संजय लीला भन्साळी यांनी केली “लव्ह अँड वॉर” ची घोषणा!! “लव्ह अँड वॉर” च्या कास्टिंगमध्ये आहे यशाचे रहस्य!
संजय लीला भन्साळी Love and war movie 2025 ही मॉडर्न प्रेमकथा घेऊन येत आहेत. या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल दिसणार आहेत. या तगड्या कलाकारांमुळे चित्रपट नक्कीच मजेशीर असणार आहे पण भन्साळींचा रेकॉर्ड बघितला तर ‘लव्ह अँड वॉर’ चे यश या कास्टिंगवरूनच दिसून येते . ते कसे ते आम्ही तुम्हाला सांगतो…
Love and war movie announcement
बॉलिवूड दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची गणना मोठ्या पडद्यावर भव्य लव्ह स्टोरीज सादर करणाऱ्या दिग्दर्शकांमध्ये केली जाते. त्याच्या चित्रपटांचा सेटअप आणि स्केल नक्कीच ग्रँड स्केल चे असते.
याशिवाय, चित्रपटातील कलाकार देखील खूप दमदार आहेत. आता भन्साळी त्यांच्या ‘लव्ह अँड वॉर’ या नव्या चित्रपटात अशाच कलाकारांना घेऊन येत आहेत, ज्याची चित्रपटाच्या घोषणेपासून बरीच चर्चा झाली आहे.
अजून एक रोमांचक गोष्ट म्हणजे रणबीर-आलिया हे खऱ्या आयुष्यातील जोडपे पहिल्यांदाच फुल-ऑन लव्हस्टोरीमध्ये दिसणार आहेत. भन्साळी यांनी या उत्कृष्ट कास्टिंगद्वारे केवळ ‘लव्ह अँड वॉर’ साठी माहोल तयार केले नाही तर त्यांनी त्याचा एक पॅटर्न देखील रिपीट केला आहे ज्यामुळे त्यांना खूप यश मिळाले आहे. भन्साळींचा हा फॉर्म्युला त्यांच्या सिनेमांना हिट तर बनवतोच, पण बॉक्स ऑफिसवर तो खूप हिट ही ठरतो.
Love and war movie cast | रिअल लाइफ आयुष्यातील जोडप्यांचे कास्टिंग
भन्साळींनी ‘लव्ह अँड वॉर’ मध्ये रणबीर आणि आलियाला कास्ट केले आहे. मात्र त्यांनी हे काही पहिल्यांदाच केले नाही. थोडं मागे जाऊ या, ‘हम दिल दे चुके सनम’ च्या कलाकारांकडे बघू ज्यांनी भन्साळींना सलमान खान, ऐश्वर्या राय आणि अजय देवगण या मोठ्या दिग्दर्शकांच्या लीगमध्ये आणलं.
प्रत्येक बॉलीवूड प्रेमीला ही गोष्ट माहित आहे की जेव्हा हा चित्रपट बनत होता तेव्हा सलमान खान आणि ऐश्वर्या राय त्यांच्या डेटिंगच्या फेज मध्ये होते.
भन्साळींनी ‘हम दिल दे चुके सनम’ मध्ये यांना कास्ट करून एक ट्रिक खेळली होती आणि उर्वरित काम चित्रपटाच्या ब्लॉकबस्टर कमाईने पूर्ण केले.
‘सावरिया’ मध्ये भन्साळींनी रणबीर कपूर आणि सोनम कपूर या दोन स्टार किड्सना डेबूट ची संधी दिली. त्यावेळीही त्यांच्या डेटींगची चर्चा चर्चेत होती. ज्याला काही वर्षांनी दोन्ही कलाकारांच्या बोलण्यातून क्लिअर झाल्याचे दिसले.
त्याचप्रमाणे, ‘राम लीला’, ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘पद्मावत’ मध्ये भन्साळींनी बॉलीवूड चाहत्यांच्या आवडत्या जोडी रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणची जोडी रिपीट केली.
या तिन्ही चित्रपटांनी थिएटरमध्ये भरपूर कमाई केली . भन्साळी यांनी त्यांच्या करिअर मध्ये 10 चित्रपट दिग्दर्शित केले आहेत, ज्यापैकी 5 चित्रपटांमध्ये लीड ऍक्टर हे रिअल लाइफ कपल होते.
Love and war Sanjay leela Bhansali | भन्साळींचा हा फॉर्म्युला काम कसा करतो ?
भन्साळींच्या ‘गंगुबाई काठियावाडी’ ला लव्हस्टोरी म्हणता येणार नाही. बाकी 9 सिनेमे लव्हस्टोरी आहेत. पण यापैकी भन्साळींचा पहिला चित्रपट ‘खामोशी: द म्युझिकल’ हा हैप्पी एंडिंग असलेला सिनेमा आहे.
बाकी 8 चित्रपटांच्या प्रेमकथांमध्ये ज्या पात्राची लव्हस्टोरी सुरू होते त्यामध्ये तिला तिचा प्रियकर सापडत नाही. हे सिनेमे आहेत- हम दिल दे चुके सनम, देवदास, ब्लॅक, सावरिया, गुजारिश, राम लीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत.
रणबीर आणि सोनमच्या सिनेमातील पात्र देखील ‘सावरिया’मध्ये हैप्पी एंडिंग पर्यंत पोहोचत नाहीत. खऱ्या आयुष्यातील जोडी दीपिका आणि रणवीरच्या तिन्ही चित्रपटांमध्ये, त्यांची पात्रे चित्रपटाच्या शेवटी भेटत नाहीत. ‘पद्मावत’ मध्ये रणवीर जरी व्हिलन असला तरी संपूर्ण स्टोरी त्याच्या राणी पद्मावती मिळवण्याच्या इच्छेवर आधारित आहे.
भन्साळीच्या दुःखी शेवट असलेल्या लव्हस्टोरीपैकी ‘देवदास’, ‘गुजारिश’ आणि ‘ब्लॅक’ हे चित्रपट आहेत ज्यांचे मुख्य कलाकार खऱ्या आयुष्यातील जोडपे नव्हते. ‘ब्लॅक’ मध्ये हे शक्य नव्हते कारण मुख्य पात्रांमध्ये जनरेशन गॅप होता.
ऐश्वर्या रायला पारोच्या भूमिकेत आणणाऱ्या भन्साळीला पहिल्यांदा ‘देवदास’ साठी सलमानला कास्ट करायचे होते, असे म्हटले जाते . मात्र सलमानच्या नकारानंतर शाहरुख खानला कास्ट करण्यात आले. सलमानने नकार देण्याचे कारण कुठेही सांगितलेले नाही, पण काही वर्षांनी शाहरुखने साकारलेल्या देवदासच्या पात्राला सलमानने ‘लूजर ‘ म्हटले होते.
Love and war movie 2025
नेटफ्लिक्ससह संजय लीला भन्साळी ची बहुप्रतिक्षित वेब-सिरीज हीरा मंडी या वर्षाच्या शेवटी रिलीज होणार आहे. मनीषा कोईराना, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, रिचा चढ्ढा स्टारर ही वेब सिरीज स्वातंत्र्यपूर्व भारतातील वेश्यांच्या जीवनावर आधारित आहे.
ही वेब सिरीज वेश्यांचे प्रेम, विश्वासघात, वारसाहक्क आणि हीरामंडी कोठ्याच्या राजकारणातील विषयांवर आधारित असेल.
“लव्ह अँड वॉर” ख्रिसमस 2025 मध्ये रिलीज होणार आहे. हा चित्रपट भन्साळी प्रॉडक्शनचा आहे.
Read More: why are movies released on friday