bigg boss 17 news

bigg boss 17 news: अंकिता लोखंडे किंवा मुनावर फारुकी नाही, तर मन्नारा चोप्रा आहे हा सीझन जिंकण्यास पात्र; जाणून घ्या

bigg boss 17: सलमान खान ने होस्ट केलेल्या शोचा ग्रँड फिनाले रविवारी म्हणजेच २८ जानेवारी ला होणार आहे , चला तर मग जाणून घेऊया मन्नारा चोप्रा हा सीझन जिंकण्यास पात्र का आहे. त्यामागील चार कारणे आहेत जी तिला विनर बनवू शकते .

bigg boss season 17 winner 2024

अंकिता लोखंडे, अभिषेक कुमार, मुनावर फारुकी, मन्नारा चोप्रा आणि अरुण महाशेट्टी हे ट्रॉफीसाठी कॉम्पेटिशन करणारे टॉप 5 स्पर्धक आहेत.

मुनावर, अभिषेक आणि अंकिता हे ट्रॉफी जिंकू शकतात अशी चर्चा होत असताना, हा सीजन जिंकण्यासाठी खरोखर मन्नारा चोप्राच पात्र आहे असे आम्हाला का वाटते याची चार कारणे आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

Image: Instagram

मन्नारा चोप्रा बिग बॉस 17 जिंकण्यास पात्र का आहे याची 4 कारणे

  1. bigg boss 17: मन्नारा चोप्रा, सर्वात हळवी स्पर्धक

मन्नारा चोप्रा ही बिग बॉस 17 ची सर्वात हळवी स्पर्धक आहे. असे काही क्षण होते जेव्हा ती गेममध्ये अत्यंत कमकुवत झाली होती आणि ती गोंधळली देखील होती पण तिने ते  स्वीकारले देखील आहे.

ती कधीही तिच्या भावना लपवत नाही आणि तिला एखाद्या गोष्टीबद्दल काय वाटते याबद्दल ती नेहमीच व्यक्त झालेली आहे. बाकी स्पर्धकांसारखे, मन्नारा कॅमेऱ्यावर तिचे मन मोकळे करून देण्यास मागेपुढे पाहत नाही.

तसेच तिने  प्रत्येक गेममध्ये धक्क्यानंतर ज्या प्रकारे कमबॅक केले आहे त्या गोष्टींनी प्रेक्षकांना आश्चर्यचकित केले आहे.

2. bigg boss 17: मन्नारा चोप्रा, लोनली वॉरियर

 मन्नारा चोप्रावर अनेकदा मुनावर फारुकीच्या सपोर्टने  फिनालेपर्यंत आली आहे असा आरोप झाला आहे . मुनवरने मन्नाराचा गेम चांगला करण्यास मदत केली हे नाकारता येत नसले तरी, आयशा खानच्या एन्ट्री नंतर  ती एकटीच राहिली होती हे सगळ्यांना माहित आहे.

मुनावरने मन्नारापासून अंतर निर्माण केल्यामुळे तिला घरात टिकणे खूप अवघड झाले होते .पण  तिने आशा सोडली नाही आणि धडपड सुरूच ठेवली. तिने चुका केल्या, चुकीची युती देखील केली, पण  तिने एकदाही खेळणे सोडले नाही.

bigg boss 17 confirmed contestants

3. bigg boss 17: मन्नारा चोप्रा ने गेमसाठी खोटे लव्ह अँगल केले नाही

बिग बॉस 17 च्या घरातील खूप स्पर्धकांनी गेममध्ये राहण्यासाठी त्यांच्या लव्ह अफेर  आणि लग्न चा वापर केला असताना, मन्नाराने फक्त गेममध्ये राहता यावे यासाठी कधीही खोटे लव्ह अँगल तयार केले नाही, ती मुनावर फारुकीसह सहजपणे असे करू शकली असती.

खरं तर, जेव्हा घरातील सदस्य आणि सलमान खानने तिला मुनावरबद्दलच्या भावना स्वीकारण्यास भाग पाडले, तेव्हा तिने गप्प राहणे पसंत केले.

मन्नाराला माहित होते की बाहेरचे लोक तिला आणि मुनावरला रेलशनशिपमध्ये असल्याचे दाखवत आहेत.  तरीही, तिने कोणत्याही खोट्या लव्ह अँगलचा भाग न बनता योग्य मार्गाने गेम खेळणे निवडले.

bigg boss 17 news

4. bigg boss 17: मन्नारा चोप्राचा मित्रांकडून विश्वासघात

मन्नारा तिच्या मित्राच्या पाठीमागे बोलली आहे  हे नाकारता येत नाही आणि  तिने तिच्या मित्रांना अनेकदा दुखावले देखील आहे. पण , जेव्हा जेव्हा त्यांना तिची सर्वात जास्त गरज होती  तेव्हा ती नेहमीच तिच्या मित्रांसाठी उभी राहिलेली दिसली आहे.

आयेशा खानच्या एंट्रीनंतर मुनावरने मन्नारापासून अंतर निर्माण केले; आणि आयशाने मुनावरच्या भूतकाळाबद्दल गोष्टी उघड केल्यानंतर, मन्नारानेच मुनावरला मजबूत बनण्यास आणि खेळ खेळण्यास मोटिव्हेट केले. तिने मुनवरसोबतच्या तिच्या नात्यावर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या ईशा मालवीयालाही माफ केले.

अनुराग डोभालने वारंवार सांगितले की मन्नारा कशी स्वार्थी आहे, पण त्याच्या हकालपट्टीवर, मन्नारा चोप्रा ने अनुरागने तिचा कसा गैरसमज केला आहे हे लक्षात आणून दिले .

मन्नाराने बिग बॉस 17 चा प्रवास स्पर्धकाप्रमाणेच जगला आहे. बिग बॉसच्या फॅन्सच्या हृदयात तिने निश्चितच एक खास जागा निर्माण केली आहे. या सर्व कारणांमुळे मन्नारा चोप्रा बिग बॉस 17 ची ट्रॉफी जिंकण्यास पात्र ठरते .

Read More: Love and war movie 2025

Leave a Comment