why are movies released on Friday

तुम्ही कधी विचार केला आहे का की why are movies released on Friday बॉलीवूडमधील सगळे चित्रपट शुक्रवारी का रिलीज होतात आणि आठवड्याच्या इतर दिवशी का रिलीज होत नाहीत? त्याचे कारण फक्त विकेंड आहे कि अजून काही आहे?

why movies release on friday

गेल्या काही वर्षांत, बॉलीवूडने वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट प्रेक्षकांना दिले आहेत. पण बॉलीवूड मध्ये एक विशिष्ठ प्रथा आहे जिथे खूप सिनेमे शुक्रवारी रिलीज होतात. शुक्रवारी सिनेमे रिलीज करण्याचा हा ट्रेंड खूप वर्षांपासून चालू आहे.

यामागचे नक्की काय कारण आहे असा प्रश्न खूप लोकांना पडतो. चला तर मग पाहूया बॉलीवूड डायरेक्टर शुक्रवारी सिनेमे रिलीज करण्यास प्राधान्य का देतात.

विकेंडमुळे शुक्रवारी सिनेमे रिलीज होतात आणि खूप प्रेक्षक चित्रपटगृहांमध्ये येतील असे नॉर्मली मानले जाते. पण  शुक्रवारी सिनेमे रिलीज होण्याचे हे एकमेव कारण नाही आहे.

why bollywood movies are released on friday

शुक्रवारी रिलीज होणाऱ्या बॉलीवूड सिनेमा चा ट्रेंड हा हॉलिवूडकडून घेण्यात आला आहे. शुक्रवारी, १५ डिसेंबर १९३९ रोजी गॉन विथ द विंड नावाचा एक लोकप्रिय सिनेमा रिलीज केला होता आणि त्या सिनेमा ने चांगली कमाई केली होती. यामुळे भारतातील प्रोड्युसरला प्रेरणा मिळाली.

मुघल-ए-आझम हा पहिला सिनेमा होता ज्याने शुक्रवारी रिलीज चा ट्रेंड सुरु केला. हा सिनेमा ५ ऑगस्ट १९६० रोजी रिलीज झाला आणि लोकांमध्ये खूप लोकप्रिय झाला. या चित्रपटात पृथ्वीराज कपूर, दिलीप कुमार आणि मधुबाला यांच्या प्रमुख भूमिका होत्या. त्या काळी मुघल-ए-आझमने बॉलीवूडमध्ये रंगीत  सिनेमाचे आगमन केले आणि शुक्रवारचा ट्रेंड सुरू केला.

डिस्ट्रिब्युटर आणि निर्मात्यांनी शुक्रवार हा सिनेमा रिलीज साठी योग्य दिवस म्हणून निवडण्याचे आणखी एक कारण म्हणजे त्याचे धार्मिक संबंध हे आहे. निर्मात्यांनी शुक्रवारी सिनेमे रिलीज करण्याचे एक मोठे कारण म्हणजे आठवड्याचा पाचवा दिवस देवी लक्ष्मीचा दिवस मानला जातो.

हिंदू धर्मानुसार शुक्रवार हा धन आणि समृद्धीची देवी लक्ष्मीचा दिवस मानला जातो. त्यामुळे शुक्रवारी सिनेमे रिलीज करणे म्हणजे लक्ष्मी देवीचा आशीर्वाद आहे असे मानले जाते. त्यामुळे निर्मात्यांना चांगली संपत्ती मिळेल या विश्वासातून शुक्रवारी सिनेमे रिलीज केले जातात.

Image Source: Instagram

यानंतर त्यात एक व्यावसायिक पैलू देखील आहे. निर्मात्यांना मल्टिप्लेक्स मालकांना द्यावी लागणारी स्क्रीनिंग फी शुक्रवार व्यतिरिक्त इतर दिवसांसाठी जास्त असते .

सणासुदीत सिनेमा रिलीज करण्याचा  ट्रेंड मागील काही दिवसात दिसून आला आहे.दिवाळीच्या फायद्यावर लक्ष ठेवून, राम सेतू आणि थँक गॉड दिवाळीत रिलीज झाले होते.

मूव्हीमॅक्स सिनेमाचे सीईओ म्हणाले “रिलीजची तारीख हि विशेषत: एखादा सिनेमा  सणाभोवती प्रदर्शित होत असेल तर, सुट्ट्या लक्षात घेऊन ठरवले जाते. थँक गॉड आणि राम सेतूच्या बाबतीत, दोघांचेही फोकस  दिवाळीच्या सणांवर होते आणि म्हणूनच ते मंगळवारी प्रदर्शित केले गेले, शुक्रवार नसलेल्या दिवशी चित्रपट प्रदर्शित होण्याचे आणखी एक कारण म्हणजे ईद, दिवाळी, ख्रिसमस सारख्या दिवशी  प्रेक्षकांची संख्या वाढवणे हे देखील असू शकते”.

why all movies are released on friday

अनेक लोकांसाठी फ्रायडे नाईट नंतरच वीकेंड चालू होतो. म्हणून फ्रायडे नाईट हि मित्र आणि कुटुंबासोबत सिनेमा पाहण्याचा एक उत्तम प्लॅन असतो. लोकांना वर्क स्ट्रेस फ्री शनिवार व रविवार दरम्यान चित्रपटाचा आनंद घेता यावा म्हणून सिनेमे शुक्रवारी रिलीज केले जातात.

शुक्रवारी रिलीज तारखेची जाणीवपूर्वक निवड करणे हा भारतीय चित्रपटांच्या प्रोमोशन्स आणि डिस्ट्रिब्युशन चा  एक महत्त्वाचा घटक आहे. ही प्रथा केवळ लाखो लोकांच्या मनोरंजनाची डिमांड पूर्ण करत नाही तर भारताचा स्वतःचा सांस्कृतिक वारसा देखील दर्शवते.

अलिकडच्या वर्षांत डिजिटल प्लॅटफॉर्म OTT (ओव्हर-द-टॉप) सेवांमुळे बदलते वातावरण असूनही, शुक्रवारच्या थिएटर रिलीजला अजूनही खूप आकर्षण आहे.

शुक्रवारच्या रिलीजची प्रथा भारतीय सिनेमॅटिक अनुभवाचा एक मौल्यवान  भाग आहे कारण आपण सिनेमाच्या सतत विकसित होत असलेल्या जगाचा भाग आहोत.

आता तुम्हाला समजले असेल कि शुक्रवार हा फक्त नॉर्मल दिवस नसून तो सिनेमा रिलीज करण्यासाठी विचारपूर्वक निवडलेला दिवस आहे!

Read More : 20 bollywood movie poster copied from hollywood

Leave a Comment