‘शैतान’ पैसा वसूल कि टाईम वेस्ट ? पहा रिव्ह्यू!
shaitaan review in marathi: बॉलीवुडचा ‘दृष्यम’ स्टार अजय देवगण आता ‘शैतान’ नावाच्या नवीन सिनेमातून प्रेक्षकांसमोर आला आहे. हा सिनेमा २०२३ मध्ये आलेल्या ‘वश’ या गुजराती सिनेमाचा रिमेक आहे.
कबीर आणि त्याचं कुटुंब फार्महाऊसवर सुट्टीसाठी जाते. पण एका अनोळखी व्यक्तीच्या आगमनाने त्यांची शांतता ढळते. वनराज नावाचा एक माणूस त्यांना ढाब्यावर भेटतो जो नंतर फोन चार्ज करण्याची विनंती करून त्यांच्या घरामध्ये येतो आणि मग काय?
ट्रेलरमध्ये दाखवल्याप्रमाणे, वनराज जान्हवीला म्हणजेच कबीर आणि ज्योतीची मुलीला आपल्या ताब्यात घेतो. जी त्याच्या प्रत्येक शब्दाला बिनतक्रार मानते, आणि तिच्या पालकांना इजा करण्यापासूनही मागे पुढे पाहत नाही.
पण वनराजला काय हवे आहे? तो हे सगळं का करतो आहे? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा सिनेमा बघावा लागेल.
shaitaan review in marathi
नाव: शैतान
स्टार कास्ट: अजय देवगण, जानकी बोडीवाला, आर माधवन, ज्योतिका, अंगद राज
डायरेक्टर: विकास बहल
प्रोड्युसर: ज्योती देशपांडे, कुमार मंगत पाठक आणि अभिषेक पाठक.
रिलीज डेट: ०८ मार्च २०२४
प्लॅटफॉर्म : थिएटर
ट्रेलर : Watch Here
डिरेक्टरकडे आधीच एक चांगली स्टोरी होती, त्यांना फक्त हिंदी प्रेक्षकांच्या आवडीनुसार त्यात बदल करायचे होते. सिनेमाची सुरुवातीची २० मिनिटे फॅमिलीवर फोकस करताना दिसतात, जी थोडी कंटाळवाणी वाटू शकतात. मात्र जेव्हा वनराज (आर माधवन) सिनेमात एन्ट्री करतो तेव्हा स्टोरी अजून तीव्र आणि रोमांचक होऊ लागते.
वनराजने एका अत्यंत शक्तिशाली आणि धूर्त माणसाची भूमिका बजावली आहे. जो एका सामान्य कुटुंबाचे जीवन उद्ध्वस्त करतो. सिनेमाचा दुसरा भाग पूर्णपणे वनराज आणि कुटुंबातील सदस्यांमधील संघर्षावर केंद्रित आहे.
वनराजच्या विचित्र वागणुकीमुळे कबीर आणि त्याचे कुटुंब पूर्णपणे गोंधळून जाते. त्यांची मुलगी जान्हवी तर वनराजच्या बोलण्यानुसार विचित्र आणि विध्वंसक गोष्टी करते. वनराज चा रोल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करतो आणि सिनेमाची स्टोरी पुढे कोणते वळण घेईल याचा विचार करायला लावते.
सिनेमातील काही सीन्स प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. इंटरव्हलपर्यंत सिनेमा प्रेक्षकांना कथेमध्ये गुंतवून ठेवतो आणि पुढे काय घडणार याची उत्सुकता वाढवतो. वनराजचा खरा चेहरा काय आहे? कबीर आणि त्याचे कुटुंब या भयानक परिस्थितीतून कसे बाहेर पडेल? या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना इंटर्वल नंतर भेटतात.
shaitaan movie cast 2024
अजय देवगण ने कबीरची भूमिका चांगली निभावली आहे. त्याचा अभिनय ‘दृश्यम’ सिनेमातील भूमिकांसारखाच आहे. अजयने आपली भूमिका चांगली बजावली आहे, पण कथा त्याला चमकण्याची संधी देत नाही.
