जाणून घ्या बॉलीवूडचे ‘पाकिस्तान’ जिथे ‘पीके’ पासून ते ‘बजरंगी भाईजान’ पर्यंत अनेक हिट सिनेमांचे शूटिंग झाले!
mandawa film shooting: राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यात वसलेले मांडवा हे एक छोटे शहर आहे. जे तेथील किल्ले आणि जुन्या हवेली साठी ओळखले जाते.
मांडवा शहराशी बॉलीवूडचे जुने संबंध आहेत. येथील वाळूचे ढिगारे आणि मोकळे मैदान सिनेमांमध्ये पाकिस्तानचा भाग मनून दाखवले जाते. २०१५ साली रिलीज झालेल्या ‘बजरंगी भाईजान’ सिनेमामध्ये मांडवा येथील अनेक सीन दाखवण्यात आले आहेत.
movies shot in mandawa
बॉलीवूड च्या बऱ्याच सिनेमात आपल्याला सुंदर लोकेशन्स दिसतात. सिनेमातील लोकेशन्स हे सिनेमाची जान असतात. कधी ते सिनेमाच्या स्टोरी वर अवलंबून असते तर कधी सिनेमाच्या लोकेशन्सवर.
बॉलीवूड मधील अनेक डायरेक्टर अशाच सुंदर लोकेशन्ससाठी बाहेर देशात जातात आणि तेवढाच खर्च सिनेमाच्या शूटिंगवर देखील करतात. मात्र असेच एक लोकेशन आपल्या भारतात देखील आहे जे मागील काही वर्षांमध्ये बॉलीवूड इंडस्ट्री ची पसंद बनली आहे.
mandawa film shooting
आम्ही ज्या लोकेशन्स बद्दल बोलत आहोत ते राजस्थान मधील झुंझुनू जिल्ह्यात असलेल्या मांडवा या शहराबद्दल… जे जुने किल्ले आणि वाडे यासाठी ओळखले जाते.
येथील वाळूचे ढिगारे आणि मोकळे मैदान बऱ्याच सिनेमांमध्ये पाकिस्तानचा भाग म्हणून दाखवले जाते. बजरंगी भाईजान या सिनेमात मांडवा येथील अनेक सीन दाखवण्यात आले होते.
सलमानपासून आमिरपर्यंत सगळेच मांडवा मध्ये
सलमान खानच्या बजरंगी भाईजान या सिनेमाचे बरेचशे शूटिंग याच सुंदर शहरात करण्यात आले होते. या सिनेमात दाखवलेली भारत-पाक सीमा देखील मांडवा येथील आहे.
तसेच आमिर खानच्या पीके या सिनेमाचे शूटिंग देखील याच ठिकाणी करण्यात आले होते. जेव्हा आमिर खान पीके सिनेमात पहिल्यांदा ज्या पृथ्वीच्या भागात पाय ठेवतो ते लोकेशन मांडवा आहे. आणि ज्या दुकानातून तो समोसे घेतो ते मांडवा मधील स्थानिक दुकान आहे.
film shooting in mandawa
बॉलिवूडसाठी मांडवा लकी!
मांडवा केवळ सुंदरच नाही तर फायदेशीर देखील आहे. कारण येथे शूटिंग साठी होणारा खर्च खूप कमी आहे. आणि डायरेक्टर ला हवी तशी मनासारखी लोकेशन देखील भेटतात.
यामुळेच हे ठिकाण डायरेक्टर आणि प्रोड्युसरची पसंती ठरत आहे. बॉलीवूडचे इथपर्यंत पोहोचण्याचे आणखी एक मोठे कारण म्हणजे सिनेमाचे डायरेक्टर त्यांच्या सिनेमांसाठी हे शहर खूप लकी आहे असे मानतात.
which movie shot in mandawa
या सिनेमांचे झाले शूटिंग!!
बहुतेक वेळा डायरेक्टर फक्त गाण्याच्या शूटिंगसाठी मांडवा ला येतात. असाच एक सिनेमा म्हणजे शाहिद कपूर आणि करीना कपूरचा जब वी मेट. या सिनेमाचा राजस्थानशी कसलाही संबंध नव्हता, पण ‘आओ मिलो चले ‘ हे गाणे मांडवामध्ये शूट करण्यात आले होते.
मांडवा येथे अनेक छोट्या-मोठ्या सिनेमांचे शूटिंग झाले आहे. यामध्ये चलो दिल्ली, कच्छे धागे, गुलामी, पहेली, लव आज कल, गुलामी, ए दिल है मुश्किल, मिर्झा, मिमी या सिनेमांचा समावेश आहे.
mandawa popular filming location for bollywood movies
मांडवा दिल्लीपासून फक्त ५ तासांच्या अंतरावर
मांडवा शहर हे फिरण्यासाठी देखील खूप फेमस आहे. दरवर्षी येथे हजारो लोक फिरण्यासाठी येतात. मांडवा सोबतच त्याच्या आजूबाजूच्या जागेत सीकर, नागौर, चुरू, झुंझुनू, बिकानेर, हनुमानगड आणि गंगानगर यांसारखे फिरण्यासाठी स्थळ आहेत.
जर तुम्ही दिल्लीत किंवा त्याच्या आसपास राहत असाल, तर पुढच्या वेळी तुम्ही मांडवाला भेट द्या, कारण मांडवा दिल्लीपासून फक्त ५ तासांच्या (२५७.३ किमी) अंतरावर आहे.
ALSO READ: बाहुबली ऍक्टर प्रभास भाड्याच्या घरात शिफ्ट, किंमत ऐकून बसेल धक्का!