fighter movie review in marathi

Fighter movie review : धमाकेदार कि फ्लॉप?

बॉलिवूड स्टार हिरो हृतिक रोशन आता भारतातील पहिला एरियल अॅक्शन थ्रिलर, “फायटर” घेऊन आला आहे. चला तर मग बघूया fighter movie review in marathi. वॉर आणि पठाण फेम सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या सिनेमात  ह्रितिक रोशन, दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर मुख्य भूमिकेत आहेत.

“फायटर” चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर असे वाटले की सिद्धार्थ आनंदच्या सिनेमाने टॉम क्रूझच्या टॉप गनपासून जबरदस्त प्रेरणा घेतली आहे. पण दोन्ही चित्रपटांमधील समानता म्हणजे दोघांनीही आपापल्या देशाच्या राष्ट्रवादाची पूर्तता केली आहे. आज २५ जानेवारीला “फायटर” प्रदर्शित झाला आहे.

  • रिलीज तारीख: 25 जानेवारी 2024
  • कलाकार: हृतिक रोशन, दीपिका पदुकोण, अनिल कपूर, ऋषभ साहनी, करण सिंग ग्रोव्हर, अक्षय ओबेरॉय
  • दिग्दर्शक : सिद्धार्थ आनंद
  • निर्माते: सिद्धार्थ आनंद, ज्योती देशपांडे, रेमन चिब्ब, अजित अंधारे, अंकू पांडे, केविन वाझ, ममता भाटिया
  • म्युसिक डायरेक्टर : विशाल आणि शेखर
  • सिनेमॅटोग्राफर: सच्चिथ पाउलोस
  • एडिटर: आरिफ शेख
  • Fighter: trailer

fighter movie story

श्रीनगर बेस कॅम्पवर शत्रूचा संभाव्य हल्ला लक्षात घेऊन भारतीय वायुसेनेच्या सर्वोच्च विमानचालकांसह एक विशेष टीम तयार करण्यात येते. तेव्हा शमशेर पठानिया, उर्फ पॅटी (हृतिक रोशन), मिन्नी राठोर उर्फ मिन्नी (दीपिका पदुकोण), सरताज गिल (करण सिंग ग्रोव्हर) आणि बाकी काही जण  या टीमचा भाग होतात.

राकेश जय सिंग, उर्फ रॉकी (अनिल कपूर), त्यांचा कमांडिंग ऑफिसर आहे. एके दिवशी जैश-ए-मोहम्मद हि दहशतवादी संघटना  सीआरपीएफ जवानांवर हल्ला करते. यामुळे भारत आणि दहशतवाद्यांमध्ये लढाईची सुरुवात होते. आणि याच लढाईमध्ये शेवटी कोण जिंकते ही सिनेमाची गोष्ट आहे.

Image Source: Instagram

fighter movie review in marathi |तुम्ही fighter का पहावे याची कारणे

सिद्धार्थ आनंदच्या अगोदरच्या सिनेमासारखे फायटरच्या स्टोरी मध्ये काही वेगळे नाही, पण डायरेक्टर पुन्हा एकदा चांगली स्टोरी घेऊन येतो जी आपल्याला सिनेमाच्या विविध भागात गुंतवून ठेवते. सुरुवातीच्या चाळीस मिनिटांचा किंवा त्यापेक्षा जास्त वेळ पात्रांची ओळख करून देण्यामध्ये  वापरला जातो. आणि त्या नंतर सिरीयस मुद्दा आणला जातो. तिथे तुम्हाला कमालीचे एरियल अॅक्शन सीन दिसतील.

ज्या प्रकारे त्यांनी सर्व हवाई लढाईचे सीन घेतले आहेत त्याबद्दल फायटर टीमचे कौतुक केले पाहिजे. ही अॅक्शन सीन स्टोरीमध्ये भर टाकतात आणि एक वेगळाच अनुभव देतात. टीम ने हवाई सीन चे माहिती दिली आहे जेणेकरून आपल्याला ते अधिक चांगल्या प्रकारे समजू शकेल.

फायटरची दुसरी चांगली गोष्ट म्हणजे त्याचे इंटर्वल नंतर चे इमोशनल सीन्स, सामान्यतः, अॅक्शन सिनेमामध्ये तेवढी इमोशनल स्टोरी नसते, पण फायटर मध्ये ते दिसून येते.आशुतोष राणाची छोटीशी भूमिका प्रभाव पाडते.

