लता मंगेशकर: 50,000 गाणी गायली पण स्वतःचे गाणे कधीही पडद्यावर पाहिले किंवा ऐकले नाही… जाणून घ्या स्वर कोकिळेचे मनोरंजक किस्से
Lata mangeshkar information in marathi: आज स्वर कोकिळा लता मंगेशकर यांची दुसरी पुण्यतिथी आहे. याच निमित्ताने आमी तुम्हाला त्यांच्या जीवनाशी निगडित अशा काही रंजक गोष्टी सांगणार आहोत ज्या कदाचित तुम्हाला माहित नसतील.
Lata mangeshkar death anniversary: लता मंगेशकर यांना त्यांच्या आवाजाच्या जादूमुळे संगीताच्या दुनियेत ‘सुरांची देवी’ म्हटले जायचे. लता मंगेशकर यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात एकूण ३६ भाषांमध्ये ५०,००० गाणी गायली आहेत.
परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य होईल की, त्यांनी कधीही स्वतःची गाणी पडद्यावर पाहिली किंवा ऐकली नाहीत कारण त्यांचा असा विश्वास होता कि जर त्यांनी स्वतःचे गाणे ऐकले तर त्यात नक्कीच काहीतरी दोष सापडेल. संगीताच्या दुनियेत लोक त्यांना ‘लता दीदी’ म्हणतात.
आज लता मंगेशकर यांच्या दुसऱ्या पुण्यतिथीनिमित्त आम्ही तुम्हाला त्यांच्या जीवनाशी संबंधित काही रंजक गोष्टी सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया…
Lata mangeshkar information in marathi
लता मंगेशकर यांचे लहानपणीचे नाव हेमा होते
लता मंगेशकर यांचे लहानपणीचे नाव हेमा होते हे फार कमी लोकांना माहीत आहे. त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर यांनी त्यांच्या भावबंधन नाटकातील मुख्य पात्र लतिका यांच्या नावाने प्रभावित होऊन त्यांच्या मुलीचे नाव लता ठेवले.
इतकेच नाही तर त्यांच्या आडनावातील मंगेशकर या शब्दामागे देखील एक रंजक गोष्ट आहे. खऱ्या आयुष्यात लताजींच्या वडिलांचे खरे नाव दीनानाथ अभिषेकी होते, पण त्यांना त्यांच्या मुलांच्या नावापुढे दुसरे आडनाव जोडायचे होते.
त्यांच्या पूर्वजांचे नाव मंगेशी आणि कुलदैवताचे नाव मंगेश होते. मग अशा परिस्थितीत त्यांनी आपले आडनाव बदलून मंगेशकर असे ठेवले. यानंतर त्यांनी मुलांच्या नावापुढे मंगेशकर हे आडनाव जोडले.
लता मंगेशकर नेहमी पांढऱ्या साडीत का दिसायच्या ?
लता मंगेशकर यांच्या आवाजासोबतच त्यांचा पेहरावही त्यांची ओळख बनला होता. त्या नेहमी पांढऱ्या साडीत दिसायच्या.
एक मुलाखतीमध्ये त्यांना या बाबतीत विचारण्यात आले होते तेव्हा त्या म्हणाल्या, ” त्यांना लहानपणापासूनच पांढरा रंग आवडतो. एक प्रसंग सांगताना त्या म्हणाल्या की एकदा जोरदार पाऊस पडत होता आणि त्यांना रेकॉर्डिंग साठी जावं लागला होत. तेव्हा त्या केशरी आणि पिवळ्या रंगाची शिफॉन क्रेप साडी घालून स्टुडिओत पोहचल्या होत्या. तेव्हा स्टुडिओतील एका कलाकाराने त्यांना विचारले कि तिने काय घातले आहे. यांनतर त्यांना समजले कि फक्त पांढरी साडीच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला शोभते आणि लोकांनाही त्यांना त्यात पाहायला आवडते.”
आवाज ऐकून जवाहरलाल नेहरू देखील रडले
१९६२ मध्ये झालेल्या चीनच्या हल्ल्यानंतर संपूर्ण देशात निराशेचे वातावरण होते.
लताजींना २६ जानेवारी १९६३ रोजी त्यांचे ‘ए मेरे वतन के लोगो’ गाणे गाण्यास सांगितले होते तेव्हा त्यांनी हे गाणे गायले. त्यांच्या आवाजात इतकी वेदना होती की पंडित जवाहरलाल नेहरू देखील गाणे ऐकून रडू लागले.
अनेक पुरस्कार मिळाले
लता मंगेशकर यांनी त्यांच्या कारकिर्दीत ५० हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. असा कोणताही सन्मान नाही जो त्यांना मिळाला नाही.
त्यांना भारतरत्न, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय त्यांना 3 नॅशनल अवॉर्ड आणि 4 फिल्मफेअर अवॉर्डही मिळाले.
Lata Mangeshkar news marathi
लता मंगेशकर यांनी ३६ भाषांमध्ये दिला आपला आवाज!!
लताजींनी केवळ हिंदी आणि उर्दू भाषेतील गाण्यांवर राज्य केले नाही तर मराठी, भोजपुरी, कन्नड, तमिळ, बंगाली आणि इतर अनेक भाषांसह देशभरातील 36 भारतीय भाषांमध्ये आपला आवाज दिला आहे.
या गाण्याने नशीब बदलले
फिल्म संगीतकार गुलाम हैदर यांनी लताजींना पहिल्या गाण्याची ऑफर दिली होती. १९४८ च्या ‘मजबूर’ या सिनेमात गाण्यासाठी त्यांना ऑफर देण्यात आली होती.
या सिनेमातील ‘दिल मेरा तोडा’ हे गाणे खूप गाजले आणि त्यांनतर लताजींनी कधीही मागे वळून पाहिले नाही.
पहिल्या गाण्यातून कमावले 25 रुपये
वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी लता मंगेशकर यांनी ‘पहिली मंगलागौर’ या सिनेमातून पदार्पण केले आणि त्यांची पहिली कमाई 25 रुपये होती.
लताजींना होती स्वयंपाकाची आवड
लताजींच्या गायनाबद्दल सगळ्यांनाच माहित आहे, पण त्यांना स्वयंपाकाचीही आवड होती हे फार कमी लोकांना माहीत आहे. याशिवाय लताजींना खाण्यापिण्याची देखील खूप आवड होती.
1955 मध्ये बनल्या म्युसिक डायरेक्टर
आपल्या यशस्वी गायन कारकिर्दीसोबतच लता मंगेशकर यांनी संगीत दिग्दर्शनही केले आहे . त्यांनी संगीत दिग्दर्शक म्हणून ‘राम राम पाव्हणं’ हा मराठी चित्रपट केला. यानंतर त्यांनी अनेक मराठी चित्रपटांना संगीत दिले.
ALSO READ : All India Rank Movie Release Date