दी क्रू चा आकर्षक प्रोमो रिलीज : करीना कपूर, तब्बू आणि क्रिती सॅनॉन स्टाईलमध्ये टेकऑफसाठी सज्ज!
the crew bollywood movie 2024: दी क्रूमध्ये करीना कपूर, तब्बू आणि क्रिती सॅनॉन दिसणार आहे. शेवटी निर्मात्यांनी आणि कलाकारांनी रिलीजची डेट जाहीर करत त्याचा प्रोमो रिलीज केला आहे. बॉलिवूडच्या आगामी कॉमेडी-ड्रामा ‘द क्रू’ चा फर्स्ट लूक अखेर रिलीज झाला आहे. छोटा पण मनोरंजक टीझर आपल्याला सिनेमाबद्दल काही हिंट देतो.
The crew first look
दी क्रूचा पहिला प्रोमो रिलीज झाला आहे आहे. प्रोमो मध्ये त्यांचा चेहरा जरी दिसत नसला तरी करीना कपूर, तब्बू आणि क्रिती सॅनॉन यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
Watch Here: The Crew Promo
शेवटी निर्मात्यांनी आणि करीना , तब्बू आणि क्रिती यांनी उत्सुकतेने वाट पाहत असलेल्या आपल्या सिनेमाचा पहिला प्रोमो इंस्टाग्राम वर शेअर केला.
the crew bollywood movie 2024
‘चोली के पीचे’ च्या बॅकग्राऊंड म्युसिकसह, टीझरमध्ये तीन महिला फ्लाइट अटेंडंटच्या ड्रेस मध्ये दिसत आहेत, सध्या तरी त्यांचा लूक समोर आलेला नाही.
दी क्रूच्या पहिल्या झलकमध्ये या अभिनेत्री फ्लाइट अटेंडंट असल्याचे दिसत आहे . रेड ड्रेसमध्ये, तब्बू, करीना आणि क्रिती कॅमेराकडे पाठ करून एकत्र विमानतळाच्या आत जाताना दिसत आहेत.
The Crew Movie Cast
तब्बू, करीना कपूर आणि क्रिती सेनॉन यांच्यासोबत अभिनेता दिलजीत दोसांझ देखील सिनेमाचा भाग असणार आहे . राजेश कृष्णन दिग्दर्शित, दी क्रू ची प्रोड्युसर एकता कपूर आणि रिया कपूर आहेत. ज्यात अनिल कपूर, कपिल शर्मा, शोभा कपूर देखील स्पेशल रोल मध्ये दिसणार आहेत .
सिनेमाबद्दल बोलताना, क्रिती ने सांगितले की, “हा एक मजेदार सिनेमा आहे. या तीन एअर होस्टेसच्या फ्रेंडशिपचा स्टोरी शी खूप संबंध आहे. स्टोरी देखील चांगल्या पद्धतीने लिहिली गेली आहे आणि त्यात एक थ्रिल फॅक्टर देखील आहे. तसेच करीना आणि तब्बू यांच्या सोबत काम करण्याचा अनुभव चांगला होता.”
what is the story of the crew Bollywood movie
करीना कपूर, तब्बू आणि क्रिती सॅनन अभिनीत या सिनेमाकडे कॉमेडी सिनेमा म्हणून पाहण्यात येत आहे.
सिनेमाच्या स्टोरी बद्दल सांगायचे झाले तर या तीन एअर होस्टेस आहेत ज्या काम करून आपल्या आयुष्यात पुढे जाण्याची धडपड करतात. पण पुढे जाण्याच्या धडपडी मध्ये नियती त्यांना अशा काही अनपेक्षित आणि अनुचित परिस्थितींकडे घेऊन जाते, ज्यामुळे ते खोट्याच्या जाळ्यात अडकतात.
रिया आणि एकता यांनी यापूर्वी 2018 च्या वीरे दी वेडिंग सिनेमामध्ये डायरेक्टर म्हणून एकत्र काम केले होते.
the crew bollywood movie shooting locations
तब्बू, करीना आणि क्रितीने दी क्रूचे शूटिंग गोवा आणि अबुधाबीच्या वेगवेगळ्या भागात केले. काही सीनसाठी कलाकारांनी मे २०२३ मध्ये मुंबई मध्ये शूटिंग केले.
the crew movie released date
करीना कपूर, तब्बू आणि क्रिती सॅनॉन यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘द क्रू’ हा सिनेमा २९ मार्च २०२४ रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
Don’t Miss: First Look Of Heeramandi The Diamond Bazaar