riteish deshmukh upcoming marathi movie

रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ सिनेमाची चर्चा रंगली, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता!

riteish deshmukh upcoming marathi movie: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित सिनेमात रितेश देशमुख दिसणार ‘राजा शिवाजी’ च्या रोल मध्ये? जाणून घ्या सविस्तर

२०२२ मध्ये रिलीज झालेल्या “वेड ” या सिनेमाद्वारे बॉलीवूड ऍक्टर रितेश देशमुखने डायरेक्टर म्हणून एन्ट्री केली. त्याच्या या सिनेमाला फॅन्स चे खूप प्रेम आणि कौतुक मिळाले.

रितेश ने त्याच्या अभिनयासोबतच  दिग्दर्शनात देखील आपली क्षमता सिद्ध केली. या सिनेमामध्ये तो त्याच्या प्रिय पत्नी जिनिलियासोबत उत्तम ऑन-स्क्रीन बाँड शेअर करताना  दिसला होता. तसेच “वेड ” हा सर्वाधिक कमाई करणारा मराठी सिनेमा ठरला.

riteish deshmukh upcoming movie raja shivaji

रितेशने डायरेक्ट केलेल्या “वेड” च्या यशानंतर, आता तो त्याचा दुसरा सिनेमा राजा शिवाजी चे दिग्दर्शन करताना दिसणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वर सिनेमाची घोषणा करताना म्हणाला, “आज शिवजयंतीच्या मुहूर्तावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘राजा शिवाजी’ सिनेमाची घोषणा करण्याची हीच योग्य वेळ आहे.”

इन्स्टाग्रामवर क्लिप शेअर करत रितेशने लिहिले, “इतिहासाच्या गर्भात, एक अशी आकृती जन्माला आली जीचं अस्तित्व नश्वरतेच्याही पल्याड होतं. एक प्रतिमा, एक आख्यायिका, जे धगधगत्या प्रेरणेचं चिरंतन अग्नीकुंड होतं.

छत्रपती शिवाजी महाराज.. फक्त इतिहासपुरुष नाहीत. ती एक भावना आहे, असामान्य शौर्याचा पोवाडा आहे, साडे तिनशे वर्षांपासून.. प्रत्येकाच्या मनामनात उगवणारा आशेचा एक महासूर्य आहे.

शिवरायांची महागाथा भव्य पडद्यावर जिवंत करता यावी अशी आमची दुर्दम्य महत्वाकांक्षा होती. एका प्रतापी पुत्राच्या महागाथेचा प्रवास ज्याने एका महाकाय सत्तेला उलथवत आणि स्वराज्याचा धगधगता वणवा पेटवला.

एक रणधुरंधर, जिथे शौर्याला सिमा नाही. ज्यांनी जमिनींवर नाही रयतेच्या मनामनांवर राज्य केलं …आणि म्हणूनच प्रत्येकाच्या मुखी ज्यांचं नाव आहे….’राजा शिवाजी’

Image Source: Instagram

riteish deshmukh upcoming marathi movie

सध्या रितेश छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित “राजा शिवाजी” सिनेमाचे डिरेक्शन करण्याच्या तयारीत आहे. त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वर  या सिनेमाची ऑफिसिअल घोषणा केली आहे.

रितेशसाठी हा सिनेमा एक भावना आहे. तसेच त्याचा हा पॅशन प्रोजेक्ट देखील आहे. तो या सिनेमावर आपले सगळे लक्ष फोकस करून काम करणार असल्याचे सांगितले आहे.

बातमीनुसार, रितेश देशमुख या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या लीड रोल मध्ये दिसणार आहे. या सिनेमाचे बेसिक प्री-प्रॉडक्शनचे काम पूर्ण झाले आहे आणि लवकरच रितेश या सिनेमाचे शूटिंग चालू करणार आहे.

riteish deshmukh new marathi movie

रितेश चे प्रोडक्शन हाऊस असलेले मुंबई फिल्म कंपनी जिओ स्टुडिओजच्या सहकार्याने या सिनेमाची निर्मिती करणार आहेत. हा सिनेमा हिंदी आणि मराठी भाषेत रिलीज होणार आहे.

तसेच रितेश म्हणाला, “एखाद्या महान व्यक्तिमत्त्वावर सिनेमा बनवताना त्या व्यक्तिमत्त्वाची भव्यता सिनेमातून उतरून येणे आवश्यक आहे. ज्योती देशपांडे (सीईओ, जिओ स्टुडिओ) आणि जिओ स्टुडिओ यांच्यासोबत काम करण्याचा आम्हाला अभिमान आहे. जिओ स्टुडिओला नेहमीच महत्वाकांक्षी सिनेमांना पाठिंबा देण्याचा वारसा लाभला आहे.”

नॅशनल अवॉर्ड विनर सिनेमॅटोग्राफर संतोष सिवन या सिनेमातून मराठी इंडस्ट्रीत एन्ट्री करणार आहेत.अजय-अतुल या संगीत दिग्दर्शक जोडीला पुन्हा एकत्र आणण्यासाठी रितेश उत्सुक आहे.

“जेव्हा आपण राजा शिवाजी बद्दल बोलतो, तेव्हा तो एक सुंदर दिसणारा सिनेमा असावा अशी आमची इच्छा आहे आणि त्यासाठी सिनेमॅटोग्राफिक जादू दाखवण्यासाठी संतोष सिवन सर यांच्यापेक्षा चांगला कोणीही नाही. जिनिलियाने त्यांचे नाव समोर आणल्याबद्दल मी तिचा आभारी आहे.” असे रितेश म्हणाला.

raja shivaji marathi movie 2025

या सिनेमाच्या कास्टिंग बद्दल अद्याप खुलासा करण्यात आला नाही. मात्र या सिनेमाचे प्री प्रोडक्शन चे काम झाले असून सिनेमाचे शूटिंग लवकरच चालू होणार आहे.

“राजा शिवाजी” सिनेमातुन प्रेक्षकांना एक भव्य सिनेमॅटिक अनुभव पाहायला मिळणार आहे.  रितेश ने दिग्दर्शित केलेला “राजा शिवाजी” २०२५ मध्ये थिएटर मध्ये रिलीज होणार आहे.

ALSO READ : KGF स्टार यशने पत्नी राधिकासाठी किराणा दुकानात जाऊन खरेदी केली टॉफी… सुपरस्टारचा साधेपणा पाहून चाहते थक्क!!

Leave a Comment