ranbir kapoor ramayana update in marathi: “रामायण” सिनेमाची घोषणा होण्या अगोदरच रणबीरने या सिनेमात धमाका करण्याचा निर्णय घेतला आहे, कारण या सिनेमात रणबीर एक नव्हे तर दोन वेगवेगळ्या रोल मध्ये दिसणार आहे !
या सिनेमात रणबीर कपूर डबल रोल मध्ये तर दिसणारच आहे, पण नितेश तिवारी यांच्या या सिनेमात अमिताभ बच्चन कोणता रोल साकारणार, हा प्रश्न देखील सर्वांनाच पडला आहे.
Ranbir kapoor ramayana
नितेश तिवारी यांचा रामायण सिनेमा सध्या जोरदार चर्चेत आहे. या सिनेमाबाबत दररोज काही ना काही माहिती समोर येत आहे. कधी त्याच्या कास्टिंग बद्दल तर कधी स्टार्सच्या रोलबाबत. तर नुकतेच अशी माहिती समोर आली आहे कि रणबीर कपूर या सिनेमात एक नाही तर दोन रोल साकारणार आहे.
एवढेच नाही तर या सिनेमात अमिताभ बच्चन यांचे देखील नाव जोडण्यात आले आहे. त्यांना या सिनेमात एक महत्त्वाचा रोल देखील देण्यात आला आहे. चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण काय आहे ते !
Ramayana movie cast
नुकत्याच एका रिपोर्टनुसार, रणबीर कपूर ‘रामायण’ मध्ये भगवान राम च्या रोल मध्ये दिसणार आहे आणि दुसरे म्हणजे, तो विष्णूचा अवतार असलेल्या परशुरामच्या रोल मध्ये देखील दिसणार आहे.
रिपोर्टनुसार असे सांगण्यात आले आहे की, “रामायणमध्ये शिवाचे धनुष्य पिनाक तुटल्यानंतर परशुराम आणि राम यांच्यात संघर्ष होतो. जिथे परशुराम रामाला विष्णूचे धनुष्य तोडण्यास सांगतात. ज्यामध्ये राम यशस्वी झाल्यानंतर ते त्याला विष्णूचा अवतार मानतात. यानंतर परशुराम आपल्या तपश्चर्यापासून मागे हटतो. या महाकाव्यात परशुरामची भूमिका कमी असली तरी डायरेक्टरला ही गोष्ट पडद्यावर अत्यंत महत्त्वाच्या पद्धतीने दाखवायची आहे. त्यामुळे रणबीरच परशुरामची भूमिका साकारणार असल्याचे त्याने ठरवले आहे. त्यासाठी त्याच्या गेटअप आणि मेकअपवर जास्तीत जास्त लक्ष दिले जात आहे.”
ranbir kapoor ramayana update in marathi
याच रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन यांचे नावही ‘रामायण’ शी जोडले गेले आहे. ते या सिनेमात जटायु चा आवाज बनतील. जरी ते या सिनेमात शारीरिकदृष्ट्या दिसणार नसले तरीही त्यांचा दमदार आवाज या सिनेमात नक्कीच ऐकायला मिळेल.
रामायणात जटायुला खूप महत्त्व दिले गेले आहे. जटायुनेच माता सीतेच्या अपहरणाच्या वेळी त्याचे पंख गमावले होते. तसेच जटायुचा VFX खरा दिसावा यासाठी सिनेमाच्या डायरेक्टर ने अमिताभ यांचे डोळे देखील स्कॅन केले असल्याचे सांगितले जात आहे.
सुप्रसिद्ध VFX कंपनी DNEG चे संस्थापक नमित मल्होत्रा या सिनेमाचे सहनिर्माते आहेत. सिनेमाच्या VFX मध्ये त्यांना कोणत्याही प्रकारची कमी सोडायची नाहीये त्यामुळे अत्यंत बारकाईने त्या गोष्टीवर काम केले जात आहे.
KGF स्टार यश देखील या सिनेमाचा प्रोड्युसर आहे. या सिनेमात तो रावण च्या रोल मध्ये दिसू शकतो असे बोलले जात आहे. मात्र, याला अजून अधिकृत मान्यता मिळणे बाकी आहे. ‘रामायण’ सिनेमाबाबत कितीही अपडेट्स येत असले तरी अद्याप या सिनेमाची अधिकृत घोषणा झालेली नाही.
Ramayana movie release date
अलीकडेच, सेटवरील एक नवीन फोटो व्हायरल झाला आहे, ज्या वरून असे समजते कि या सिनेमाच्या पहिल्या पार्टचे शूटिंग पूर्ण झाले आहे आणि आणि टीम आता VFX आणि पोस्ट-प्रॉडक्शनवर काम करत आहे. या सिनेमाचा दुसरा पार्ट डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.
तसेच या सर्व अपडेट्सबाबत सध्यातरी कोणतीही ऑफिशिअल घोषणा झालेली नाही. त्यामुळे सर्व फॅन्स आणि लोकांसोबतच आम्ही देखील सिनेमाच्या घोषणेची वाट पाहत आहोत.
DON’T MISS: विकी कौशल दिसणार छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत! नक्की पहा अंगावर काटा आणणारा धमाकेदार टीझर !