Vicky Vidya Ka Woh Wala Video trailer

विक्की विद्या का वो वाला व्हिडिओ ट्रेलर: राजकुमार राव आणि तृप्ती डिमरी हरवलेल्या सीडीच्या शोधात !

Vicky Vidya Ka Woh Wala Video trailer : या सिनेमाच्या डायरेक्टर ने अगोदर एक अनाउन्समेंट टीझर रिलीज केला होता त्यांनतर गुरुवारी त्यांनी राजकुमार राव आणि तृप्ती डिमरीच्या विकी विद्या का वो वाला व्हिडिओच्या सिनेमाचे ट्रेलर लाँच केले. या सिनेमाने फेमस पंजाबी गायक दलेर मेहंदीला त्याच्या “ना ना ना रे” या आयकॉनिक ट्रॅकसह परत घेऊन आला आहे. तसेच सिनेमात विजय राज आणि मल्लिका शेरावत  यांनी साकारलेले महत्त्वपूर्ण रोल पाहायला मिळणार आहे.

Vicky Vidya Ka Woh Wala Video teaser

ट्रेलरची सुरुवात विकी (राजकुमार) आणि विद्या (तृप्ती) यांच्या ऋषिकेशमधील लग्नाच्या सीन सोबत होते. विकी एक आठवण म्हणून त्यांच्या लग्नाच्या रात्रीचा व्हिडिओ बनवण्याचा सल्ला देतो. पण, जेव्हा त्यांचा सीडी प्लेयर आणि लग्नाच्या रात्रीचा व्हिडिओ चोरीला जातो तेव्हा त्यांचे जग उलटे होते.

तेव्हा हा हरवलेला व्हिडिओ शोधण्याचे काम पोलिसच्या रोल मध्ये असलेल्या विजय राझ याच्याकडे येते. सुरुवातीला तो या प्रकरणात जास्त प्रभावित होत नाही आणि  म्हणतो, “मी आजच्या दिवसासाठी इन्स्पेक्टर झालो आहे का?” तथापि, जेव्हा तो विकीच्या कुटुंबातील सदस्य असलेल्या मल्लिका शेरावतच्या मोहक व्यक्तिरेखेला भेटतो तेव्हा त्याची आवड या प्रकरणात पटकन वाढू लागते.

Vicky Vidya Ka Woh Wala Video trailer

सीडीचा शोध सुरू होताच,  आपल्याला सिनेमातील कॉमेडी सीन बघायला मिळतात, दलेर मेहंदीच्या “ना ना ना रे” ने बॅकग्राऊंड ला चार चांद लावले आहेत. दरम्यान, व्यवसायाने मेहंदी कलाकार असलेला विक्की त्याच्या बायकोच्या संशयाच्या भोवऱ्यात सापडतो, तिला वाटते कि त्याचे अफेअर चालू आहे.

तेव्हा विकी तिला मजाक मध्ये प्रतिसाद देतो कि, “हम जैसे मध्यमवर्गीय लड़के डेट पे नहीं, भंडारो पे जाते है” ट्रेलर मध्ये आपल्याला अशे बरेच कॉमेडी वन-लाइनर्स पाहायला मिळतील. विकी आणि विद्या यांना त्यांच्या हरवलेल्या सीडीसाठी एक अनोळखी कॉल येतो आणि ते स्मशानात पोहोचतात.

“90 च्या दशकातील शुद्ध मसाला एंटरटेनमेंट” म्हणून वर्णन केलेला हा सिनेमा राज शांडिल्य यांनी डायरेक्ट केला आहे, जो आयुष्मान खुरानाच्या ड्रीम गर्ल फ्रँचायझीसाठी ओळखला जातो.

vicky vidya ka woh wala video trailer

vicky vidya ka woh wala video cast

मल्लिका शेरावत Vicky Vidya Ka Woh Wala Video सिनेमामधून कमबॅक करताना दिसणार आहे. डायरेक्टर राज शांडिल्य यांनी तिला कास्ट करण्याचे कारण सांगताना म्हणाले की, हा सिनेमा बहुतांशी कौटुंबिक असला तरी, मल्लिका ग्लॅमर आणि उत्साहाचा परफेक्ट टच आणते, आणि ती कॉमेडीला देखील उत्तम प्रकारे पूरक आहे. तिला राजकुमार राव आणि तृप्ती डिमरी यांच्यासह मजबूत कलाकारांसोबत पाहण्यासाठी चाहते देखील उत्सुक आहेत.

प्रोड्युसर भूषण कुमार मल्लिका बद्दल बोलताना म्हणाले, “आम्हाला वाटले की आम्ही मल्लिका शेरावतला परत आणू कारण तिने बऱ्याच काळापासून अशा प्रकारचा रोल केलेला नाही.”

सिनेमाचे डायरेक्टर शांडिल्याने सांगितले की, “मी एका मिडल क्लास फॅमिली वर सिनेमा बनवला आहे. त्यात मी राजकुमार राव आणि मल्लिका शेरावत या सर्व मोठ्या नावांचा वापर केला आहे. मल्लिकाला आणण्याचं खास कारण म्हणजे आम्ही लिहिलेलं पात्र हे तिला खूप शोभतं… त्या काळच्या मॉडर्न मुलीचा रोल मल्लिकाला अगदी परफेक्ट सूट होतो. म्हणूनच मी तिला कास्ट केले. अन्यथा, माझा तिच्याशी संबंध नाही. माझा सिनेमा ९७% फॅमिली आहे, ३% फॅमिली आहे. ये जो महापरिवारिक है ये मैं मल्लिका के चक्कर में ही डाला है.”

‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’ च्या स्टार कास्ट बद्दल बोलायचे झाले तर या मध्ये राजकुमार राव , तृप्ती डिमरी, विजय राज, मस्त अली, मुकेश तिवारी, सहर्ष कुमार शुक्ला, अर्चना पटेल, अर्चना पूरण सिंग, राकेश बेदी, टिकू तलसानिया आणि अश्विनी काळसेकर यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत.

vicky vidya ka woh wala video release date

सिनेमाच्या नाविन्यपूर्ण जाहिरातींनी फॅन्समध्ये सिनेमाबद्दल आवड निर्माण केली आहे, आणि आगामी रिलीजसाठी उत्साह निर्माण केल्याचे दिसून येत आहे.

ड्रीम गर्ल फेम डायरेक्टर राज शांडिल्य यांनी तृप्ती डिमरी आणि राजकुमार राव यांचा विकी विद्या का वो वाला व्हिडिओ डायरेक्ट केला आहे. हा सिनेमा ११ ऑक्टोबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

Read More: “रामायण” मध्ये रणबीर दिसणार डबल रोल मध्ये! एकाच सिनेमात दोन वेगळे लूक !

Leave a Comment