करण जोहरचा पुढचा धमाका! वरुण-जान्हवी पुन्हा एकदा रोमँटिक सिनेमात..
varun dhawan new movie: डायरेक्टर आणि प्रोड्युसर करण जोहरने त्याच्या आगामी ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ या सिनेमाची घोषणा केली आहे. या सिनेमाचा एक छोटासा टीझर शेअर करत करण जोहरने सिनेमाचे टायटल आणि सिनेमाची रिलीज डेट देखील जाहीर केली आहे.
वरुण धवन या सिनेमात लीड रोल मध्ये दिसणार आहे. यासोबतच सिनेमात कोणती अभिनेत्री लीड रोल साकारणार आहे हे देखील करण जोहर ने उघड केले आहे.
sunny sanskari ki tulsi kumari movie
बॉलिवूडचा फेमस डायरेक्टर करण जोहरने त्याच्या नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. ‘कुछ कुछ होता है’ आणि ‘कभी खुशी कभी गम’ यांसारख्या फॅमिली सिनेमांद्वारे सर्वांचे मनोरंजन करणाऱ्या करण जोहरने अलीकडेच त्याच्या नव्या प्रोजेक्ट ची घोषणा केली आहे. आणि त्याने त्याच्या ‘संस्कारी’ टायटल वरून पडदा देखील हटवला आहे.
कलंक आणि स्टुडंट ऑफ द इयर सिनेमानंतर वरुण धवन पुन्हा एकदा करण जोहरसोबत धर्मा प्रोडक्शनमध्ये काम करताना दिसणार आहे. तसेच या सिनेमात वरुण धवनसोबत कोणती अभिनेत्री लीड रोल मध्ये दिसणार आणि सिनेमा कधी रिलीज होणार हे देखील करण ने उघड केले आहे.
varun dhawan new movie title
करण जोहरच्या पुढील सिनेमाचे टायटल
करण जोहरच्या या सिनेमाचे टायटल खूपच वेगळे आहे. अलीकडेच त्याने त्याच्या ऑफिशिअल X (ट्विटर) अकाउंटवर त्याच्या सिनेमाची घोषणा केली आहे.
करण जोहर बद्रीनाथ की दुल्हनिया आणि हम्प्टी शर्मा की दुल्हनियानंतर ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ या सिनेमाची स्टोरी मोठ्या पडद्यावर घेऊन येणार आहे.
या सिनेमात वरुण धवन ‘सनी संस्कारी’ च्या रोलमध्ये दिसणार आहे. सिनेमाचे टायटल शेअर करत, डायरेक्टर ने कॅप्शनमध्ये लिहिले की, “आपल्या कुमारी ला घेण्यासाठी संस्कारी येत आहे. ही लव्हस्टोरी लवकरच तुमच्या मनोरंजनासाठी थिएटरमध्ये येत आहे”.
varun dhawan new movie
ही अभिनेत्री करणार वरुण धवनसोबत स्क्रीनवर रोमान्स!
करण जोहर निर्मित या सिनेमात जान्हवी कपूर पुन्हा एकदा वरुण धवनसोबत लीड रोल मध्ये दिसणार आहे, जी या सिनेमात ‘तुलसी कुमारी’ च्या रोलमध्ये दिसणार आहे. याअगोदर जान्हवी कपूर आणि वरुण धवन ची जोडी नितेश तिवारीच्या ‘बवाल’ सिनेमात दिसली होती.
OTT वर रिलीज झालेल्या या सिनेमाला फॅन्सचे खूप प्रेम मिळाले. दोघांची केमिस्ट्रीही फॅन्सना खूप आवडली होती. ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ हा सिनेमा शशांक खेतान डायरेक्ट करणार आहेत,ज्यांनी यापूर्वी ‘धडक’ सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. टायटल सोबतच करण जोहरने सिनेमाची रिलीज डेट देखील जाहीर केली आहे, जी १८ एप्रिल २०२५ आहे.
ALSO READ: दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल-२०२४ मध्ये शाहरुख खान, संदीप रेड्डी वंगा यांना अवॉर्ड