‘तेरी बातों में ऐसा उलझा जीया’: माणूस आणि रोबोट च्या प्रेमाची अनोखी कहाणी!!
teri baaton mein aisa uljha jiya review in marathi: शाहिद कपूर आणि क्रिती सॅनॉन यांचा सिनेमा आज थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. जर तुम्ही सिनेमा पाहण्याचा विचार करताय तर जाणून घ्या कसा आहे सिनेमा?
- डायरेक्टर: अमित जोशी, आराधना साह
- स्टार कास्ट: शाहिद कपूर, क्रिती सॅनॉन, डिंपल कपाडिया, धर्मेंद्र
- रिलीज डेट : ९ फेब्रुवारी २०२४
- ट्रेलर : Watch Now
तेरी बातों में ऐसा उल्झा जिया रिव्ह्यू: आजकाल प्रेम आणि आपुलकीचा अर्थ बदलला आहे. याची जागा सध्या situationship ने घेतली आहे. अगोदर च्या काळात हार्ट ब्रेक एकदाच होत असे मात्र हल्ली आठवड्यातून एक दोन वेळा सहजच हार्ट ब्रेक होतंय ये दिसून येतंय.
अशातच हा सिनेमा आपल्यासमोर एक प्रश्न उपस्तिथ करतो तो म्हणजे रोबोट माणसांपेक्षा चांगलं प्रेम करू शकतात का? रोबोट माणसांपेक्षा जास्त विश्वासाचे आहेत का ? व्हॅलेंटाइन डेच्या वीक मध्ये रिलीज झालेला हा सिनेमा प्रेमाचे वेगवेगळे रंग दाखवतो आणि मनोरंजन देखील करतो.
teri baaton mein aisa uljha jiya review in marathi
teri baaton mein aisa uljha jiya movie story
ही स्टोरी आहे आर्यन नावाच्या रोबोट इंजिनिअर मुलाची ज्याला कोणतीही मुलगी आवडत नसल्याने लग्न करायचे नसते पण नंतर तो क्रिती सॅनॉन म्हणजेच सिफ्रा नावाच्या रोबोटच्या प्रेमात पडतो. तो या रोबोटच्या प्रेमात कसा पडतो? आणि मग जेव्हा तो त्याच्या कुटुंबाशी तिची ओळख करून देतो तेव्हा काय होते आणि त्याचे हे रोबोटिक प्रेम कसे घडते? ही या सिनेमाची स्टोरी आहे.
कसा आहे सिनेमा
या सिनेमाची सुरुवात खूपच स्लो असल्याचे जाणवते. सुरुवातीला काय चालले आहे असे वाटायला लागते आणि सिनेमा कंटाळवाणा वाटू लागतो पण इंटर्वल च्या अगोदर सिनेमा खऱ्या मुद्द्यावर येतो जेव्हा शाहिद क्रिती सॅननच्या रोबोची त्याच्या फॅमिलीसोबत ओळख करून देतो.
तिथून खरी स्टोरी सुरू होते आणि सिनेमा इंटर्वल नंतर मनोरंजक वाटू लागतो. इंटर्वल नंतरच हा सिनेमा पाहण्यासारखा आहे असे वाटते. इंटर्वल च्या अगोदर स्टोरी बिल्डिंग वर काम केले आहे पण त्यामध्ये खूप वेळ गेल्यासारखे वाटते . ते अजून कमी करता आले असते.
क्रिती जेव्हा शाहिदच्या फॅमिलीला भेटते तेव्हाचे सीन्स मजेदार आहेत. आणि तुमचे मनोरंजन देखील करतील .
रोबोट माणसांपेक्षाही चांगलं प्रेम करू शकतात, असा संदेश या सिनेमातून देण्यात आला आहे. क्लायमॅक्समध्ये एक सरप्राईज आहे ज्याने सिनेमाचा शेवट रंजक करण्याचा प्रयत्न केला आहे.
कसा आहे अभिनय
ऍक्टिंग बद्दल बोलायचे झाले तर शाहिद कपूरचे काम चांगले आहे आणि तो स्क्रीनवर चांगला दिसतो पण शाहिदने हे सगळे अगोदर केले आहे. यात नवीन असे काहीच नाही. क्रिती सनॉन या सिनेमाची जान आहे.
रोबोटच्या रोल मध्ये क्रितीने चांगले काम केले आहे. क्रितीने याअगोदर असे काहीही केले नव्हते …जेव्हा ती रोबोटिक एक्सप्रेशन देते तेव्हा हसायला येते. एकप्रकारे हा सिनेमा क्रितीभोवती फिरतो आणि क्रितीने तिचा रोल प्रामाणिकपणे साकारला देखील आहे.
धर्मेंद्रला स्क्रीनवर पाहून छान वाटतं पण त्यांच्या व्यक्तिरेखेला अजून जास्त स्पेस देण्याची गरज होती. या वयात देखील ते ऍक्टिंग करत असतील तर त्यांचा योग्य वापर व्हायला हवा होता.
डिंपल कपाडियांचा कामही चांगलं आहे. बाकी कलाकारांनीही चांगलं काम केलं आहे.
teri baaton mein aisa uljha jiya movie direction
अमित जोशी आणि आराधना साह यांचे डायरेक्शन चांगले आहे. पण फर्स्ट हाफ चांगला व्हायला हवा होता. सिनेमावरची त्यांची पकड इंटर्वलनंतरच स्पष्ट होते.
स्टोरी आणि विषय मजेदार आहे पण त्या दृष्टीने सिनेमा थोडा कमकुवत वाटतो. अजून काही मजेदार सीन्सचा समावेश केला असता तर सिनेमा अजून चांगला झाला असता.
सिनेमात VFX चा चांगला वापर करण्यात आला आहे. खूप साध्या आणि मजेदार पद्धतीने त्यांनी आपला सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला आहे.
teri baaton mein aisa uljha jiya movie music
सचिन जिगर यांचे म्यूजिक ऍवरेज आहे. टायटल सॉन्ग सोडले तर कोणतेही गाणे मनाला भिडत नाही.
teri baaton mein aisa uljha jiya review
या सिनेमात अनेक कमतरता आहेत मात्र तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करू शकता. कारण रोमँटिक कॉमेडी सिनेमांमध्ये बहुतेक वेळा लॉजिक लावायचे नसते.
त्यामुळे जर तुम्ही ‘तेरी बात में ऐसा उल्झा जिया’ पाहिला तर तुम्हाला तो आवडेल आणि सिनेमाचा क्लायमॅक्स देखील चांगला आहे.
एकंदरीतच वेगळ्या धाटणीचा सिनेमा बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला असून तो प्रयत्न काही प्रमाणात यशस्वी देखील झाला आहे. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने रिलीज झालेला हा सिनेमा आपण पाहू शकता…
MOVIE RATING: 3/5
ALSO READ: अहान पांडे ची होणार बॉलीवूड एन्ट्री… लवकरच यशराज फिल्म्समध्ये दिसणार!!