Sector 36 movie review in marathi: नुकताच नेटफ्लिक्स वर रिलीज झालेला ‘सेक्टर ३६’ हा सिनेमा २००६ मध्ये नोएडा च्या निठारी गावात झालेल्या हत्याकांडावर आधारित आहे. या घटनेने सगळा देश हादरला होता.
sector 36 movie review
- स्टारकास्ट : विक्रांत मेस्सी, आकाश खुराणा, दीपक डोबरियाल, दर्शन जरीवाला
- डायरेक्टर: आदित्य निंबाळकर
- कॅटेगरी: क्राईम थ्रिलर
- रन टाईम: २ तास ४ मि.
- ट्रेलर: Watch Now
Sector 36 movie review in marathi
नोएडाच्या सेक्टर ३१ मध्ये एका घराच्या मागे असलेल्या एक नाल्यातून सुमारे २४ मुलांचे सांगाडे सापडले होते. तेथील जमिनीत काही गाडलेले हाडांचे भाग देखील दिसून आले. या प्रकरणात तेथील घर मालक मोनिंदर सिंग पंढेर आणि त्याचा नोकर सुरेंद्र कोळी यांना पकडण्यात आले होते.
तेथील मुलांवर जबरदस्ती आणि त्यांची निर्घृण हत्या केल्याची कबुली देखील सुरेंद्र कोळीने दिली होती. त्यानंतर त्या दोघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती मात्र गेल्या वर्षी कोणताही पुरावा नसल्या कारणाने त्या दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
‘Sector 36‘ याच घटनेच्या भयावह आठवणींना उजाळा देतो. सिनेमाचे डायरेक्टर हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित असल्याचे सांगत असले तरी प्रत्यक्षात मात्र यातून निठारी प्रकरणाच्या अनेक गोष्टी उलगडताना दिसत आहेत.
sector 36 movie story | ‘sector 36’ सिनेमाची स्टोरी
‘Sector 36‘ या सिनेमाची स्टोरी एका घरापासून सुरुवात होते, जिथे प्रेम सिंग (विक्रांत मेस्सी) सोफ्यावर झोपून टीव्हीवर करोडपती शो बघत असतो. तेवढ्यात त्याला एक कॉल येतो आणि कॉल वर बोलत बोलत तो उठतो आणि बाजूला एका प्लेट मध्ये असलेली हाडे उचलून किचन मध्ये ठेवतो, आणि वरच्या मजल्यावर असलेल्या त्याच्या रूम मध्ये जातो जिथे त्याने एका शाळकरी मुलीला निर्दयपणे मारलेले असते. हा पहिलाच सीन पाहताना अंगावर काटे येतात.
सिनेमा जसा पुढे जातो तसं समजते कि तेथील एक कॉलनीतून मुले सारखे गायब होत आहेत. त्यांचे पालक देखील पोलीस स्टेशन ला जाऊन इन्स्पेक्टर राम चरण पांडे (दीपक डोबरियाल) यांच्याकडे तक्रार करण्यासाठी येतात, पण पांडे ला वाटते कि या वसाहतीतील मुलं गायब होत नाहीत, तर ते स्वतः पळून जात आहेत.
पण एका रात्री पांडेच्या स्वतःच्या मुलीचे अपहरण होते. त्यानंतर राम चरण पांडेची सद्सद्विवेकबुद्धी जागृत होते आणि या हत्येबाबत एकामागून एक अनेक धक्कादायक गोष्टी बाहेर येतात.
sector 36 movie review in marathi
डायरेक्टर आदित्य निंबाळकर यांनी त्यांच्या पहिल्याच सिनेमात खूप संवेदनशील आणि खळबळजनक विषय निवडून तो पडद्यावर गंभीरपणे मांडण्यात यशस्वी झाले आहेत. तसेच या सिनेमात आदित्यने असे गुन्हे करणाऱ्या मनोरुग्णाची मानसिकता, व्यवस्थेतील त्रुटी, गरीब-श्रीमंत यांच्यातील दरी असे पैलू सुंदरपणे मांडले आहेत.
