propose day 2024

प्रपोज डे 2024: तुमच्या पार्टनरला प्रपोज करण्यासाठी तुम्हाला शब्द भेटत नसतील तर हे सिनेमे तुम्हाला मदत करतील.

propose day 2024: व्हॅलेंटाईन डे जवळ येत आहे पण त्याआधी, रोज डे ते चॉकलेट डे सारख्या दिवसांमध्ये, लोक त्यांचे प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी सोडत नाहीत.

आज ८ फेब्रुवारी ला  प्रपोज डे साजरा केला जात आहे, त्यामुळे जर तुम्हाला तुमचे प्रेम व्यक्त करण्यात काही अडचण येत असेल, तर हिंदी सिनेमांतील या ओळी तुम्हाला मदत करतील. चला तर मग जाणून घेऊया.

propose day 2024

व्हॅलेंटाईन चा आठवडा सुरू झाला आहे आणि फेब्रुवारी महिना अनेकांच्या आयुष्यात प्रेमाची लाट घेऊन येत असतो. अनेक कपल रोज डे नंतर ८ फेब्रुवारीला प्रपोज डे साजरा करत आहेत.

आता जर रोमान्सचा विषय निघालाच असेल तर त्यामध्ये बॉलीवूड चा सहभाग नसेल असे होऊच शकत नाही.बॉलीवूडच्या सिनेमांनी पडद्यावर वेगवेगळ्या रूपात रोमान्स दाखवला आहे.

bollywood movies with best proposal lines

शाहरुख खानने तर त्याच्या सिनेमांमध्ये प्रेमाबद्दल खूप डायलॉग्स बोलले आहेत ज्याने जर तुमचा पार्टनर तुमच्यावर रागावला देखील असला तरी त्याचे हे डायलॉग्स तुमच्या पार्टनरच्या  चेहऱ्यावर हसू आणतील.

बरं, आज प्रपोज डेच्या निमित्ताने, जर तुम्हाला तुमच्या जोडीदारा समोर तुमच्या भावना कशा व्यक्त करायच्या समजत नसेल तर आम्ही तुम्हाला हिंदी सिनेमातील अश्या काही  ओळी सांगणार आहोत, ज्या तुमच्या पार्टनर ला नक्कीच प्रभावित करण्यात मदत करतील. चला तर मग पाहूया त्या प्रेमाने भरलेल्या सुंदर ओळी…

Image Source: Google

bollywood movies with best dialogues

कुछ-कुछ होता है

जेव्हा रोमान्स बद्दल बोलले जाते तेव्हा सर्वात पहिले जे नाव डोळ्यासमोर येते ते म्हणजे शाहरुख खान. तुम्हाला शाहरुख खान आणि काजोल चा  ‘कुछ कुछ होता है’ हा सिनेमा तुम्हाला नक्कीच आठवत असेल.

जर तुम्ही तुमच्या कोणत्याही मित्राला प्रपोज करणार असाल तर तुम्ही त्याला या सिनेमातील टॅग लाइन ‘प्यार दोस्ती है’ हे सांगू शकता.

ये जवानी है दीवानी

शाहरुख नंतर जर मुली कोणत्या ऍक्टर च्या रोमँटिक डायलॉग्समध्ये हरवल्या असतील तर तो म्हणजे बॉलिवूडचा सावरिया रणबीर कपूर. त्याच्या ‘ये जवानी है दिवानी’ या सिनेमात अनेक रोमँटिक लाइन्स आहेत, पण एक लाइन आहे जी तुम्हाला तुमच्या पार्टनरला प्रपोज करण्यात मदत करू शकते ती म्हणजे,

‘अगर तुम मुझे यूं ही देखते रहोगे, तो मुझे तुमसे प्यार हो जाएगा-फिर से’।

आशिकी २

मोहित सूरी ने डायरेक्ट केलेला ‘आशिकी 2’ हा सिनेमा 2013 चा आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर यांचा सुपरहिट सिनेमांपैकी एक आहे. ज्यामध्ये राहुल आरोहीला म्हणतो,

“प्यार, मोहब्बत, आशिकी सिर्फ लफ्जों के सिवा और कुछ नहीं… पर जब वो मिली इन लफ्जों को मायने मिल गए”

कल हो ना हो

शाहरुख खान आणि प्रिती झिंटा च्या  ‘कल हो ना हो’ या सिनेमात प्रेमाबद्दल अनेक चांगल्या लाइन्स बोलल्या गेल्या आहेत. प्रपोज डे च्या दिवशी जर तुम्हाला तुमच्या पार्टनर ला इम्प्रेस करायचे असेल तर हे बोलू शकता,

‘प्यार तो बहुत लोग करते हैं, लेकिन मेरे जैसा प्यार कोई नहीं कर सकता है। क्योंकि किसी के पास तुम जो नहीं हो”।

कभी खुशी कभी गम

शाहरुख खानचे तसे बरेच डायलॉग्ज आहेत जे तुम्ही तुमच्या पार्टनर ला बोलू शकता पण ‘कभी खुशी कभी गम’चा हा डायलॉग बेस्ट आहे.

‘दोस्ती के अलावा भी कुछ रिश्ते होते हैं, वो रिश्ते जो हम समझते नहीं, वो रिश्ते जो हम समझना नहीं चाहते। कुछ रिश्ते जिनका नाम नहीं होता, सिर्फ एहसास होता है’।

फना

 तुम्ही प्रपोज डे च्या दिवशी तुमच्या पार्टनरला इंप्रेस करण्यासाठी, थोडा शायराना अंदाज देखील देखील वापरू शकता. आता जर शायरी अंदाजाबद्दल बोलायचे झाले तर काजोल आणि आमिर खान चा ‘फना’ सिनेमा कसा विसरू शकतो. या सिनेमातील एक लाइन आहे जी तुम्ही बोलू शकता,

‘हम से बचके जाओगे कैसे, अपने दिल से हमें निकालोगे कैसे, हम वो खुशबू हैं, जो सांसों में बसते हैं, अपनी सांसो को रोक पाओगे कैसे”।

ओम शांती ओम

जर तुम्ही तुमच्या पार्टनरला प्रपोज करताना ‘ओम शांती ओम’ या सिनेमातील हा डायलॉग बोलला नसेल तर काय म्हणावं? कदाचित प्रत्येक प्रियकराने एकदा तरी हा डायलॉग बोलला असेल.

‘इतनी शिद्दत से मैंने तुम्हें पाने की कोशिश की है कि हर जर्रे ने मुझे तुमसे मिलाने की साजिश की है’।

ALSO READ: अहान पांडे ची होणार बॉलीवूड एन्ट्री

Leave a Comment