black movie ott

संजय लीला भन्साळी यांच्या उत्कृष्ट कलाकृतींपैकी एक “ब्लॅक” हा सिनेमा रिलीजच्या जवळपास दोन दशकांनंतर ओटीटीवर वर आला आहे.

भन्साळी यांच्या आगामी हिरामंडी सिरीज चा टीजर रिलीज केल्यानंतर काही दिवसांनी black movie ott नेटफ्लिक्स वर रिलीज करण्यात आला.

संजय लीला भन्साळी यांनी “ब्लॅक” या सिनेमात शिक्षक आणि विद्यार्थ्याची सुंदर आणि कधीही न विसरता येणारी स्टोरी सादर केली होती. हा सिनेमा २००५ मध्ये रिलीज झाल्यानंतर अमिताभ बच्चन आणि राणी मुखर्जी यांनी त्यांच्या सिनेमातील अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधले होते, पण हा सिनेमा आतापर्यंत कोणत्याच ओटीटी प्लॅटफॉर्म वर उपलब्ध नव्हता. 

Watch BLACK movie teaser here

black 2005 movie summary

अंधार आणि प्रकाशाचे काव्यात्मक चित्रण

“ब्लॅक” हा सिनेमा शिक्षक आणि त्याच्या आंधळ्या, मूकबधिर विद्यार्थी यांच्यातील नातेसंबंध उलघडणारी हि स्टोरी आहे. ‘ब्लॅक’ हा सिनेमा हेलन केलरच्या जीवनातून प्रेरित असलेल्या एका शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली शारीरिकदृष्ट्या विकलांग असलेल्या मुलीचा सुंदर मनमोहक प्रवास उलगडतो.

black 2005 cast

विद्यार्थी आणि शिक्षक यांचा सुंदर प्रवास

Image source: Instagram

एक विलक्षण शिक्षक कसा एका स्त्रीच्या आयुष्य मध्ये बदल निर्माण करतो जी लहानपणापासून एका आजारामुळे हिंसक गोष्टींना बळी पडते ज्यामुळे तिला ऐकणे, पाहणे आणि बोलता देखील येत नाही.

सिनेमा जसजसा पुढे जातो तसतसे, राणी मुखर्जी चे पात्र मिशेल, आणि अमिताभ बच्चन यांचे पात्र देबराज यांच्या मध्ये नाते निर्माण होते . नंतर देबराज ला अल्झायमर रोग होतो. अमिताभ बच्चन यांनी देबराज चे पात्र उत्तम प्रकारे साकारले आहे.

देबराज मिशेलला तिच्या एकटेपणाच्या भावनेतून बाहेर काढून मिशेलने सामान्य जीवन जगावे असे तो स्वप्न पाहतो.

“ब्लॅक” हा सिनेमा वेशभूषा, जबरदस्त सेट्स आणि मनमोहक सिनेमॅटोग्राफीने प्रेक्षकांना एक सुंदर अनुभव देतो.

black 2005 netflix

राणी मुखर्जीचे अभिनयातील वेगळी शेड सिनेमातील विविध सीन्समधून दिसून येते. जेव्हा ती तिच्या आईसोबत फोन कॉलवर रडत असलेला भाग हा सर्वात उत्तम परफॉर्मन्सपैकी एक आहे.

“ब्लॅक” साठी अमिताभ बच्चन यांना नॅशनल अवॉर्ड मिळाला. आणि त्यांच्या सिनेमासाठी पगार न घेण्याच्या  निर्णयावरून सिनेमाबद्दल त्यांची बांधिलकी आणि सिनेमाबद्दल खूप काही सांगते.

समीक्षकांनी सिनेमाच्या स्टोरीची, डायरेक्टर संजय लीला भन्साळी आणि ऍक्टर अमिताभ बच्चन आणि राणी मुखर्जी यांचे कौतुक केले.

black 2005 awards

हा सिनेमा ५३ व्या नॅशनल फिल्म अवॉर्ड मध्ये तीन वेळा विजेता ठरला तसेच बेस्ट ऍक्टर (अमिताभ बच्चन ), बेस्ट फिचर फिल्म, आणि बेस्ट कॉस्ट्यूम डिझाईन (सब्यसाची मुखर्जी) साठी देखील अवॉर्ड मिळाला.

black movie ott

शेवटी संजय लीला भन्साळीचा ब्लॅक ओटीटीवर रिलीज करण्यात आला आहे. नेटफ्लिक्स वर तुम्ही अमिताभ बच्चन आणि राणी मुखर्जी यांचा हा सुंदर सिनेमा पाहू शकता.

ALSO READ : Top 10 celebrity who join politics

Leave a Comment