manvat murders story in marathi

manvat murders story in marathi : मित्रांनो तुम्हाला क्राईम थ्रिलर सिरीज पाहायला आवडते का? जर आवडत असेल तर सोनी लिव्ह घेऊन येत आहे एक जबरदस्त सत्य घटनेवर आधारित क्राईम थ्रिलर सिरीज! हि सिरीज १९७० मध्ये घडलेल्या एका खऱ्या घटनेवर आधारित आहे.

तर तयार राहा रहस्य, थरार, आणि स्टार पॉवरचा स्फोट अनुभवण्यासाठी! हि सिरीज मिस करणे म्हणजे खूप मोठी चूक राहील.

manvat murders web series

या वेब सीरिजचं नाव आहे Manvat Murders, हि सिरीज तुम्हाला ७० च्या काळात महाराष्ट्र ला हादरवून टाकणाऱ्या एका सिरीयल किलिंगच्या प्रकरणात घेऊन जाईल.

परभणी मधील मानवतमध्ये लहान मुली आणि महिलांचे खून होऊ लागले होते, आणि या खुनांमागचं कारण खूप काळ गूढच होतं. पण जेव्हा मुंबईहून आलेला एक डीसीपी जेव्हा या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा निर्णय घेतो तेव्हा या प्रकरणातील बऱ्याच धक्कादायक बाजू बाहेर येतात.

बॉलिवूडचे आघाडीचे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी रमाकांत एस. कुलकर्णी यांचा रोल साकारला आहे. ते क्राइम ब्रँचचा अधिकारी असल्या कारणाने या गावात येतात आणि त्यांच्या नेतृत्वाखाली तपास पथक या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावू शकेल का? आणि तेथील खुनाच्या घटना थांबतील का? या सर्व गोष्टींवर हि सिरीज भर टाकते. चला तर मग पाहूया manvat murders story in marathi.

manvat murders cast

या सिरीज मध्ये मध्ये पहिल्यांदाच आपल्याला एकत्र पाहायला मिळणार आहेत आशुतोष गोवारीकर, मकरंद अनासपुरे, सई ताम्हणकर, आणि सोनाली कुलकर्णी. ही ब्लॉकबस्टर सिरीज लवकरच सोनी लिव्हवर रिलीज होणार आहे!

या सिरीज चा टीझर रिलीज झाला असून यातील प्रत्येक सीन खूप रहस्याने भरलेला आहे ज्यामुळे आपलं लक्ष एक क्षणही दुसरीकडे जात नाही आणि आपल्याला गुंतवून ठेवते.

manvat murders story in marathi

मानवत गावात उत्तमराव बारहाते नावाचा एक प्रभावशाली आणि श्रीमंत व्यक्ती राहत होता. तो नगरपालिकेचा अध्यक्षही होता, त्यामुळे त्याच्याकडे बराच पैसा आणि प्रतिष्ठा होती.

उत्तमरावाची नजर गावाबाहेरच्या पारधी वस्तीत राहणाऱ्या रुक्मिणी नावाच्या एका पारधी महिलेवर गेली. त्यानं तिला त्याच्या वाड्यावर राहायला आणलं.

रुक्मिणी आधी हातभट्टीचं दारू बनवायची आणि वाड्यावर आल्यानंतरही ती तिथं राहू लागली. उत्तमरावानं नंतर तिच्यासाठी एक वेगळा वाडा बांधला, जिथं तिनं तिचा हातभट्टीचा व्यवसाय सुरू ठेवला.

manvat murders story

रुक्मिणी त्या वाड्यात आरामात राहत होती, आणि हातभट्टीचा व्यवसायही जोरात सुरू होता. पण तिचं एकच स्वप्न अपूर्ण होतं – मूल होण्याचं. यासाठी तिनं तंत्र-मंत्राचा मार्ग निवडला. ती वेगवेगळ्या मांत्रिकांकडे जाऊ लागली, आणि शेवटी गणपत सावळे नावाच्या एका मांत्रिकाकडे पोहोचली.

त्यानं तिला सांगितलं की, वाड्यातल्या पिंपळाच्या झाडावर मुंज्या वास करतात आणि त्यांना सुंदर मुली आवडतात. त्यांची इच्छा पूर्ण केली, तर तुला मूल होईल, असं त्यानं तिच्या डोक्यात भरवलं. यासाठी बळी देणं आवश्यक असल्याचंही त्यानं तिला सांगितलं.

इथूनच सुरू झाला क्रौर्याचा खेळ – एकामागून एक ११ निष्पाप लोकांचा बळी मानवतमध्ये चढवला गेला, आणि गावाला हादरवून सोडणारी ही मालिका सुरू झाली.

गणपत सावळेच्या सांगण्यावर विश्वास ठेवून, रुक्मिणीनं चार कुमारिकांचा बळी देण्याचा मार्ग निवडला. तिनं त्या चार निरागस, निष्पाप मुलींचा शोध सुरू केला, आणि दुर्दैवानं त्या चार निष्पाप लेकींचा नाहक बळी गेला.

manvat murders story in marathi

या भयानक घटनांमुळे पोलिस प्रशासन खडबडून जागं झालं. तपासात विलंब होऊ नये, यासाठी त्यांच्यावर प्रचंड दबाव होता. अखेर हा गुंतागुंतीचा तपास सीआयडीच्या ताब्यात देण्यात आला.

मुंबई सीआयडीचे कर्तव्यदक्ष अधिकारी, रमाकांत कुलकर्णी आणि विनायक वाटकर, यांनी मानवतकडे धाव घेतली आणि प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा कसून प्रयत्न सुरू केला. आता सत्य बाहेर येणं हे फक्त वेळेचं गणित होतं!

तपासाला पहिला मोठा धक्का तेव्हा बसला, जेव्हा पोलिसांनी रुक्मिणीची बहीण समंदरी पारधीला ताब्यात घेतलं. तिची भीती आणि गुन्ह्याचं ओझं अधिक काळ लपवू शकली नाही. समंदरीनं पोलिसांसमोर जे धक्कादायक खुलासे केले, त्यानं हत्याकांडाचं रहस्य उलगडायला सुरुवात झाली.

यानंतर पोलिसांनी रुक्मिणी आणि उत्तमराव यांच्यावर कठोर कारवाई करत त्यांना अटक केली. परंतु, थोड्याच वेळात त्यांना जामीन मिळवण्यात यश आलं, आणि त्यामुळे ते पुन्हा स्वातंत्र्याच्या आनंदात गढून गेले.

manvat murders release date

परभणीच्या सत्र न्यायालयात रुक्मिणी आणि उत्तमराव विरोधात खटला सुरू होता. कोर्टाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती, पण उच्च न्यायालयाने हा निर्णय धक्कादायकपणे पलटवला.

उच्च न्यायालयाने त्यांना निर्दोष ठरवत फाशीची शिक्षा रद्द केली आणि त्यांच्या शिक्षा म्हणून जन्मठेप ठरवली.

डायरेक्टर आशिष बेंडे यांची हि सिरीज ४ ऑक्टोबरपासून सोनी लिव्हवर रिलीज होणार आहे.

Don’t Miss: Sector 36 movie review in marathi

Leave a Comment