विकी कौशल दिसणार छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत! नक्की पहा अंगावर काटा आणणारा धमाकेदार टीझर!!
chhava teaser: जर तुम्ही “स्त्री 2” पाहण्याचा विचार करताय तर थोडे लवकर जा आणि विकी कौशलच्या “छावा“ चा जबरदस्त टिझरचा अनुभव घ्या. आपल्या साम्राज्याचे रक्षण करण्यासाठी आणि वडील छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपण्यासाठी त्यांनी केलेल्या संघर्षावर हा टीझर प्रकाश टाकतो.
Chhaava teaser release | chhava movie 2024
नुकत्याच रिलीज झालेल्या “छावा” च्या टीझरने फॅन्स आणि समीक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. डायरेक्टर लक्ष्मण उतेकर हे “लुका छुप्पी” आणि “मिमी” सारख्या सिनेमांसाठी ओळखले जातात.
विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना यांचा “छावा” त्याच्या हटके स्टोरीलाईन ने आपल्या फॅन्स ला आश्चर्यचकित करण्यासाठी सज्ज झालेला आहे.
छावा सिनेमाचा टीझर अखेर रिलीज झाला असून त्यात विकी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे. छावाच्या टीझरने त्याच्या फॅन्स ला एक सुखद धक्का दिलेला आहे तसेच टीझरमुळे फॅन्स मध्ये अजून जास्त उत्सुकता वाढली आहे.
Chhaava teaser| Chhaava movie
टीझरमध्ये आपल्याला एक युद्धाचा सीन दिसतो ज्यामध्ये विकी कौशल सगळ्यांवर भारी पडताना आपल्याला दिसतो. हा ऍक्शन सीक्वेन्स आपल्याला एक आश्चर्यकारक अनुभव देतो जो आपल्याला पडद्यावर खिळवून ठेवतो.
तसेच सिनेमात आपल्याला अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत दिसतो जो ओळखता येत नाही. टीझरचा शेवट विकीच्या संभाजी महाराज सिंहासनावर शाही पद्धतीने बसून होतो.
Chhaava release date | Chhaava Cast
सिनेमाच्या टीझर वरून एवढे समजलेच आहे कि विकीची भूमिका हि शाही असेल आणि प्रत्येक सीन तुम्हाला थक्क करेल.
तसेच या सिनेमात विकी आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांची जबरदस्त भूमिका साकारताना आपल्याला दिसणार आहे, तर रश्मिका त्यांच्या पत्नी येसूबाई भोंसले यांच्या भूमिकेत दिसणार आहे.
“छावा” ६ डिसेंबरला थिएटर मध्ये रिलीज होणार असून फॅन्स खूप आतुरतेने या सिनेमाची वाट पाहत आहेत.
Also Read: जाणून घ्या कसा आहे राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर चा स्त्री २?