स्त्री २: पहिल्या भागापेक्षाही धमाकेदार? जाणून घ्या कसा आहे राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर चा स्त्री २?
stree 2 review in marathi : १५ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला आहे राजकुमार राव, श्रद्धा कपूर, अभिषेक बॅनर्जी, अपारशक्ती खुराना आणि पंकज त्रिपाठी यांचा ‘स्त्री 2’ हा सिनेमा. चला तर मग जाणून घेऊया कसा आहे स्त्री २.
- रिलीज डेट : १५ ऑगस्ट
- कुठे पहावे: थिएटर
- कलाकार: राजकुमार राव, श्रद्धा कपूर, पंकज त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी आणि अपारशक्ती खुराना
- दिग्दर्शक: अमर कौशिक
- TRAILER : Stree 2
२०१८ मध्ये रिलीज झालेल्या स्त्री या सिनेमाचे २५ कोटी बजेट असून देखील या सिनेमाने बॉक्स ऑफिस वर १५० कोटींहून जास्त चा बिजनेस केला होता. या सिनेमाचे दिग्दर्शक अमर कौशिक होते. आता या वर्षी पुन्हा एकदा त्याच स्टारकास्ट सोबत घेऊन आले आहेत स्त्री २.
stree 2 story | Stree 2 Movie Review
पहिल्या सिनेमाच्या शेवटानंतर, विकी (राजकुमार राव) आणि त्याच्या टोळीने त्यांचे चंदेरी गाव भुताटकी स्त्रीच्या तावडीतून यशस्वीपणे मुक्त केले आहे. पण थोड्या वेळेसाठी शांत असलेली शांतता नवीन दहशतीमुळे भंग झाली आहे.
कारण सरकटा नावाने ओळखला जाणारा डोके नसलेला राक्षसाची गावात एन्ट्री झाली आहे. तो गावातील मुली आणि स्त्रियांचे अपहरण करू लागतो. तसेच विकी आणि त्याच्या मित्रांची टोळी जसजशी महापूजा जवळ येते तशे ते सरकटाला थांबवण्याचा मार्ग शोधत असतात.
ज्या लेव्हल ला पहिला सिनेमा हिट झाला होता त्याच लेव्हल ला स्त्री २ आपल्याला मनोरंजन देण्यात यशस्वी झाला आहे. सिनेमाचा फर्स्ट हाफ जबरदस्त विनोद आणि असंख्य संदर्भांनी घट्ट विणलेला आहे जो तुम्हाला मोठ्याने हसायला लावेल. सिनेमातील हॉरर घटक चांगल्या प्रकारे अंमलात आणले आहेत, ज्यामुळे एक भीतीदायक वातावरण निर्माण करतात.
सरकटा चा खात्मा कसा होतो? श्रद्धा कपूर विकी अँड कंपनीला कशी मदत करते? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला स्त्री २ पाहिल्यानंतरच मिळतील. पण या सिनेमात कॉमेडी आणि हॉररचा मजेदार संगम आहे. पण सेकंड हाफ मध्ये अमर कौशिक थोडा गोंधळून गेल्याचे जाणवते.
ज्या पद्धतीने सीन हाताळले आहेत आणि गोष्टी दाखवल्या आहेत, त्यामुळे वातावरण थोडंसं वेगळं वाटतं. बाकी, स्त्री 2 मध्ये जास्त डोकं लावण्याची गरज नाही. तसेच सिनेमात वेळोवेळी तुम्हाला काही कॅमिओ देखील दिसतील, म्हणून त्यांच्यासाठी तयार रहा. हा अजून एक गोष्ट म्हणजे हा सिनेमा एक मेसेज देखील घेऊन आला आहे.
तसेच हा सिनेमा टॉक्सिक पुरुषत्वाचा नकारात्मक प्रभाव सांगण्यासाठी विनोदाचा वापर करतो, पुरुषांच्या काही कृतींमुळे अराजकता कशी निर्माण होऊ शकते आणि स्त्रियांना कशी हानी पोहोचू शकते यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.
चंदेरीतील पुरुषांवर दबदबा टाकणाऱ्या सरकटाची उपस्थिती या थीमसाठी एक मेटाफर म्हणून काम करते, ज्या स्त्रियांवर बेफिकीर आणि भीती न बाळगता जगणाऱ्या स्त्रियांवर होणारे घातक परिणाम दाखवतात.
stree 2 acting | stree 2 review
आता ऍक्टिंग बद्दल बोलायचे झाले तर राजकुमार राव उर्फ विकीचे टायमिंग कमाल आहे. ज्या प्रकारे त्याने विकीचे पात्र साकारले आहे ते इतर कोणीही करू शकत नाही.
तसेच अभिषेक बॅनर्जी आणि अपारशक्ती यांनी चांगली ऍक्टिंग केली आहे. श्रद्धा कपूरने देखील चांगले काम केले आहे. तिने जी गूढ प्रतिमा निर्माण केली आहे ती श्रद्धा कपूरने मोठ्या प्रामाणिकपणे पडद्यावर साकारली आहे.
पंकज त्रिपाठी ज्या पद्धतीने डायलॉग बोलतात ते मजेदार आहे. त्याचे वन लाइनर्स चाहत्यांना हसायला भाग पाडतील.
Stree 2 Movie Review
स्त्री २ च्या रिव्ह्यू बद्दल बोलायचे झाले तर स्त्री फॅन्स साठी हा एक परिपूर्ण सिनेमा आहे. मग ज्यांना हॉरर कॉमेडीची आवड आहे त्यांनाही ते आवडेल.
राजकुमार राव, श्रद्धा कपूर आणि पंकज त्रिपाठी यांच्या चाहत्यांनाही हा सिनेमा आवडेल. सिनेमातील अनेक सीन आणि गोष्टी विचित्र वाटू शकतात. पण हॉरर कॉमेडीच्या नावाखाली याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते.
Stree 2 हा एक पूर्णपणे मनोरंजक सिक्वेल आहे जो तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर हसू आणेल. हा सिनेमा केवळ मनोरंजनच करत नाही तर एक अर्थपूर्ण संदेश देखील देतो, ज्याला उत्तम अभिनयाचा आधार आहे.
मुंज्याच्या यशानंतर मॅडॉक फिल्म्सने आणखी एक जबरदस्त हॉरर-कॉमेडी तयार करण्यात यश मिळविले आहे आणि स्त्री 2 हा एक योग्य सिक्वेल म्हणून साकार झाला आहे. तर या वीकेंड ला हा सिनेमा थिएटरमध्ये अनुभवण्याची संधी गमावू नका.
Rating: 3.5/5
Don’t Miss: करण जोहरचा पुढचा धमाका! वरुण-जान्हवी पुन्हा एकदा रोमँटिक सिनेमात !