‘ॲनिमल’ नंतर रणबीर आता या पाच सिनेमांनी करणार बॉक्स ऑफिस वर धमाका!!
ranbir kapoor upcoming movies after animal: ‘ॲनिमल’ सिनेमातून बॉक्स ऑफिसवर राडा करणारा रणबीर कपूर येणाऱ्या काही वर्षात अनेक मोठ्या सिनेमांमध्ये दिसणार आहे. त्याच्या ‘ॲनिमल’ने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली होती.
आता तो ज्या सिनेमांमध्ये दिसणार आहे ते अशा प्रकारचे सिनेमे आहेत, ज्यामुळे तो पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवू शकतो.
ranbir kapoor upcoming movies 2025
२०२३ मध्ये रणबीर कपूरने ‘ॲनिमल’ बनून इतिहास रचला होता. रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच, या सिनेमाचा बॉक्स ऑफिस वर दबदबा पाहायला मिळाला. आणि जगभरात तब्बल 915 कोटी रुपयांचा बिजनेस केला.
इतक्या दमदार कमाईसह, हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर ऑल टाइम ब्लॉकबस्टर ठरला. आणि रणबीरच्या करिअर मधील सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा देखील ठरला. मात्र, हे सगळे इथेच थांबत नाही.
ॲनिमलनंतर रणबीरकडे आता असे सिनेमे आहेत ज्यात बॉक्स ऑफिसला हादरवून सोडण्याची ताकद आहे. चला तर मग जाणून घेऊया रणबीर ज्या सिनेमांमध्ये दिसणार आहे त्या सिनेमांची नावे…
ranbir kapoor upcoming movies after animal
- ॲनिमल पार्क
ॲनिमल नंतर आता डायरेक्टर ने देखील त्याचा सीक्वल येणार असल्याचे जाहीर केले आहे, जो ‘ॲनिमल पार्क’ या नावाने रिलीज होणार आहे.
‘ॲनिमल’ चा शेवटचा सीन पाहून दुसऱ्या भागात अजून जास्त रक्तपात होणार असल्याचे दिसून येते. ‘ॲनिमल’ ची दमदार कमाई पाहून ‘ॲनिमल पार्क’ बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल, असा अंदाज बांधता येतो.
- रामायण
या लिस्ट मध्ये अजून एक नाव आहे ते म्हणजे नितेश तिवारी डायरेक्ट करत असलेल्या ‘रामायण’ या सिनेमाचे. या सिनेमाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा होत आहे.
या सिनेमात रणबीर भगवान रामाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात येत आहे. अभिनेत्री सई पल्लवी माता सीतेची भूमिका साकारणार आहे. याशिवाय या सिनेमात सनी देओलही दिसणार आहे, जो हनुमानाची भूमिका साकारणार आहे.
ranbir kapoor upcoming movies name
- ब्रह्मास्त्र 2
‘ब्रह्मास्त्र 2’ हा देखील रणबीरच्या आगामी सिनेमांपैकी एक आहे. त्याचा पहिला भाग २०२२ मध्ये आला होता. या सिनेमाने जगभरात ४०० कोटींहून अधिक कमाई केली होती.
त्यासोबतच त्याच्या दुसरा भागाची देखील घोषणा करण्यात आली होती. ज्याची चाहते खूप दिवसांपासून वाट बघत आहेत.
- लव्ह अँड वॉर
संजय लीला भन्साळी यांचा पुढील सिनेमा ‘लव्ह अँड वॉर’ हा आहे. यामध्ये रणबीरसोबत त्याची पत्नी आणि अभिनेत्री आलिया भट्ट देखील दिसणार आहे. तसेच या सिनेमात विकी कौशलही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
म्हणजेच हे तीन मोठे स्टार्स एकाच सिनेमात एकत्र दिसणार आहेत. अशा परिस्थितीत हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाका करेल यात काहीच शंका नाही.
- राजकुमार हिराणीसोबतचा सिनेमा
गेल्या काही दिवसांपासून आणखी एका सिनेमाची चर्चा होत आहे. राजकुमार हिरानी हा सिनेमा बनवणार असून त्यात रणबीर मुख्य भूमिकेत असणार असल्याचे बोलले जात आहे.
मात्र, अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. पण जर हे दोघे खरंच एकत्र आले तर नक्कीच काहीतरी मोठं होईल, कारण त्यांचा आधीचा ‘संजू’ हा सिनेमा खूप हिट ठरला होता.
ALSO READ: ‘भक्षक’ समाजाचं भयंकर वास्तव उलगडणारा सिनेमा