आर माधवन वनराजच्या भूमिकेत अप्रतिम दिसला आहे. त्याने त्याच्या अभिनयातून गूढता आणि विचित्रपणा दर्शवून त्याने कथेमध्ये अस्थिरता निर्माण केलेले दिसून येते. काही सीन्स मध्ये त्याची ऍक्टिंग ओव्हर वाटते, पण त्याचा रोल इम्पॅक्टफुल बनवण्यासाठी ते आवश्यक आहे.
जानकी बोडीवाला जान्हवीच्या भूमिकेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तीने एका घाबरलेल्या आणि हतबल मुलीची भूमिका सहजतेने साकारली आहे .
ज्योतिकाने देखील चांगले काम केले आहे पण अजयच्या रोलप्रमाणे तिच्या भूमिकेत देखील थोडा अभाव जाणवतो. बालकलाकार अंगद राज ने देखील उत्तम काम केले आहे.
shaitaan review ajay devgan
‘शैतान’ हा सिनेमा तुम्हाला भयपटाची एक वेगळी पातळी अनुभवण्यास घेऊन जातो. CGI न वापरता तयार केलेले वातावरण प्रेक्षकांना एक वेगळा अनुभव देते.
सिनेमाची मुख्य ताकद म्हणजे प्रतिपक्षाची वाईट हेतू आणि त्यांचे कट, जे प्रेक्षकांमध्ये अस्वस्थतेची भावना निर्माण करतात.
आमिर कीयान खान आणि कृष्णदेव याज्ञिक यांनी लिहिलेला हा सिनेमा पारंपारिक भयपटांपेक्षा वेगळा आहे. प्राचीन काळातील अलौकिक शक्ती विरुद्ध विज्ञान, आणि मानवी क्रूरता यांच्यातील वादविवाद सिनेमातून समोर येतो. यामुळे सिनेमा प्रेक्षकांना द्वेषपूर्ण शक्ती आणि मानवी स्वभावाबद्दल विचार करायला लावतो.
shaitaan review 2024
‘शैतान’ सिनेमाची कथा चांगल्या गतीने पुढे जाते आणि कथानकातील रहस्यमयतेमुळे प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवते. मात्र, सिनेमाच्या इंटर्वल नंतर काही घटना थोड्या कंटाळवाण्या वाटू शकतात.
सिनेमाची बांधणी थोडी अस्वस्थ करणारी आहे. काही घटनांमध्ये तर्कसंगतता नसल्यामुळे प्रेक्षकांना गोंधळून टाकते. एका दृश्यात महत्त्वाचा प्लॉट पॉइंट उघड होतो ज्यामुळे क्लायमॅक्स काय असेल याचा अंदाज येतो.
तरीही, सिनेमॅटोग्राफर सुधाकर रेड्डी यंकट्टी यांनी भीती आणि अंधाराचे वातावरण उत्तमरित्या निर्माण केले आहे. अमित त्रिवेदी यांच्या संगीताने त्या वातावरणात आणखी भर घातली आहे.
‘शैतान’ हा सिनेमा तुम्हाला एका वेगळ्या जगातील भयानक प्रवासावर घेऊन जातो. तुम्हाला रहस्य, थ्रिलर आणि हॉरर आवडत असतील तर हा सिनेमा तुमच्यासाठी आहे.
सिनेमाचा फर्स्ट हाल्फ प्रेक्षकांना खिळवून ठेवतो आणि मजेदार बनवतो. मात्र, इंटर्वल नंतर कथानक गोंधळात टाकणारे वाटते.
क्लायमॅक्स प्रेक्षकांना निराश करतो आणि अनेक महत्त्वाची उत्तरे देण्यात अयशस्वी ठरतो. एकंदरीत, ‘शैतान’ हा सिनेमा तुम्ही एकदा तरी नक्कीच पाहू शकता.
Shaitaan movie Rating : ३/५
DON’T MISS: बॉलीवूडच्या सर्वात महागड्या लग्नापेक्षाही जास्त अनंत अंबानीच्या प्री वेडिंग चा खर्च!