तसेच सिनेमात एका श्रीमंत उद्योगपतीच्या मुलाचा दोन दिवसांत शोध घेणारे पोलीस गरीब लोकांच्या हरवलेल्या मुलांबाबत दोन वर्षे गप्प कसे बसतात, याचे अतिशय प्रभावीपणे शूट केले आहे.
कलात्मकदृष्ट्याही सिनेमातील अनेक सीन्स खूप कमालीची आहेत. चांगली गोष्ट म्हणजे लहानपणीच्या ट्रॉमाचे कारण सांगितले असले तरीही ते आरोपींबद्दल सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न करत नाहीत.
Sector 36 movie cast
सिनेमातील कलाकारांच्या ऍक्टींग बद्दल बोलायचे झाले तर, 12th Fail नंतर विक्रांत मेस्सी ने प्रेम सारख्या मनोरुग्णाच्या रोलमध्ये आपल्या अभिनयाचा स्केल वाढवला असल्याचे दिसून येते. तसेच दीपक डोबरियाल याने देखील आपल्या ऍक्टिंग ची रेंज दाखवून दिली आहे.
सिनेमातील पोलिस तपासादरम्यान एक सीन आहे जिथे विक्रांत मेस्सी ने प्रेम या व्यक्तिरेखेतील पागलपणा असा प्रकारे बाहेर आणला आहे की तुमच्यातील प्रत्येक भावना मरून जाते आणि दीपक डोबरियालच्या चेहऱ्यावर देखील तो खालीपना दिसून येतो.
sector 36 movie review in marathi
सिनेमाची प्रोडक्शन वैल्यू, एडिटिंग आणि बॅकग्राऊंड साउंड सर्व टेक्निकल गोष्टी भक्कम आहेत. सिनेमातील हिंसाचाराचा अतिरेक हा सिनेमाचा दोष म्हणता येईल.
हा सिनेमा आजकाल च्या परिस्तिथीशी कनेक्ट करणारा आहे, कारण सिनेमाने सत्य एकदम सखोलतेने दाखवले आहे. या अगोदर मॅडॉक फिल्म्सने भारतीय सिनेसृष्टीत नेहमीच आपली खास ओळख निर्माण केली आहे. त्यांचे सिनेमे नेहमी प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतात.
आता याच्याशी “Sector 36” चे नाव देखील जोडले गेले आहे. आदित्य निंबाळकर यांनी या सिनेमाद्वारे दिग्दर्शनातही एन्ट्री केली आहे.
Sector 36 review
हा सिनेमा हळव्या लोकांसाठी नाही, ज्या प्रकारे या सिनेमात मुलांवरचा क्रूरपणा दाखवला गेला आहे ते पाहू शकणार नाही. तसेच सिनेमात शिव्या देखील आहेत त्यामुळे तुम्ही ते तुमच्या कुटुंबासह पाहू शकत नाही.
ज्यांना निठारी घटनेबद्दल माहिती नाही त्यांच्यासाठी हे धक्कादायक असेल. जर तुम्ही कमकुवत मनाचे नसाल तर हा सिनेमा नक्की बघू शकता.
ज्यांना क्राईम थ्रिलर सारखे सिनेमे आवडतात त्यांच्यासाठी सेक्टर 36 हा सिनेमा पाहण्यासारखा आहे. हा सिनेमा तुम्हाला कुठेही कंटाळवाणा वाटणार नाही, ‘पुढे काय होणार आहे’ अशी भावना कायमच मनात येते.
हा सिनेमा जिओ स्टुडिओ आणि मॅडॉक फिल्म्सच्या बॅनरखाली बनवण्यात आला आहे. तर या वीकेंडला हा सिनेमा तुम्ही नक्कीच तुमच्या वॉचलिस्टमध्ये टाकू शकता.
Don’t Miss Out: विक्की विद्या का वो वाला व्हिडिओ ट्रेलर रिलीज, राजकुमार राव आणि तृप्ती डिमरी हरवलेल्या सीडीच्या शोधात !