लव्ह स्टोरीया: करण जोहर सांगणार खऱ्या प्रेमाची कहाणी…. जाणून घ्या ‘लव्ह स्टोरीया’ ची रिलीज डेट
love storiyaan release date: निर्माता-दिग्दर्शक करण जोहर त्याच्या कौटुंबिक सिनेमांसाठी ओळखला जातो. पण, त्याचे रोमँटिक सिनेमे देखील खूप मजेदारआहेत . सध्या करणने फेब्रुवारी या प्रेमाच्या महिन्यात त्याच्या प्रेक्षकांसाठी एक भेट आणली आहे.
त्याने त्याच्या आगामी वेब सीरिजची घोषणा केली आहे जी खऱ्या लव्हस्टोरीवर आधारित आहे. सिरीज कधी आणि कुठे रिलीज होणार आहे ते जाणून घ्या.
Love storiyaan webseries 2024
फेब्रुवारीला प्रेमाचा महिना म्हणून ओळखले जाते. जरी तुमच्याकडे प्रेम व्यक्त करण्यासाठी आठवडा, महिना किंवा वर्ष नसले तरी व्हॅलेंटाईन वीक हे तुमच्या जोडीदारांना स्पेशल फील करून देण्यासाठी सुंदर कारण आहे.
जर तुम्हाला व्हॅलेंटाईन वीकमध्ये तुमच्या पार्टनरसोबत घरच्या घरी रोमँटिक सिनेमा किंवा सिरीज चा आनंद घ्यायचा असेल, तर तुमच्या वॉच लिस्टमध्ये ‘लव्ह स्टोरीया ‘चा समावेश करा.
‘लव्ह स्टोरीया ‘ ही खऱ्या प्रेमावर विश्वास ठेवायला शिकवणारी सिरीज आहे. ही सिरीज खऱ्या लव्हस्टोरींवर आधारित आहे.
karan johar new webseries | करण जोहरच्या नव्या वेब सिरीजची घोषणा
रोमँटिक आणि फॅमिली ड्रामा सिनेमे करण्याऱ्या करण जोहरने खऱ्या आयुष्यातील लव्ह स्टोरींवर आधारित वेब सीरिजची घोषणा केली आहे.
त्याने इंस्टाग्राम पोस्टर च्या कॅप्शन मध्ये लिहिले आहे कि,” या व्हॅलेंटाइनला तुमच्या भेटीला येत आहेत भारताच्या कानाकोपऱ्यातील खऱ्या प्रेमाच्या खऱ्या गोष्टी.” ही वेबसिरीज करण जोहरने प्रोड्युस केली आहे.
या सिरीजबद्दल बोलताना कारण जोहर यांनी म्हटले आहे की, ” ही सिरीज प्रेमाच्या वेगवेगळ्या पैलूंकडे पाहते आणि नात्यातील एक सुंदर चित्र रेखाटते.
ही स्टोरी ज्यांनी खरे प्रेम शोधण्याच्या प्रवासात मोठ्या अडथळ्यांचा सामना केला आणि संस्कृती, जेंडर, विश्वास, किंवा अगदी युद्धाच्या अडथळींसारख्या परिस्तिथीला सामोरे जाऊन चिकाटी दाखवली अशा खऱ्या लोकांच्या स्टोरीज आहेत.
खऱ्या आयुष्यातील लोकांच्या खऱ्या स्टोरीज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा पहिला प्रयत्न आहे आणि ही मालिका भारतामध्ये आणि जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास सक्षम असेल.”
love storiyaan webseries director
“लव्ह स्टोरीया” वेबसिरीज मध्ये देशभरातील सहा खऱ्या आयुष्यातील कपल आणि त्यांच्या प्रेम, आनंद, आशा आणि सर्व संकटांवर विजय मिळवण्याच्या स्टोरीज बघायला मिळणार आहेत.
या सहा स्टोरीज हार्दिक मेहता, शाझिया इक्बाल, अक्षय इंडीकर, कॉलिन डी’कुन्हा, अर्चना फडके, आणि विवेक सोनी यांनी दिग्दर्शित केल्या आहेत.
love storiyaan release date
खऱ्या लव्हस्टोरीजवर आधारित ‘लव्ह स्टोरीया’ अमेझॉन प्राइम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्म वर रिलीज होणार आहे.
व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी म्हणजेच १४ फेब्रुवारी ला ओटीटी वर स्ट्रीम केले जाईल.
इंस्टाग्राम वर पोस्टर शेअर करताना प्राइम व्हिडीओने लिहिले की,” या व्हॅलेंटाईन डे ला आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत अशा स्टोरीज ज्या तुम्हाला प्रेमाच्या जादूवर विश्वास ठेवण्यास भाग पाडतील.”
‘लव्ह स्टोरीया’ व्यतिरिक्त करण जोहर अनेक मोठे सिनेमे घेऊन येत आहे. करण जोहर च्या आगामी चित्रपटांमध्ये ‘द बुल’, ‘सरजमीन’ ‘दुल्हनिया 3’, आणि ‘जिगरा’ यांचा समावेश आहे.
ALSO READ: लता मंगेशकर 50,000 गाणी गायली, पण स्वतःचे गाणे कधीही पडद्यावर पाहिले किंवा ऐकले नाही