Laapataa ladies review in marathi 

साद्या वाटणाऱ्या या सिनेमात काय आहे खास? नक्की पाहावा असा “लापता लेडीज” जाणून घ्या रिव्ह्यू!!

Laapataa ladies review in marathi: ‘लापता लेडीज’ हा सिनेमा त्याच्या स्टोरी आणि त्याच्या कलाकारांमुळे वेगळा ठरतो. ‘लापता लेडीज’ या जबरदस्त सिनेमाद्वारे डायरेक्टर किरण राव तब्बल 13 वर्षांनंतर दिग्दर्शनाकडे वळली आहे. ‘लापता लेडीज’ किरण रावने डायरेक्ट केला असून आमिर खान ने प्रोड्युस केला आहे.

पोलिस अधिकाऱ्याच्या रोल मध्ये रवी किशनने कमाल अभिनय केला आहे. त्याचबरोबर सिनेमात नवीन कलाकारांनी देखील खूप चांगला अभिनय केला आहे.

  • नाव: लापता लेडीज
  • रेटिंग: ३.५/५
  • स्टार कास्ट: नितांशी गोयल, प्रतिभा रंता, स्पर्श श्रीवास्तव, रवी किशन, छाया कदम, गीता अग्रवाल
  • डायरेक्टर: किरण राव
  • प्रोड्युसर: आमिर खान
  • रिलीज डेट: ०१ मार्च २०२४
  • प्लॅटफॉर्म: थिएटर
  • Laapataa Ladies Trailer: Watch here

laapataa ladies story

‘लापता लेडीज’ सिनेमाची स्टोरी दोन नववधूंच्या नकळत झालेल्या आदला-बदली भोवती फिरते, मात्र याच बहाण्याने ती गावात राहणाऱ्या स्त्रियांच्या आयुष्याचा जवळून अनुभव घेते. साध्या दिसणाऱ्या या स्टोरी मध्ये अशे बरेच सीन्स आहेत जे तुम्हाला हसवतील आणि धक्का देखील देतील.

या सिनेमाची स्टोरी २००१ वर्षाची पार्श्वभूमी दाखवतो. ज्यामध्ये दोन घुंघट घातलेल्या नवविवाहित जोडपे प्रवाशांनी खचाखच भरलेल्या गर्दीमध्ये एकमेकांच्या बाजूला बसतात. जेव्हा ते त्यांच्या स्टेशनवर पोहचतात, तेव्हा दीपक (स्पर्श श्रीवास्तव) त्याच्या झोपलेल्या पत्नी म्हणजेच फूल कुमारीला (नितांशी गोयल) उठवतो आणि तिच्यासोबत स्टेशनवर उतरतो.

घरी पोहचल्यानंतर पारंपारिक विधी दरम्यान वधूची आदला बदल झाल्याचे समोर येते. तेव्हा आदला बदल झालेल्या वधू ला पाहून दीपक आणि त्याच्या घरच्यांना धक्का बसतो. तेव्हा ही वधू तिचे नाव पुष्पा (प्रतिभा रंता) असल्याचे सांगते.

दुसरीकडे फूल स्वतःला दुसऱ्या वराच्या घरी जाण्यापासून वाचवते आणि स्टेशनवरच राहते. एकीकडे दीपक फुलचा खूप शोध घेतो आणि पोलिस स्टेशनला जाऊन इन्स्पेक्टर (रवि किशन) कडे तक्रार नोंदवतो, तिथेच पुष्पाचा नवरा पुष्पा विरोधात दागिने चोरी करून पळून गेल्याची तक्रार दाखल करतो.

आणि पोलीस इन्व्हेस्टिंग दरम्यान पुष्पा ही एका टोळीचा भाग असल्याचे पोलिसांना संशय येतो. खरोखरच पुष्पाचा कोणत्या गुन्ह्यात सहभाग आहे का? दीपकला त्याची फूल सापडते का? वधू सापडल्यानंतर ते तिला योग्य ठिकाणी पोहचवतील का? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सिनेमा पहिल्यांनंतर मिळतील.

Image Source: Instagram

Laapataa ladies review in marathi 

‘धोबी घाट’ सारख्या सिनेमांचे डिरेक्शन करणाऱ्या किरण राव ने तिच्या सिनेमातून अनेक मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र तिने या सिनेमाचा कुठेही उपदेश होऊ दिला नाही.