या स्टायलिश अॅक्शन सिनेमामध्ये  हृतिक रोशन मोहक दिसत आहे. हृतिकची जबरदस्त स्क्रीन प्रेझेन्स नेहमीच पाहण्यासारखी असते. त्याची ऍक्टिंगची समज, डायलॉग डिलिव्हरी, सूक्ष्म अभिनय आणि त्याचा चार्म  या चित्रपटाला खूप मदत करतो.

दीपिका पदुकोणसोबतही त्याची चांगली केमिस्ट्री जुळून आली आहे. ती  तिची भूमिका चोख बजावते. लव्ह ट्रॅकचा सिनेमाच्या फ्लोवर  परिणाम होत नाही. अनिल कपूर, अक्षय ओबेरॉय आणि करण सिंग ग्रोव्हर आपापल्या भूमिकेत छान आहेत.

फायटर: गाणी आणि बॅकग्राऊंड स्कोअरसह गमावलेली संधी

फायटरच्या  गाणी आणि बॅकग्राऊंड स्कोअर मध्ये कमी जाणवते . वंदे मातरम ट्रॅक सोडला तर बॅकग्राऊंड स्कोअर चांगला नाही. बॅकग्राऊंड स्कोअर चांगला असता तर प्रभाव अजून काही पट वाढला असता. काही डायलॉग आपल्याला उरीची आठवण करून देतात. चित्रपटाची कथा याच आशयावर आधारित असल्याने इतर देशभक्तीपर चित्रपटांशी तुलना करणे टाळता येणार नाही .

या सिनेमाचा प्रकार पाहता  शहरी प्रेक्षकांना तो अधिक आकर्षित करेल. यामुळे बॉक्स ऑफिसवर काही  प्रमाणात बाधा येऊ शकते. प्री-इंटरव्हल दरम्यानचा एरियल अॅक्शन सीक्वेन्स चांगला आहे , पण इंटर्वल अचानक आल्यासारखे वाटेल.

फायटर : अॅक्शन, कॅमेरा वर्क, व्हीएफएक्समधील मास्टरक्लास | fighter movie review in marathi

अगोदर सांगितल्याप्रमाणे, संगीत आणि बॅकग्राऊंड स्कोअर समाधानकारक नाही आहे. पण इतर टेकनिकल  गोष्टीबाबत फायटर पूर्ण गुण मिळवतो. सच्चिथ पाउलोसचे कॅमेरा वर्क दमदार आहे.

जेट फायटिंग सीन्स दरम्यान कॅमेरा हालचाली उत्साहवर्धक आहेत . व्हीएफएक्सची कामे चांगली झाली आहेत आणि तो  चित्रपटाचा सर्वात मोठा  USP ठरतो . एडिटिंग चांगली झाली आहे.

सिद्धार्थ आनंदने  एक परिचित कथा घेऊन बऱ्यापैकी आकर्षक सिनेमा आपल्यापर्यंत पोहचवला आहे , जी नेहमीच त्याच्या चित्रपटनिर्मितीची शैली आहे.

सिद्धार्थने ज्याप्रकारे हवाई अ‍ॅक्शन सीन्सची  कल्पना केली आहे ती उत्कृष्ट आहेत. त्यासाठी अ‍ॅक्शन कोरिओग्राफर विशेष कौतुकास पात्र आहेत. विशेषत: हवाई दलाच्या जवानांमधील अ‍ॅक्शन सीन्स आणि त्यांचे डायलॉग्ज चांगले आहेत.

फायटर: एक रोलरकोस्टर राईड

एकंदरीत, फायटर हा एक समाधानकारक एरियल अॅक्शन सिनेमा आहे जो चकचकीत अ‍ॅक्शन सीन्सने आणि हृतिक रोशनच्या ठोस कामगिरीने परिपूर्ण झालेला आहे. स्टोरी मध्ये काहीही नवीन नाही, पण सिनेमात आकर्षक अ‍ॅक्शन सीन्स आणि कोणतेही कंटाळवाणे क्षण नाहीत.

दीपिका पदुकोण, अनिल कपूर आणि करण सिंग ग्रोव्हर त्यांच्या भूमिका उत्तम आहेत. इंटर्वल नंतर इमोशन्स देखील चांगल्या प्रकारे  काम करतात. पण जर एखाद्याला खूप नवीन अश्या स्टोरीची  अपेक्षा असेल, तर ते थोडेसे निराश होऊ शकतात. जर तुम्हाला हे ठीक वाटले , तर तुम्ही फायटर त्याच्या टेकनिकल गोष्टींसाठी पाहू शकता.

Read More: why are movies released on friday

Leave a Comment