म्हणजे या विषयाची संवेदनशीलता आणि गंभीरता लक्षात घेऊन, त्याने सिनेमामध्ये कोणत्याही प्रकारचे मोठ्या आवाजाचे बॅकग्राऊंड स्कोअर किंवा फास्ट कट सीन्स टाकलेले नाहीत. या सिनेमाची स्टोरी, स्क्रीनप्ले आणि डायलॉग पुलकित आणि ज्योत्स्ना नाथ यांनी लिहिले आहे.

त्याने सिनेमा खऱ्या मुद्द्यांपर्यंत पोहोचण्यात कोणताही वेळ वाया घालवला नाही. सिनेमाच्या सुरुवातीला एका मुलीवर झालेला क्रूरपणा मनाला भारावून टाकतो, त्यामुळे पुढचा सिनेमा पाहण्यासाठी मनाला मजबूत करावे लागते.

सिनेमाची खास गोष्ट म्हणजे लेखकांनी भूमीचे पात्र कोणत्याही प्रकारे बिचारी म्हणून दाखवले नाही. जसे कि तिला घरातील कामे करता येत नसल्याबद्दल अपराधीपणा वाटेल. तसेच ती नवऱ्याला भूक लागली तर मूठभर डाळ आणि भात स्वत: शिजवू शकतो हा धडा देखील शिकवते.

सिनेमाचा क्लायमॅक्स आंखे मूंदें हम क्यों गुम है उजालों में…  या गाण्यावर शूट करण्यात आला आहे. बालिका गृहातून मुलींची सुटका करतानाचे सीन डोळ्यात पाणी आणते. या सीनचे श्रेय सिनेमॅटोग्राफर कुमार सौरभ यांना जाते, ज्यांनी तितक्याच गंभीरतेने हे शूट केले आहे.

भूमी पेडणेकरचा अभिनय कसा आहे?

अभिनयाबद्दल बोलायचे झाले तर, भूमी पेडणेकरने वैशालीची व्यक्तिरेखा पूर्ण तीव्रतेने, संवेदनशीलतेने आणि जबाबदारीने साकारली आहे. तसेच संजय मिश्रा आणि दुर्गेश कुमार यांच्या पात्रांमुळे या गंभीर कथेचे वातावरण थोडे हलके फुलके करण्यास मदत होते.

संजय आणि भूमीची केमिस्ट्री हा या सिनेमाचा युनिक सेलिंग पॉइंट आहे. आदित्य श्रीवास्तव बन्सी साहूच्या द्वेष पसरवणाऱ्या पात्राला पूर्ण न्याय देतो.

एसएसपी जसमीत कौरच्या भूमिकेत सई ताम्हणकरसारख्या गुणी अभिनेत्रीचा वापर दिग्दर्शकाला तेवढा करता आला नाही. ए गंगा तून सब को देखा अपने तीरे… हे गाणे स्टोरी सोबत रमताना दिसते.

ALSO READ : माणूस आणि रोबोट च्या प्रेमाची अनोखी कहाणी!

Leave a Comment