नववधूंच्या आदला बदली ला कारणीभूत असलेला घुंघट एक प्रकारे पितृसत्ताक विचारसरणीवर हल्ला करतो. तसेच ग्रामीण परिस्थितीमध्ये अनेक स्त्री पात्रे आहेत आणि प्रत्येक पात्राच्या माध्यमातून ते एका मुद्दाकडे लक्ष केंद्रित करतात, जसे की अशिक्षित फूल लग्न झाल्यामधेच स्वतःला आनंदी समजते, परंतु जेव्हा ती स्टेशनवर  राहते तेव्हा तिला तिचे स्वयंपाक कौशल्य कळते आणि ती स्वत: ला स्वावलंबी बनवते.

दुसऱ्या बाजूला पुष्पा आहे, जिला आयुष्यात अजून जास्त शिक्षण घेऊन काहीतरी बनायचे आहे. स्टेशनवर चहाची टपरी चालवणाऱ्या मंजू (छाया कदम) यांनी कौटुंबिक हिंसाचार आणि अयोग्य पतीला नकार देऊन एकटीने आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच दिपकच्या वहिनीची व्यक्तिरेखा साकारलेली एक स्त्री आहे जी खूप दिवस परदेशात राहणाऱ्या आपल्या पतीची वाट पाहत दिवस काढताना दिसते.

समाजातील ‘इज्जतदार मुलगी’ ही गोष्ट सर्वात मोठी फसवणूक आहे, या गोष्टीचा किरणने खोलवर समाचार घेतला आहे , कारण या स्थितीमुळे ती कधीच प्रश्न विचारू शकत नाही.

पण किरणच्या दिग्दर्शनाचे सौंदर्य हे आहे की इतके मुद्दे घेऊन सुद्धा सिनेमा कुठेही बोर वाटत नाही. सिनेमा आपले भरपूर मनोरंजन करतो, हसवतो आणि महिलांनी स्वावलंबी होण्यासोबतच त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याच्या विचारावर हा सिनेमा भर टाकतो.

सिनेमातील डायलॉग्ज विनोदी आणि परिस्थितीला साजेसे आहेत. हा सिनेमा दोन नववधूंच्या बहाण्याने स्त्रियांच्या जीवनातील अनेक पैलूंना स्पर्श करतो. तसेच सिनेमात समाजातील अनेक कटू वास्तव बिनदिक्कतपणे मांडलेले दिसून येते.

laapataa ladies cast

कास्टिंग हा सिनेमाचा आणखी एक मजबूत मुद्दा आहे, जे रोमिल मोदीने चांगल्या प्रकारे सादर केले आहे.या सिनेमात टिपिकल हिंदी सिनेमांप्रमाणे व्हिलन नाही.

पोलीस कर्मचारी मनोहर भले भ्रष्ट आणि लोभी असेल, पण तो चारित्र्यहीन नाही. या रोलसाठी रवी किशन चे परफेक्ट कास्टिंग झाले आहे. स्क्रीनवर तो आपल्या मजबूत उपस्थितीची जाणीव करून देतो. तसेच प्रत्येक सीन मध्ये तो भाव खाऊन जातो.

लीड कास्ट असलेल्या नितांशी गोयल, स्पर्श श्रीवास्तव आणि प्रतिभा रंता यांनी छोट्या पडद्यावर काम केले आहे, पण सिनेमातून मोठ्या स्क्रीनवर पदार्पण करणाऱ्या या कलाकारांनी आपापल्या महत्त्वाच्या व्यक्तिरेखा अतिशय सुंदरपणे जगल्या आहेत.

नितांशीने तिची निरागसता फुलासारखी जपली आहे, तर प्रतिभा तिच्या ओघवत्या आणि बंडखोर शैलीत खूप लोकप्रिय आहे. पत्नीच्या शोधात असलेल्या दीपकची व्यक्तिरेखा स्पर्शने मनापासून साकारली आहे.

छाया कदम यांचे काम उल्लेखनीय आहे. त्याच्यासोबत सहाय्यक पात्रांच्या भूमिकेत येणारे कलाकारही काही वेळा गप्प बसूनही कथेत बरेच काही सांगतात.

सिनेमॅटोग्राफर विकास नौलखा यांनी आपल्या कॅमेऱ्यातून ग्रामीण जीवन खूप बारकाईने दाखवले आहे. राम संपत यांनी संगीतबद्ध केलेले संगीत आणि स्वानंद किरकिरे, प्रशांत पांडे, दिव्यानिदी शर्मा यांनी लिहिलेले गीत ग्रामीण पार्श्वभूमीला साजेसे आहे.

ALSO READ: जाणून घ्या बॉलीवूडचे ‘पाकिस्तान’ जिथे पीके’ पासून ते ‘बजरंगी भाईजान’ पर्यंत अनेक हिट सिनेमांचे शूटिंग झाले

Leave a Comment