ठरलं तर मग लवकरच रणवीर सिंग दिसणार ‘शक्तिमान’ च्या रोल मध्ये!!
shaktimaan movie ranveer singh: अलीकडेच रणवीर सिंगने संजय लीला भन्साळी यांचा बैजू बावरा बंद झाल्यामुळे ‘शक्तीमान’ सिनेमाला तारखा दिल्या आहेत.
लवकरच रणवीर सिंग ‘शक्तिमान’ च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. तर या सिनेमात तमराज किलविशच्या रोल मध्ये कोण दिसणार आहे ते देखील पाहूया..
shaktimaan movie news
मागील काही दिवसांपासून शक्तीमानवर सिनेमा बनवण्याची चर्चा चालू आहे. सोनी बॅनर खाली बनत असलेल्या या सिनेमाचा एक अनाउंसमेंट व्हिडिओही त्यांनी शेअर केला होता.
या सिनेमामध्ये रणवीर सिंग लीड रोल मध्ये असल्याचे सांगण्यात येत होते. तसेच या सिनेमाचे बजेट देखील खूप जास्त असल्याची बातमी समोर येत आहे. कोरोना काळात खूप प्रेक्षकांनी थिएटर कडे पाठ फिरवली होती. त्यामुळे हा सिनेमा काही काळ पुढे ढकलण्यात आला होता.
मात्र सध्याच्या लेटेस्ट बातमीनुसार हा सिनेमा रणवीर सिंगसोबत बनणार असल्याचे फायनल झाले आहे. रणवीर सिंगने देखील ‘शक्तिमान’ ला तारखा दिल्या आहेत. या सिनेमाचे शूटिंग लवकरच चालू होणार असल्याचे बोलले जात आहे.
shaktimaan movie update
या अगोदर रणवीर सिंग संजय लीला भन्साळी यांच्या ‘बैजू बावरा’ सिनेमात काम करणार होता. त्यासाठी रणवीर आणि आलिया या दोघांनीही त्यांच्या तारखा दिल्या होत्या.
मात्र भन्साळींना इंटेन्स सिनेमांपासून ब्रेक घ्यायचा होता म्हणून त्यांनी ‘बैजू बावरा’ सिनेमा पुढे ढकलला. त्याऐवजी त्यांनी रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशलसोबत ‘लव्ह अँड वॉर’ सिनेमाची घोषणा केली.
आताच्या बातमीनुसार असे सांगण्यात येत आहे की, ‘बैजू बावरा’ पुढे ढकलल्यानंतर रणवीर सिंगने ‘शक्तीमान’ ला तारखा दिल्या आहेत.
shaktimaan movie ranveer singh
अशीही बातमी आहे की ‘डॉन 3’चे शूटिंग पूर्ण केल्यानंतर रणवीर सिंग ‘शक्तिमान’वर काम सुरू करणार आहे. तोपर्यंत ‘शक्तिमान’ च्या प्री-प्रॉडक्शनचे काम चालू असणार आहे.
नुकतेच एका मुलाखतीमध्ये ‘शक्तिमान’चे डायरेक्टर मुकेश खन्ना म्हणाले की, हा खूप मोठा सिनेमा असणार आहे आणि तो मोठ्या बजेटमध्ये बनवला जाणार असल्या कारणाने वेळ लागत आहे.
मुकेश खन्ना शिवाय ‘शक्तीमान’ बनणार नाही, असेही ते म्हणाले. सिनेमाच्या ऍक्टर्स आणि बजेटबाबतही अनेक अपडेट्स समोर आल्या आहेत.
shaktimaan movie budget
‘शक्तिमान’ मध्ये जबरदस्त VFX दिसून येणार आहेत. त्यामुळे सिनेमाचे बजेट देखील वाढले आहे. असे सांगण्यात येत आहे कि हा सिनेमा ३०० ते ३५० कोटींच्या बजेटमध्ये बनणार आहे. तसेच या सिनेमातील व्हिलन ची देखील जोरदार चर्चा चालू आहे.
असे बोलले जात आहे कि टोविनो थॉमस ‘तमराज किलविश’ च्या रोल मध्ये दिसणार आहे. एका लाइव्ह इव्हेंटमध्ये टोविनोने देखील याबाबतचा इशारा दिला होता.
तमराज किलविश हे पात्र टीव्हीवरील फेमस व्हिलनपैकी एक आहे. या सिनेमात व्हिलन च्या लूकसाठी देखील जोरदार तयारी केली जात आहे.
shaktimaan movie cast
‘शक्तिमान’ ला भारतातील पहिला ऑफिसिअल सुपरहिरो मानले जाते. हा शो १९९७ मध्ये बनवला गेला होता. तो आठ वर्षे टीव्हीवर चालला.
लहान मुले आणि तरुण दोघांनाही तो आवडला. यामध्ये मुकेश खन्ना यांनी ‘शक्तीमान’ चा रोल केला होता. आता त्यांच्या याच व्यक्तिरेखेवर सिनेमा बनणार आहे.
या सिनेमाच्या दिग्दर्शनासाठी बेसिल जोसेफ याची निवड करण्यात आली आहे. ज्याने काही काळापूर्वी ‘मिन्नल मुरली’ नावाचा सुपरहिरो सिनेमा डायरेक्ट केला होता.
ALSO READ : बॉलीवूड चे शेहंशाह अमिताभ बच्चन राजा दशरथच्या भूमिकेत दिसणार!